अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
03-04-2025
नक्षलवाद्यांनी युद्धविरामाचा केंद्र सरकारपुढे सादर केला प्रस्ताव ?
गडचिरोली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्च २०२६ अखेरपर्यंत देशातून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याचा निर्धार केल्यानंतर सुरक्षा दलांनी महाराष्ट्र व छत्तीसगडमध्ये आक्रमक कारवाया सुरू केल्याने नक्षलवाद्यांनी नांगी टाकली असून केंद्र सरकारपुढे युद्धविरामाचा प्रस्ताव सादर केला आहे. केंद्रीय समिती सदस्य अभय ऊर्फ सोनू भूपती याने यासंदर्भात तेलुगू भाषेत पत्रक जारी करून कारवाया रोखण्याचे सरकारला आवाहन केले आहे. आता याबाबत केंद्र सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा,ओडिशा आणि झारखंडमध्ये नक्षलविरोधी अभियान अधिक गतिमान झाले आहे. गेल्या १५ महिन्यांत झालेल्या चकमकीत तब्बल ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले, शेकडो कारागृहात आहेत, इतकेच नव्हे तर यात अनेक निरपराध आदिवासी मारल्या गेल्याचा दावाही पत्रकात केला आहे. ३० मार्चचे हे पत्रक असून त्यावर देशातील दुसऱ्या क्रमांकाचा नक्षल नेता अभय ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याचा उल्लेख आहे
शोषणाविरोधात आवाज उठविणाऱ्या कार्यकर्त्यांचा सरकारकडून छळ होत आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातदेखील अशाच प्रकारे अनेक कार्यकर्त्यांना कारागृहात डांबले. आदिवासींना पोलिस दलात भरती करून त्यांच्याच हातून आदिवासींची हत्या केली जात आहे, असा गंभीर आरोप पत्रकात केला आहे.
केंद्रापुढे शांती प्रस्ताव ठेवणारा भूपती हा माओवादी चळवळीतील महत्त्वाचा नेता आहे. त्याची पत्नी जहाल माओवादी महिला नेता विमला चंद्रा सिडाम ऊर्फ तारा ऊर्फ ताराक्काचा तो पती तर पश्चिम बंगालमध्ये २०११ मधील चकमकीत ठार झालेला जहाल नक्षल नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे. ताराक्काने १ जानेवारी २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. ४ एप्रिलला केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा छत्तीसगडला संभाव्य दौरा आहे, या दौ-यापूर्वी त्याने केंद्रापुढे युद्ध विरामाचा प्रस्ताव ठेवला आहे.
आदिवासी, अल्पसंख्याकांना लक्ष्य करत आहे. दुसरीकडे जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीसाठी आदिवासी समाज संघर्ष करत आहे. येथील नैसर्गिक संसाधनांवर डोळा ठेवून हे सर्व सुरू असून सरकारने आता थांबायला हवे, असेही पत्रकात म्हटले आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments