RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
16-12-2024
आष्टीत घडली खुनाची घटना, रशिदचा कुणी केला खून पोलीस तपास सुरू
आष्टी (प्रतिनिधी)# आष्टी येथे किरायाने वास्तव्यास असलेले रशीद अहमद शेख ,वय ६० वर्षे याचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना दिनांक १५ ला उघडकीस आली.
सदर वृत असे की रशिदने आपल्या नातेवाईकांना चार पाच दिवसांपूर्वी दूरध्वनी द्वारे मी गावाकडे येणार अशी माहिती दिली होती.त्यांनतर चार पाच दिवस लोटूनही तो न आल्यामुळे व त्याचा फोन न लागत असल्यामुळे नातलगांना शंका येऊन ते स्वतः नागपूर येथून आष्टीत दाखल झाले व त्याचा फोटो दाखवून सदर व्यक्ती कुठे असतो अशी विचारणा केली.तेव्हा काही चौकातील लोकांनी चामोर्शी मार्गावर असलेल्या खुशाल कुकुडकर यांच्या घरी किरायाने रहात असल्याचे समजले तेव्हा ते त्याठिकाणी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावून दिसले तेव्हा खिडकी मधून डोकावून पाहले असता त्यांना आत रक्ताच्या थारोळ्यात तो पडलेला दिसला तेव्हा नातलगांनी पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना माहिती दिली.तेव्हा लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व कुलूप तोडून आतमध्ये बघितले असता रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला दिसून दुर्गंधी पसरलेली होती.त्यानंतर पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अहेरी यांना पाचारण केले . त्यांनतर उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी घराच्या सभोवताल फिरुन चौकशी करण्याकरिता उघडलेल्या दारामधून घरात गेले व त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मृतदेहाची दुर्गंधी पसरल्याने ही घटना चार पाच दिवसांपूर्वीची असावी असे बोलले जात आहे. सदर व्यक्तीचा खुन का करण्यात आला व कुणी केला याचा तपास पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी तथा आष्टीचे पोलीस निरीक्षक विशाल काळे व त्यांची चमू करीत आहे. अजूनपर्यंत पूर्ण माहिती कळू शकली नाही.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments