संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
19-12-2024
अखेर घरमालकच निघाला रशिदच्या खुनाचा मारेकरी
चार दिवसांनंतर झाला उलगडा
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
आष्टी:- येथे किरायाने वास्तव्यास असलेल्या एका दीव्यांग वृद्धाची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या करण्यात आली .ही घटना १५ तारखेला उघडकीस आली त्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला.त्यामध्ये रशिदचा खून पोलिसांच्या माहिती प्रमाणे निष्पन्न झाले .
आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार मृतकाचे आपल्या नातेवाईकांना मी गावाला येणार आहे.असे सांगितले होते. दिनांक १० डिसेंबरला रशीद आणि आरोपी खुशाल कुकुडकार यांच्यामध्ये घरभाड्यवरून वाद सुरु झाला .तू घरसोडून जात आहे मला घरभाड्याचे पैसे देणार नाही तर तू पैसे दिल्याशिवाय जाऊ नकोस त्यावरून मयत रशीद ने आरोपीच्या पत्नीवरुन काही तरी अपशब्द बोलल्यामुळे खुशाल याचे मनात खुप राग आला. त्यामुळे त्याने रशिदच्या डोक्यावर लोखंडी रॉड ने डोक्यावर प्रहार केला.त्यांनतर त्याचे समाधान न झाल्यामुळे त्याने सत्तुर ने त्याचा गळा चिरला व तो मृत झाल्याचे पाहून त्याच्या खोलीतून बाहेर निघून रशीद च्या खोलीला बाहेरुन कुलूप ठोकले आणि याठिकाणी कोणताच प्रकार घडेलेला नाही अशा स्थितीत आरोपी वावरत होता. रशिदच्या नातेाइकांना मी स्वतः गावाकडे येणार आहे अशी माहिती दिल्यामुळे रशिद का आला नाही म्हणून वारंवार त्याच्या फोन ला संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे पाच दिवसांनंतर रशीद का आला नाही म्हणून त्याचे नातेवाईक नागपूर वरुन आष्टीत दाखल झाले त्यामुळेच सदर गुन्ह्याचा खुलासा झाला आष्टी पोलीसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी त्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे
या तपासात गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक लोढा , उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे , यांच्या मार्गर्शनाखाली तपाशिय अधिकारी पोलीस निरीक्षक विशाल काळे, साहाय्यक पोलीस उपनरीक्षक सोमनाथ पवार , महिला पोलिस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप , पोलीस उपनिरीक्षक प्रतीक्षा वणवे , पोलीस शिपाई रवींद्र मेदाळे, प्रवेश राऊत , पराग राजूरकर , प्रकाश बोरकुटे , प्रताप तोगरवार , प्रमोद दुर्गे , संतोष नागुलवार तसेच त्यांचे सहकारी टीम यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
No Comments