संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
29-04-2024
एसटी बस महिला वाहकाने केली एका शिक्षकाची पोलीसात तक्रार
सदर शिक्षक करतो नेहमीच हुज्जतबाजी,याला आवर घालणार कोन?
हिंगणघाटः-
दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी हिंगणघाट उमरेड या मार्गावर जाणाऱ्या बस वर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोणे या कर्तव्यावर होत्या त्या वेळी बसमध्ये कही प्रवाशी प्रवास करीत होते. त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिर्सी करीता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे रा. हिंगणघाट हे सिर्सी या गावी जान्या करिता प्रवास करीत होते. त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांचे कडे गेली असता त्यांनी सिर्सी येथील तिकीट घेण्याकरिता दोनशे रुपयाची नोट महिला वाहकाला दिली. प्रवाशी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहका जवळ सुटे पैसे नसल्यामुळे ६० रुपये तिकीटचे कापून १०० रुपये परत केले व उर्वरित ४० रुपये कर्तव्यप्रमाणे तिकीटच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना टिकट देण्यास निघून गेले असता मोहन तीनगासे या शिक्षकाने महिला वाहकाला अपमानस्पद शब्द वापरायला सुरुवात केली जेव्हा जेव्हा ती वाहक तिकिटे देत होती तेव्हा तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
शेवटी सिर्सी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित ४० रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल, तू चोर आहेस, तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जणमाणसात त्या महिला वाहकाची बदनामी केली. आपल्या शिक्षकी पेश्याला काळिमा फसण्याचा प्रकार या शिक्षकाने केला. व पैसे नं घेता निघून गेला.परत आल्यानंतर त्या ४० रुपये लिहून असलेल्या तिकटावर एक शून्य वाढवून ४०० रुपये करून त्या महिला वाहकाची आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे कडे खोटी तक्रार केली. शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी ४० किलोमीटर हिंगणघाट वरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा बस स्थानकावर सुरु होती.
मोहन तिनगासे त्याची वागणूक त्या महिला वाहकाला सहन नं झाल्याने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी बस आगारातील कामगार यांनी केली.यावेळी मोहन तीनगासे यांनी पण बसची महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांच्यावर गंभीर आरोप लावला असून त्याची तक्रार हिंगणघाट बस डेपो अधिकाऱ्याला केली आहे. आता या प्रकरणी पोलीस आणि बस डेपो अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments