अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
22-07-2024
शासनाकडून नैसर्गिक आपत्तीतील मृतकाचे वारसांना १२ लाखाची मदत वितरित
गडचिरोली दि.२२ : नैसर्गिक आपत्तीने वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज त्यांच्या घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते देण्यात आले.
याच महिन्यात दिनांक ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील दोलू लुला तीम्मा यांना, २ जुलै रोजी मौजा जीवनगट्टा येथील चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते, त्याचे वारस पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना तसेच मौजा मरपल्ली येथील अंकुश पांडू कुळयेटी हे दिनांक ८ जुलै २०२४ रोजी मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते. त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी भाकरे यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे देण्यात आली
यावेळी आदित्य आंधळे गटविकास अधिकारी , सचिन कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी , पी. एन . उसेंडी तलाठी एटपल्ली ,. पी . डी. आत्राम तलाठी तोडसा , देवाजी गावडे कोतवाल , सुरेश दुर्गे कोतवाल , सचिन गेडाम कोतवाल उपस्थित होते.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments