नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
F
02-03-2024
एस.टी.ने घेतला पेट मात्र गाडीत अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने विझविली आग
आष्टी :-
एस टी ने घेतला पेट मात्र अग्निशमन नसल्याने वाहकाने झाडाच्या फांद्याने आग विझविली हि घटना मुलचेरा - घोट मार्गावर भर जंगलात घडली प्रसंगावधान राखून प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले.
गडचिरोली जिल्हयात अगोदरच एसटी महामंडळाच्या भंगार बस सेवेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना आणखी एक घटना समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास घोट जवळील निकतवाडा गावापासून ३ किलोमीटर अंतरावरील मुलचेरा ते घोट रस्त्यावर जंगलात धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाश्यांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली.त्यानंतर वाहक चालक यांच्या मदतीने प्रवासी सर्व सुखरूप असले तरी या घटनेमुळे प्रवासी भयभीत झाले होते.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोली आगाराची एसटी बस मुलचेरा तालुका मुख्यालयात दररोज रात्रो मुक्कामाणे असते ती बस दररोज पहाटे ६ वाजता मुलचेरा वरून घोट-चामोर्शी भाडभिडी मार्गे गडचिरोलीला जाते.शुक्रवार (१ मार्च) रोजी एम एच- ०७ सी-९३१६ क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे पहाटे ६ वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती.घोट पासून 3 किलोमीटर जंगलात अचानक बसने पेट घेतल्याने या बस मध्ये असलेले प्रवासी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तातळीने बसमधून खाली उतरले. जवळपास ८ प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती समोर येत असून सर्वजण सुखरूप आहेत.
एसटी बसच्या इंजिन मधून अचानक धूर निघत बसच्या बॅटऱ्यामध्ये शार्ट सर्कीटने आग लागत असल्याने प्रसंगावधान साधून चालक प्रदीप मडावी व वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रवाश्यांना खाली उतावरले आणि स्वतःही आपला सामानसुमान घेऊन खाली उतरले.त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.या बस मधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत जंगलाच्या दिशेने जाऊन दूर उभे झाले.तर चालक आणि वाहकाने झाडांच्या फांद्या हातात घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली आणि अहेरी या दोन आगारात नवीन बसेस नसल्याने जुन्याच बसेसवर दारमदार असल्याने बस मध्ये तांत्रिक बिघाड होणे,भर रस्त्यावर बस बंद पडणे,आग लागणे अश्या घटना हे नित्याचेच झाले आहे.शुक्रवारी सकाळच्या सुमारास तर बसने पेट घेतल्याने प्रवासी चांगलेच भयभीत होऊन धाव घेतली. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी नागरिकांना याचा चांगलाच फटका बसला आहे.याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी गडचिरोलीच्या आगार व्यवस्थापक राखडे यांना विचारले असता बसमध्ये असलेल्या बॅटऱ्या जळाले असून सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments