अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
02-06-2024
अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर दोन गंभीर
गडचिरोली,
जिल्ह्यातील कोरची शहरातील बायपास महामार्गावरील नवरगावच्या फाट्यापुढे कुरखेडा वरून छत्तीसगडकडे निघालेल्या अज्ञात मालवाहू ट्रकने विरुद्ध दिशेने येत असलेल्या दुचाकीस्वारास एका बाजूनं धडक दिल्यामुळे दुचाकी चालक रस्याच्या कडेला जाऊन पडले यामध्ये दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेली दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता दरम्यान घडली आहे. अज्ञात मालवाहू ट्रकने दुचाकी क्रमांक MH 33 AB 8324 ला धडक देऊन घटनास्थळावरून पसार झालेला आहे.
मृतक रुपेश गांगसाय नैताम वय २७ वर्ष रा. चांदागोटा तालुका कोरची असे युवकाचा नाव आहे. तर मिनाबाई नीलाराम कल्लो वय ५० वर्षे व महेश निलाराम कल्लो वय २५ वर्ष रा. नवरगाव तालुका कोरची हे दोघेही नात्यात माय-लेक असून गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मिनाबाईच्या डोक्याला गंभीर दुखापत असून महेशच्या उजव्या पायाला मार लागल्यामुळे दोघांना सुरुवातीला कोरची ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेनी नेण्यात आले येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष विटणकर यांनी प्राथमिक उपचार करून डोक्याला गंभीर दुखापत असल्यामुळे या दोघांना पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नातेवाईकांना याची माहिती झाली ते घटनास्थळी उपस्थित झाले त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं मृतक रुपेश नैताम याला ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पाठवा म्हणून फोनवरून कोरची ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरला विनंती केली परंतु येथील डॉक्टर व वैद्यकीय अधीक्षक यांनी तीन तास लोटून सुद्धा १०२ रुग्णवाहिका पाठविली नाही रुग्णवाहिका का पाठवली नाही याचे कारण डॉक्टरला विचारले असता त्यांनी सांगितले की रुग्णवाहिकेचा वाहनचालक उपस्थित नव्हता आणि उपस्थित झाला तेव्हा जाण्यास तयार नव्हता माझ्याशीच अरे रावी केली असल्याचे डॉ आशिष विटनकर यांनी सांगितले त्यामुळे रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचू शकली नाही आणि अपघातात मृत्यू पावलेल्या रुपेशची बॉडी रस्त्यावरच तीन तास पडून होती.
यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी कोरची येथील माजी नगराध्यक्ष नसरुद्दीन भामानी यांना घटनेची माहिती दिली तेव्हा माजी नगराध्यक्ष यांनी नगरपंचायतची स्वर्गरथ बोलावून त्यामध्ये मृतक रुपेश नैताम याला टाकून ग्रामीण रुग्णालय येथे आनले. मृतकांच्या नातेवाईकांनी वेळेवर रुग्णवाहिका पोहोचली नसल्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांविरोधात ग्रामीण रुग्णालयात रोष व्यक्त केला. अधिक तपास कोरची पोलीस करीत आहेत
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments