आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
26-02-2025
मार्कंडा (कं) वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यकाविरोधात ग्रामस्थांत रोष, निलंबित करण्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील मार्कंडा (कं) वन परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या विजयनगर, गांधीनगर, कालीनगर या गावातील नागरिकांनी क्षेत्र सहायकाविरुद्ध २४ फेब्रुवारी रोजी तक्रार केली आहे. वन कायद्याच्या आडून क्षेत्र सहायक मारहाण करून धमकावत असल्याचे पुरावे या तक्रारीसोबत दिले आहेत. राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांच्याकडे या भागातील नागरिकांनी निवेदन देऊन गंभीर आरोप केले आहेत. यावेळी विजयनगर येथील अनेक नागरिकांनी एकत्रित येऊन शेकडो नागरिकांच्या सहीनिशी निवेदन दिले. वनक्षेत्र सहाय्यक रमेश बानोत यांच्याविरुद्ध सदरील तक्रार आहे. 'बानोत हटाव विजयनगर बचाव' असा नारा नागरिकांनी दिला व वनक्षेत्र सहाय्यकास निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी, राहुल झोडे, ज्ञानेंद्र विश्वास, जावेद सैयद, मनीषा मडावी, रमेश अधिकारी, नानू उपाध्ये, कृष्णा वाघाडे, भीमराव वनकर हजर होते.
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments