CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
29-07-2024
घन कचऱ्याचे साम्राज्याने अंगणवाडीतील बालकांचे दुर्गंधीने आरोग्य धोक्यात
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील वार्ड क्रमांक तीन मधील अंगणवाडी केंद्राजवळ धन कचरा बऱ्याच दिवसांपासून जमा असल्याने त्या दुर्गंधीने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे
सदर अंगणवाडी जवळ प्लॅस्टिकसह अन्य टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणावर येथीलच काही ग्रामस्थ पाच सहा वर्षांपासून केरकचरा आणून टाकीत असल्याचे बोलल्या जात आहे. पण स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबतीत माहिती देऊनही कचरा टाकणे बंद केले नाही आणि उपाय म्हणून या ठिकाणी कचराकुंडी लावली नाही त्यामुळे या ठिकाणी पावसाचे दिवस असल्याने दुर्गंधी पसरली आहे. ग्रामपंचायते पदाधिकारी गावातच राहतात परंतु या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अनखोडा गावातील वार्ड क्रमांक दोन मधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. व दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली बांधकाम केले आहे. परंतु या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने प्लॅस्टिकसह अन्य टाकाऊ वस्तू बिनधास्तपणे या ठिकाणी फेकल्या जातात. त्यामुळे नाल्याची वहनक्षमता कमी झाली असून, वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठी हानी पोहचण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता नाल्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत स्वच्छता विभागाची आहे. अनेक दिवसांपासून या नाल्यातील प्लॅस्टिकच्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता असताना कोणीही याकडे लक्ष देत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
या ढिगाऱ्याच्या शेजारी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे स्थानिक नागरिक प्लॅस्टिक व टाकाऊ वस्तू या नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
नालीमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे आणि निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांना साथीच्या आजारांची भीती सतावत आहे. या साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून लवकरात लवकर परिसरातील दुर्गंधी नष्ट करायला पाहिजे होती मात्र अद्याप ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक चर्चेतून बोलत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या कचऱ्याच्या समस्येवर ग्रामपंचायत प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे.
नाल्यात नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जातो. या ठिकाणी कचराकुंडी लावावी व कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी.
- संतोष तिमाडे, नागरीक
या ठिकाणी कचराकुंडी नसल्याने कचरा नालीत अडकून बसला असून, त्यामुळे पाणी तुंबत आहे. या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी परसली आहे. पावसाचे पाणी वाहून जाऊ न शकल्यास ते परिसरातील नागरिकांच्या घरात शिरण्याचाही धोका आहे. स्थानिक प्रशासनाने याची दखल घेऊन नाल्यातील कचरा काढून नाला साफ करण्याची गरज आहे.
- वाकुडकर, नागरिक
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments