नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
05-05-2024
सप्तशृंगी गडावरुन खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीची आत्महत्या
वणी:- आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या वणी गडावरील शीतकड्यावरून सुमारे चारशे फुट खोल दरीत उडी घेवून युवक व अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सप्तशृंगी गडावर मंगेश राजाराम शिंदे वय 24 वर्ष रा. भायाळे ता. चांदवड जि. नाशिक व अल्पवयीन मुलगी हे मोटर सायकल क्र. Мн 15 HJ 5915 ने वडनेर भैरव ता. दिंडोरी जि. नाशिक येथुन दि. 28/04/2024 रोजी वणी सप्तश्रृंगी गड येथे आले होते.
सप्तशृंगी गडावर अज्ञात कारणाने या दोघांनी सप्तशृंगी गडावरील शीतकडा येथे येवून सुमारे चारशे ते पाचशे फुट खोल दरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे. शीतकड्यावरून उडी घेतलेल्या मुलीचा मृतदेह हा झाडाला अडकलेला तर मुलाचा मृतदेह दरीत कोसळलेला आढळला. घटनेस साधारण सहा दिवस होवून गेलेले असल्याने मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.
याबाबत भातोडे, ता. दिंडोरी चे पोलिस पाटील विजय चव्हाण यांना गुराख्यांनी माहिती दिल्यानंतर वणी पोलिसांत खबर देण्यात आली. वणी पोलिसांनी स्थानिक युवकांच्या मदतीने अवघड अशा दरी पार करीत मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. सदर युवक व युवतीचे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहीती असून याबाबत वनी पोलिस अधिक चौकशी करीत आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments