अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
F
14-07-2024
अनखोडा येथील पांदण रस्त्याची झाली चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष
आष्टी,
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथील शेतशिवारात जाण्यासाठी पांदण रस्ता असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे मात्र देखभालीअभावी या पांदण रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत.शेतातील उत्पादित माल व शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांना सोयीचे होईल याकरिता पांदण रस्त्यांचा उपयोग होतो. या पांदण रस्त्याचे रोजगार हमी योजनेतून काही प्रमाणात मातीकाम झाले असल्याचे गावकरी सांगतात. तर काही शेतकरी रस्ते अतिक्रमणाने गिळंकृत केले आहेत. हा रस्ता पायवाट म्हणून अजुनही वापरले जात आहेत. या पांदण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पाण्याच्या डबक्यातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात पांदण रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून पांदण रस्त्याच्या दुरूस्तीकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील अनखोडा येथील बस्टापपासून जंगलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्याने पाळीव पशू चारण्यासाठी जंगलात नेण्यासाठी अडचण होत असल्याने गुराखी चराईसाठी नेत नसल्याने घरीच पुर्ण पाळीव पशू ठेवून चाऱ्याअभावी ठेवले जात होते. हि समस्या सोडविण्यासाठी गावातील सरपंच, पोलिस पाटील यांच्याकडे मांडली असता सरपंच, पोलिस पाटील यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन पांदण रस्त्याची पाहणी करून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना समजावून तात्पुरता समस्या सोडवून दिले.तर ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर छोटा पुल फुटलेला आहे. जागोजागी रस्त्यावर पाणी जमा होऊन आहे व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना बैलबंडी नेण्यास त्रास सहन करावा लागत आहे. येथे मुरूम टाकून नुतनीकरण करावे व कायमचं अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
यावेळी गावातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते
निर्मल जल शुद्धतात का वादा
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments