समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
30-01-2024
माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार
गडचिरोली:-
माझी तंबाखू मुक्त आदर्श शाळा या नवोपक्रमास जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार देण्यात आला आहे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (महाराष्ट्र) पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल कुरुडचे उपक्रमशील मुख्याध्यापक वकील शेख यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.वकील शेख यांनी जिल्हास्तरावर सादर केलेल्या 'माझी तंबाखूमुक्त आदर्श शाळा' या नव उपक्रमास माध्यमिक गटातून जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.वकील शेख यांनी आपल्या शाळेत राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यभर दखल घेतली जात आहे.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या सभागृह मध्ये प्राचार्य धनंजय चाफले यांच्या हस्ते आणि अधिव्याख्याता डाॅ.विनीत मत्ते,अधिव्याख्याता पुनित मातकर,अधिव्याख्याता वैशाली येग्लोपवार ,विषय सहाय्यक डाॅ.विजय रामटेके यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार सोहळा पार पडला.मिळालेल्या पुरस्काराबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे अधिव्याख्याता तथा आदर्श शाळेचे जिल्हा समन्वय गुलाबराव राठोड,व्यवसाय समुपदेशक डाॅ. प्रभाकर साखरे आणि शाळेतील सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वकील शेख यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments