अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
21-02-2024
अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम
अहेरी:-
अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम हे कमलापूर दौऱ्यावर असताना आलापल्ली ते पुसूकपल्ली दरम्यान सायंकाळच्या सुमारास दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे कळताच त्यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. एवढेच नव्हे तर अपघातग्रस्ताला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी आपल्या ताफ्यातील एक वाहन सुद्धा दिला
प्राप्त माहितीनुसार गुडडीगुडम येथील शासकीय आश्रम शाळेतील शिक्षिका शाळा सुटल्यावर दुचाकीस्वराच्या पाठीमागे बसून आलापल्लीकडे परत येताना रस्त्यावरील खड्ड्यामुळे नियंत्रण सुटून त्या दुचाकीचा अपघात झाला.मागे बसलेल्या त्या शिक्षिकेच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती.हे दृश्य माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी आपला ताफा थांबवून विचारपूस करत तात्काळ उपचार मिळावा यासाठी स्वतःचं वाहन दिले.
अपघातग्रस्तांना मदत करा असे शासन आणि प्रशासनाकडून नेहमीच आवाहन करण्यात येते.राजे अम्ब्रीशराव आत्राम सारखे व्यक्तिमत्व स्वतः अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात सामान्य नागरिकांसमोर एक उदाहरण घालून दिले आहे.
पुन्हा एकदा राजेंनी दिली माणुसकीची दर्शन
दानशूर म्हणून ओळख असलेले राजे अम्ब्रीशराव आत्राम हे नेहमीच सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात.त्यांच्या दारावर गेलेले कुणीही आजपर्यंत खाली हात परत आले नाहीत.स्वतः उपस्थित नसले तरी त्यांच्यातर्फे आर्थिक मदत दिली जाते.हे जवळपास सर्वांनाच माहीत आहे.आज तर रस्त्यावरील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहन मदतीला देऊन त्यांनी पुन्हा एकदा माणुसकीचा परिचय दिला आहे
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments