आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
10-02-2024
स्वःताच्या विकास कामावर विश्वास नसल्याने ७० वर्षांपूर्वीच्या विकास पर्वावर टिका - आ.अभिजीत वंजारी
कूरखेडा- :
भारताचा स्वातंत्र्यानंतर प्रथम पंधरा वर्षात पंडित जवाहरलाल नेहरू यांचा नेतृत्वात विकासाचा ढाचा उभा करण्यात आला यावेळी दर्जेदार शैक्षणिक, आर्थिक केंद्र तसेच सिंचन सूविधा निर्माण करीत देशाचा विकासाला दिशा देण्यात आली मात्र या तोडीचे कार्य मागील १० वर्षात भाजपा प्रणीत केंद्र शासनाला करता न आल्याने व त्याना स्वतःचाच विकास कार्यावर विश्वास नसल्याने ७० वर्षापूर्वी झालेल्या विकास पर्वावर आज संसदेत टिका करण्यात येत आहे असा घणाघात विधान परिषद सदस्य आ. अभिजीत वंजारी यानी केला
गडचिरोली जिल्हा कांग्रेस पक्षाच्या वतीने येथील किसान मंगल सभागृहात तालुका बूथ पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज करण्यात आले होते यावेळी मेळाव्याचे उदघाटन म्हणून मार्गदर्शन करताना आ. अभिजीत वंजारी बोलत होते कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी जिल्हा कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश महासचिव डॉ. नामदेव कीरसान कांग्रेस आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आ ,डॉ .नामदेव उसेंडी माजी आमदार आनंदराव गेडाम प्रदेश सरचिटणीस डॉ. नितीन कोडवते महीला कांग्रेस प्रदेश सरचिटणीस डॉ. चंदा कोडवते किसान आघाडीचे जिल्हा अध्यक्ष वामनराव सावसाकडे,माजी जिल्हा अध्यक्ष हसनअली गिलानी,लता पेदापल्ली,माजी जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी सेवानिवृत्त पोलीस अधिक्षक निताराम कूमरे, रामदास मसराम माजी जि प सदस्य तथा आविसचे सरसेनापती नंदू नरोटे तालूका यूवक कांग्रेसचे अध्यक्ष गिरीधर तितराम महिला तालूका अध्यक्ष आशाताई तुलावी नगरसेवीका प्राचीताई धोंडणे नगरसेवीका कूंदा तितीरमारे नगरसेवीका हेमलता नंदेश्वर,माजी जि प सदस्य आशाताई कूमरे,माजी प स उपसभापति श्रीराम दूगा, कपील पेंदाम, राजकुमार बावनथळे तथा मोठ्या संख्येत कांग्रेस कार्यकर्ते हजर होते यावेळी नामदेव किरसान यानी मार्गदर्शन करताना सांगीतले की निवडणूक ही व्यक्ति किंवा नेता जिंकत नाही तर निवडणूक जिंकण्याकरीता बूथ स्तरावरील कार्यकर्तांची फळी मजबूत असणे गरजेचे असल्याचे सांगीतले यावेळी डॉ नामदेव उसेंडी माजी आ गेडाम यानी सूद्धा मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालूका कांग्रेस अध्यक्ष जीवन पाटील नाट संचालन जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे तर आभार प्रदर्शन माजी जि प सदस्य प्रभाकर तूलावी यानी केले
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments