संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
25-02-2024
अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम 1 मार्च पासून पूर्ववत सुरु होणार
प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर उपोषणाची सांगता
गडचिरोली:-
अखेर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या मध्यस्थीने मार्कंडेश्वर मंदिराचे बांधकाम १ मार्च पासून सुरू होणार असून मुर्लीधर महाराज याचे उपोषण वडेट्टीवार यांनी निंबुपाणी पाजून मागे घेण्यास भाग पाडले आहे
गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर मंदिराची पुनर्बांधणीच्या नावावर तेथील दगडांची उकल करण्यात आली होती. याला एक दशकाचा काळ उलटला असतानाही प्रशासन व पुरातन विभागाने काना डोळा केला. या मंदिराचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्याची मागणी घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी गडचिरोली येथे मोठे जण आंदोलन करून मार्कंडा येथे उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शासनाच्या या दुर्लक्षित धोरणाविरुद्ध मंदिराच्या दुरावस्थेला जबाबदार लोकप्रतिनिधी प्रशासन व पुरातत्व विभागाला खडे बोल सुनावले होते. आज उपोषणाच्या नवव्या दिवशी पुरातत्त्व विभागाने महसूल प्रशासन करवी येत्या 1 मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषणकर्ते संत मुरलीधर महाराज व प्रशासन यांच्या मध्यस्थी करून उपोषणाची सांगता केली.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देव येथे गेल्या हजारो वर्षांपूर्वी चे पुरातन काळातील हेमाडपंथी शिव मंदिर आहे. जशी काशी येथे गंगा नदी उत्तर वाहिनी होते तशीच मार्कंडा देव येथे वैनगंगा नदी ही उत्तर वाहिनी होते. यामुळे या सुप्रसिद्ध मार्कंडेश्वर शिव मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तसेच दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने येथे प्रचंड मोठी अशी यात्राही भरते. मात्र गेल्या नऊ ते दहा वर्षांपूर्वी सदर पुरातन हेमाडपंथी मंदिराची पुनर्बांधणी करणे नियोजनार्थं स्थानिक लोकप्रतिनिधी व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मोठा गाजावाजा करून या मंदिराची दगडे उकलून अडगळीत पाडून ठेवत अर्धवट काम केल्याने लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. भाविकांची प्रचंड श्रद्धा असलेल्या शिव मंदिराच्या पुनर्बांधणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील हरणघाट येथील संत मुरलीधर महाराज यांनी शिव मंदिराच्या अर्धवट बांधकाम संदर्भात दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी गडचिरोली येथे जन आंदोलन करून मार्कंडा देवस्थान येथे उपोषण सुरू केले. तत्पूर्वी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंदिराच्या दुरावस्याथे बाबत गंभीर दखल घेऊन प्रशासनाला व पुरातत्त्व विभागाला प्रसिद्धी मध्यामातून सज्जड इशारा दिला होता.तर आज उपोषणाच्या नवव्या दिवशी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता स्थानिक तहसीलदार प्रशांत घरुडे, पोलीस निरीक्षक चामोर्शी, जन आंदोलन व उपोषण समितीचे पदाधिकारी यांच्याकडून परिस्थिती जाणून घेत जिल्हाधिकारी गडचिरोली व पुरातत्त्व विभागाचे अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे चर्चा करून उपोषणाची गांभीर्य पटवून दिले व मंदिराच्या दुरवस्थेबाबत कळवून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे सांगितले. विरोधी पक्ष नेते वडेट्टीवारांच्या मध्यस्थीनंतर यावर पुरातत्व विभागाने महसूल विभागा करवी उपोषण कर्ते मुरलीधर महाराज यांना लेखी पत्र देऊन येत्या एक मार्चपासून मंदिराचे पूर्ववत बांधकाम सुरू होईल असे पत्र देताच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते निंबुपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे अनु. जमाती प्रदेश अध्यक्ष, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कांकड्यालवार, नंदाताई कोडवते, कवडूजी कुंदावार , सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते, उपोषण समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
आश्वासन पाळा... अन्यथा मोठे आंदोलन
मंदिराची पुनर्बांधणीचा गाजावाजा करत मार्कंडेश्वर मंदिराची दुरावस्था करण्यात आली.याला एक दशकाचा काळ लोटला असून एका संताला मंदिराच्या दुरुस्तीसाठी उपोषणाला बसावे लागले.ही फार मोठी खेदाची बाब आहे.तर देशाच्या ईतर मंदिरासाठी कोट्यावधींचा खर्च करणाऱ्या सरकारने या मार्कंडेश्वर मंदिराला निधी दिला पाहिजे. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी हे या सर्वस्वी जबाबदार आहेत.तर आज पुरातत्त्व विभागाच्या वतीने महसूल प्रशासन हातून लेखी आश्वासन देत येत्या 1 मार्च पासून मंदिराचे बांधकाम पूर्ण करणे बाबत आश्वासन दिले. तर दिलेल्या तारखेस काम सुरू न झाल्यास मुरलीधर महाराज यांच्या सोबत,प्रचंड भाविक व नागरिकांच्या उपस्थितीत विशाल मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी दिला.
तर मंदिरात उपोषणास बसणार.
प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. यामुळे आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शब्दावर मी अन्नत्याग उपोषण मागे घेत आहे. प्रशासनाने मंदिर बांधकामास दिरंगाई केल्यास चक्क मंदिरातच उपोषणास बसणार असे संत मुरलीधर महाराज यांनी यावेळी प्रशासनाला ठणकावून सांगितले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments