आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
09-09-2024
पुरस्कारापेक्षा मला सत्काराच मोठा वाटतो - कविता वाघमारे
अशोक वासुदेव खंडारे/मुख्य संपादक वैनगंगा वार्ता
डोंगरगाव :- पंचायत समिती मंगळवेढा मार्फत मला दिलेल्या आदर्श शिक्षक पुरस्काराप्रित्यर्थ डोंगरगावच्या गावकऱ्यांनी आज माझा जो सत्कार केला तो मला मिळालेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो असे
भावूक उदगार डोंगरगाव शाळेच्या पुरस्कारप्राप्त शिक्षिका कविता वाघमारे यांनी काढले. गावकऱ्यांच्यावतीने आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.मंगळवेढा पंचायत समिती मार्फत दिला जाणारा सन 2024 चा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच वाघमारे यांना आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.त्यानिमित्त गावकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, दैनिक अचूक निदान चे संपादक डी. के. साखरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंकज मस्के, मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी,दत्तात्रय लोहार, विजय भुसे, तुकाराम साखरे, तानाजी साखरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना वाघमारे म्हणाल्या की,माझ्या कार्याची दखल घेऊन आपल्याला हा पुरस्कार दिला असून; पुरस्कारामुळे मला एक नविन ऊर्जा प्राप्त झाली असून यापुढे ही मी अधिक जोमाने काम करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचा आणि शाळेचा विकास करण्याचा प्रयत्न करेन.वाघमारे ह्या गेली 20 वर्षे अध्यापनाचे काम करीत आहेत.त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले असून सध्या त्यांचे अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत.यावेळी विवेक खिलारे, डी. के. साखरे, मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी, सहशिक्षिका अंबिका कर्वे व बाजीराव गवळी सर आदींनी आपल्या मनोगतातून वाघमारे मॅडम यांचा गुणगौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. साखरे यांनी केले तर मुख्याध्यापिका अमृता कुलकर्णी यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments