संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
26-04-2024
गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणारा आरोपी भिंगार कॅम्प पोलीसांकडून जेरबंद
अहमदनगर:-
दि.२५/०४/२०२४ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम हा त्याचे कंबरेला गावठी कटटा (अग्नीशस्त्र) लावुन बु-हाणनगर रोडवरील दमडी मशिद जवळ संशयास्पदरीत्या फिरत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ सदर ठिकाणी जावून स्वताची सुरक्षितता बाळगून प्राप्त माहिती आधारे सदर ठिकाणी दोन प्रतिष्ठीत पंचांना घेवुन जावून खात्री करुन व काही आक्षेपार्ह मिळुन आल्यास त्याचेवर कारवाई करा असा तोंडी आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जावून दमडी मशिदजवळ पाहणी केली असता तेथे एक इसम संशयास्पद फिरतांना दिसून आल्याने पंचांची व पोलीसांची खात्री होताच त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीत कंबरेला खोचलेला एक २५२००- रु किं चा लोखंडी पिस्टल मॅगजिन गावठी बनावटीचा कटटा (अग्नीशस्त्र) व दोन जिवंत काडतुस असे आरोपी जाबीर सादिक सय्यद वय-३४ वर्षे रा. घर नं.-६ शहा कॉलनी, गोविंदपुरा, अहमदनगर याच्या कब्जात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याचे विरोधात भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे पोकों/ संदिप थोरात यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर नंबर ४४३/२०२४ आर्म ॲक्ट ३/२५ सह महा.पो.का.क.: (१) (३) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे हे करत आहेत.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments