STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
F
25-02-2024
शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पाडावे
् -प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले
चामोर्शी :-
शिक्षक हा निरंतर विद्यार्थी असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाकरिता शिक्षकांनी सदैव आपले ज्ञान वृद्धिंगत करायला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा उंचावलेल्या आहेत .विद्यार्थी हा व्यावसायिक झाला पाहिजे .त्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारांचा अभ्यास करुन शिक्षकांनी आपले कार्य प्रामाणिकपणे पार पडावे असे प्रतिपादन प्रा.डॉ. विठ्ठल चौथाले यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे चामोर्शी येथील गटसाधन केंद्रामध्ये आयोजित माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून गट समनवयक चांगदेव सोरते , संजय कुनघाडकर , राकेश इनकते , हेमंत पेटकर , शिवराम मोगरकर , प्रमोद भांडारकर , अशोक गजभिये , विवेक केमेकर आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी चांगदेव सोरते म्हणाले अध्यापन करतांना विविध साधनांचा वापर करा.विद्यार्थी हा कृतिशील असला पाहिजे.मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा.आणि मुलांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्नशील असावे असे मत व्यक्त केले.
नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत आठवी ते बारावीला शिकविणाऱ्या शिक्षकांचे सर्वसमावेशक प्रशिक्षण गटसाधन केंद्र चामोर्शी येथे २२ ते २४ फेब्रुवारी पर्यंत आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला चामोर्शी तालुक्यातील सरकारी व खाजगी शाळेतील एकूण ८० शिक्षक उपस्थित होते.
याप्रसंगी प्रशिक्षणार्थी मुख्याध्यापक पालांदूरकर , सुधीर फरकाडे , रुचिता बंडावार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन तज्ञ मार्गदर्शक हेमंत पेटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अर्चना नेरकर यांनी केले.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments