संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
F
02-02-2024
सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी शाळा हे प्रभावी माध्यम - माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार
आष्टी (प्रतिनिधी)##
प्रतिकूल परिस्थितीत शाळेचा विकास घडवून शाळेला नावलौकिक प्राप्त झाला .स्नेहसंमेलन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.शाळा हे सुसंकृत पिढी घडविण्याचे माध्यम आहे.असे प्रतिपादन माजी प्राचार्य प्रमोद दोंतुलवार यांनी केले. राजे धर्मराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातर्फे सांस्कृतिक व बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी आष्टी च्या सरपंच बेबीताई बुरांडे या होत्या तर
तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य अर्जुन दाते ,सेवानिवृत्त प्राचार्य महादेव उरकुडे ,माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार , माजी उपसरपंच सुंदरदास उंदिरवाडे , प्राचार्य एन.एस.बोरकुटे , मुख्याध्यापक केशव खेवले , प्राचार्य डी.डी.रॉय , प्रभारी प्राचार्य रमण पडिशालवार , गोसावी गोंगले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीला धर्मराव शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज ,स्व.राजे सत्यवानराव महाराज , माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
पुढे बोलतांना प्राचार्य दोंतुलवार म्हणाले या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत.विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श समोर ठेऊन यश प्राप्त करावे. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी प्राचार्य दाते म्हणाले नागरिकांनी इंग्रजी शाळेच्या मागे न लागता मराठी शाळेतूनच मुलांना शिक्षण द्यावे .या शाळेतील बरेच विद्यार्थी उच्च पदावर पोहचले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना माजी प्राचार्य उरकुडे म्हणाले विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटी ठेऊन चांगला विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा. सांस्कृतिक कार्यक्रमात आपली छाप उमटवून व शाळेतील विद्यार्थी उच्च पदावर पोहचून शाळेचा नावलौकिक करावे.
याप्रसंगी वर्षभर शाळेमध्ये राबविलेल्या स्पर्धेतील वाचन स्पर्धा , वर्ग सजावट , भाषण स्पर्धा , निबंध स्पर्धा , प्रश्नमंजुषा स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , आदर्श वर्ग स्पर्धा , आदर्श विद्यार्थी व आदर्श शिक्षक यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डी.डी.रॉय यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अनिता नलोडे व प्रा.नारायण सालूरकर यांनी केले
तर आभार प्रदर्शन सुधीर फरकाडे यांनी केले.
कार्यक्रमाला पालक ,गावातील नागरिक , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक अरुण नागुलवार , शिक्षक कृष्णाजी पारखी , शिक्षिका छाया नागुलवार , शिक्षक बाबुराव कत्रोजवार , किशोर गोविंदवार , शिक्षक मंडल , लिपिक बंडोपंत मलेलवार , लिपिक गेडाम , शिपाई बंडोपंत अमलपुरीवार यांचा सत्कार करण्यात आला
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments