बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
07-06-2024
एस टी महामंडळाच्या बस मध्ये वाढले चोरीचे प्रमाण,याला आळा घालणार कोण?
गडचिरोली:-
महाराष्ट्र शासनाच्या एसटी बसमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून याला आळा घालणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे
गडचिरोली आगाराची बस गडचिरोली मौशीखाब २ वाजता जाणारी एस.टी. तत्बल साडेतिन वाजता उशिरा सुटली त्यामुळे सदर बसमधे जाणाऱ्यांची तोबा गर्दी झाली. बसमधील गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरट्यांनी दोन व्यक्तींच्या पैसाची चोरी केली. हि घटना आबेशिवणी येण्यापूर्वीच घडली परतु ज्यांची चोरी झाली त्यांना मौशिखाब उतरल्यावर माहीती झाली. गर्दीमधे चोर सापडला नाही. दि. ६ जुन ला गडचिरोली आगारांची बस उशिरा मौशीखाब कडे निघाली त्यामुळे बसमधे प्रचंड गर्दी झाली व या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी लालाजी मेश्राम मौशीखाब यांच्या खिश्यातुन साडेनव हजार रुपयावर डल्ला मारला. लालाजी मेश्राम हा तेंदूपत्ता बोद भरतीवरून गावाकडे मौशीखाबला जात होता.त्याची पुर्ण कमाई चोरीस गेली. जिजाबाई मसराम गोगाव हि लग्नाला जात होती. तिचीही 3 हजार रुपयाची चोरी झाली. सदर बाब बस कंडक्टर यांना सांगीतले परतु चोराला रंगेहाथ कुणीही पकडू शकले नाही त्यामुळे चोरट्याचे फावले. अश्या घटना अनेकदा घडल्या असल्याचे प्रवासांनी सांगीतले. खेडेगावातही
जाणाऱ्या बसमधे चोरी होत असेल तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो आहे
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments