बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
13-05-2024
सांस्कृतिक भवन परिसरात टाकाऊ कचऱ्याने सुटली दुर्गंधी
परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात,पिंकु बावणेचा आंदोलनाचा इशारा
अशोक खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
देसाईगंज-
शहराच्या नगर परिषद कार्यालयासमोरील जागेत नागरीकांच्या कराच्या उत्पन्नातुन कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.सदर सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत असतांनाच परिसरात टाकलेल्या टाकाऊ कचऱ्याने दुर्गंधी सुटली असुन यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील टाकाऊ कचरा यथाशिघ्र उचलुन विल्हेवाट न लावल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी प्रशासनाला दिला असल्याने नगर पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
देसाईगंज शहरातील नागरिकांना सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक कार्य सोपस्कार पार पाडता यावेत करीता शहराच्या सर्व्हे नं. २४/५ मध्ये ८ एकरात कोट्यावधी रुपये खर्च करून सांस्कृतिक भवन बांधण्यात आले आहे.या सांस्कृतिक भवनात विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येत असते.कार्यक्रमाच्या अनुषंगाने जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येत असतात.मात्र अलिकडे हे सांस्कृतिक भवन शोभेची वस्तु ठरू लागले असुन परिसरात तयार करण्यात आलेला बगीचा देखील देखभाल दुरुस्ती अभावी नामशेष झाला आहे.
दरम्यान कार्यक्रमानंतर उरलेला टाकाऊ कचरा उचलुन डंपिंग यार्ड मध्ये टाकण्यासाठी सफाई कामगार यंत्रणा कार्यरत असताना टाकाऊ कचरा सांस्कृतिक भवन परिसरातच टाकण्यात येत असल्याने कुजलेल्या कचऱ्याला दुर्गंधी सुटून उग्र वास लगतच्या परिसरात पसरला आहे.हा वास इतका दुर्गंधीयुक्त आहे की यामुळे अनेकांना परिसरात वास्तव्य करणे कठिण होऊ लागले आहे.अनेकांना मळमळ, पोटाचे आजार अशा विविध समस्या जाणवू लागल्या आहेत.ही गंभीर वस्तुस्थिती लक्षात घेता नगर प्रशासनाने येथील कचऱ्याची यथाशिघ्र विल्हेवाट लावण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते पिंकु बावणे यांनी केली असुन समस्या मार्गी लावण्यात न आल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत नगर प्रशासन काय कारवाई करते याकडे येथील नागरीकांचे लक्ष लागून आहे.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments