संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
F
20-03-2024
आत्महत्येचा केला बनाव मात्र, पोलीसांनी अवघ्या ४८ तासात खुणाचा केला उलगडा
उसणे घेतलेले पैसे परत करीत नाही म्हणून हत्या करुन मृतदेह झाडाला लटकावला : एटापल्ली तालुक्यातील घटना
एटापल्ली:-
उसने घेतलेले २६ हजार रुपये परत न दिल्याने कारागिराचा खून करुन मृतदेह झाडाला लटकावत आत्महत्येचा बनाव केला मात्र अवघ्या ४८ तासांत या घटनेचा उलगडा करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले आहे. १९ मार्च रोजी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत
प्राप्त माहितीनुसार, संपत लुला दुर्वा (३२) रा. पेठा ता. एटापल्ली असे मयताचे नाव आहे. आशिष कोरामी, सुखदेव मडावी व संजय कोरामी सर्व रा. पेठा यांचा आरोपींत समावेश आहे. तिघेही ३० ते ४० वर्षे वयोगटातील आहेत. संपत दुर्वा हा सुरजागड येथे लोहखाणीत वेल्डर म्हणून काम करीत होता. १७ मार्चला तो काही कामानिमित्य पेठा येथून एटापल्ली येथे गेला होता, पण सायंकाळी घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एकरा फाटा येथे झाडाला दोरीने लटकलेल्या स्थितीत आढळला होता. त्यामुळे घातपाताचा अंदाज होता. उत्तरीय तपासणी अहवालात त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश, एटापल्लीचे उपअधीक्षक चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीसांनी तपासचक्रे फिरवली. पो.नि. नीळकंठ कुकडे, उपनिरीक्षक अश्विनी नागरगोजे, शुभम म्हेत्रे, रोहिणी गिरवलकर, हवालदार हिरामण मारटकर, कालेश पुपरेडीवार, पोलिस शिपाई प्रभाकर नाईक, मोहन शिंदे, पोलीस शिपाई, पंडीत मुंडे, श्रीकांत दुर्गे, कविता एलमुले, प्रकाश गडकर, जोगी मडावी, प्रियंका तुलावी यांच्या पथकाने ४८ तासांत गुन्ह्याची उकल केली.
तिघांचे मिळून २६ हजार उसने
मयत संपत दुर्वा याच्या हत्येचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी सर्व बाजू तपासल्या. यात त्याच्याकडे गावातीलच तिघांचे पैसे उसणे होते, अशी माहिती समोर आली. यातून त्यांच्यात वाद झाल्याची माहितीही मिळाली. हा धागा पकडून पोलिसांनी १९ मार्च रोजी तिघांना ताब्यात घेतले. आशिष कोरामी व सुखदेव मडावी यांचे प्रत्येकी सात हजार रुपये तर संजय कोरामी याचे १२ हजार रुपये उसणे होते. पैसे परत देत नसल्याने त्यांनी संपत दुर्वाला कट रचून संपविल्याचे निष्पन्न झाले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments