बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
28-02-2024
अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी, सतर्क पोलिसांनी दाखविला इंगा
तिन बैलब़डी व अवैध विदेशी दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
गडचिरोली:- अवैध दारू तस्करांनी चक्क बैलबंडीने केली दारू तस्करी मात्र सतर्क पोलिसांनी दाखविला आपला इ़गा व बैलगाडी सह अवैध दारू असा चार लाख बाविस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे
गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असल्याने येथे दारु तस्करी करणारे ईसम पोलीसांची दिशाभुल करण्याच्या उद्देशाने वारंवार नवीन क्लृप्त्या करीत असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे सिरोंचा तालुक्यातील मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्करांनी चारचाकी अथवा दुचाकी वाहनाचा वापर न करता कोणालाही संशय येणार नाही या उद्देश्याने बैलबंडीांचा दारु तस्करीकरीता वापर केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन आले आहे दिनांक 27/02/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मौजा टेकडा (ताला) येथील दारु तस्कर संदिप दुर्गम हा मोठ्या प्रमाणात तेलंगाणा राज्यातून नदीमार्गाने विदेशी दारुची आयात करुन बैलगाडीच्या माध्यमातुन वाहतुक करणार आहे. सदर माहितीबाबत तात्काळ वरीष्ठांना माहिती देवुन त्यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल आव्हाड यांच्या नेतृत्वातील एक पथक गडचिरोली येथुन रवाना करण्यात आले.
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा टेकडा गावालगत असणाऱ्या नदी परीसरात सापळा रचुन त्याच्या दिशेने येणाऱ्या तीन बैलबंडी व पोलीसांचा कानोसा घेण्याकरीता वापरण्यात आलेल्या दुचाकीस ताब्यात घेऊन पाहणी केली असता, सदर तीन्ही बैलबंडी मध्ये मोठ्या प्रमाणात बिअर व व्हिस्की असा विदेशी दारुचा मोठा साठा दिसुन आल्याने सर्व मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. सदर कारवाईदरम्यान पोलीस पथकाने 50 बॉक्समधील 2,52,000/- रुपये किमतीचा विदेशी दारु साठा जप्त केला तसेच दारु तस्करीकरीता वापरण्यात आलेल्या 3 बैलगाडी व ईतर साहित्य 1,70,000/- रुपये किंमतीचा असा एकुण 4,22,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मोक्यावर जप्त करुन उप पोलीस स्टेशन बामणी येथे आरोपी नामे संदिप देवाजी दुर्गम, व्यंकटी बकय्या कोटम, बापु मलय्या दुर्गम, श्रीनिवास ईरय्या दुर्गम सर्व रा. टेकडा (ताला) या चार आरोपीतांना जेरबंद करुन गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, सपोनि राहुल आव्हाड यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार अकबर पोयाम, श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, चापोना/दिपक लोणारे यांनी केलेली आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments