रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
30-04-2024
आष्टी शहरात सामाजिक संस्थांना पाणपोई सुरू करण्याचा पडला विसर
आष्टी - दि. १० (प्रतिनिधी) – वर्षभर विविध उपक्रमाद्वारे सामाजिक कार्याचा डांगोरा पेटवणारे आणि आपल्या नावाच्या पुढे सामाजिक कार्यकर्ते लिहिणारे तथाकथित समाजसेवक यांना यंदाचा उन्हाळा सुरू झाला तरी गोरगरीब,पादचारी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी या बाबीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. आष्टी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आदी भागांमध्ये ग्रामीण भागातील नागरिक - भगिनी मोठ्या प्रमाणावर येऊन या पाणपोईचा वापर करीत असतात . परंतू उन्हाळा सुरू झाला आहे तरीसुद्धा एकही सामाजिक कार्यकर्ता किंवा सेवाभावी संस्थेला पिण्याच्या पाण्याची पाणपोई सुरू करावी, याचे भान राहिले नाही. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपापल्या कामात मशगूल आहेत. वेळीच या पाणपोई सुरू झाल्या की त्याचा निश्चितच फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थ आणि शहरातील पायी चालणारे नागरीक यांना उपयोगी पडणार आहे.
ग्रामपंचायत प्रशासनालाही पडला विसर
आष्टी शहर हे चामोर्शी तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात असून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांची बसद्वारे येथे वर्दळ असते. बस स्टॅण्डवर उतरल्यानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बसस्टापर या पुर्वी आष्टी ग्रामपंचायत कडून १४ एप्रिल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाणपोईचे उद्घाटन करुण पाणपोई सुरू करण्यात येत होती पण यावर्षी उन्हाळा सुरू होऊनही पाणपोई सुरू करण्याचा ग्रामपंचायत प्रशासनाला विसर पडला का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित होत आहे
गोरगरिबांचे, पादचारी लोकांचे, आशीर्वाद आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद जर मिळवून घ्यायचे असतील तर या ठिकाणी पाणपोई त्वरित सुरू करणे हे सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर मतांसाठी गावोगाव फिरून मताचा जोगवा मागणारे तथाकथित पुढारीसुद्धा या पाणपोई पासून दूर आहेत. त्यांनीही पाणपोई सुरू करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments