बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
28-01-2024
दत्तक घेतले खासदारानी गाव मात्र विकासापासून कोसो दूर आहे - महेंद्र ब्राह्मणवाडे
गडचिरोली :-
मागील दहा वर्षापासून केंद्रात भाजपची सत्ता आहे, जिल्ह्यातील विद्यमान खासदार अशोक नेते हे भाजपचे आहे खासदारानी दत्तक ग्राम योजने अंतर्गत तालुक्यातील येवली गाव दत्तक घेतले. त्याअर्थी गावातील युवक, महिला शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या खासदाराचे गाव असल्याने गावाचा विकास होईल, गावात विकासाची गंगा वाहू लागेल, तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील असे वाटतं होते मात्र मागील 10 वर्षात या उलट झाले, ना गावाला कोणतीही विशिष्ट ओळख मिळाली नाही कोणत्या तरुणाना रोजगार मिळाले नाही खासदार अशोक नेते तर साधे गावात भेटी सुद्धा दिल्या की नाही याबाबत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शंका उपस्थिती केली आहे.
ओबीसी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतांसाठी भाजप राजकारण करीत आहे आणि ओबीसी समाजाची दिशाभूल करीत आहे असा आरोपही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केला, जय सियाराम कबड्डी क्लब येवली च्या वतीने आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनिय सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, काँग्रेस नेते हसनअली गिलानी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चंने, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, जितेंद्र मुनघाटे, ग्रा.प. शिवनीचे सरपंच किरण ताटपल्लीवार , ग्रा.प.सदस्य चोखाजी बांबोळे, चोखाजी भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, जितेंद्र मुनघाटे, नितेश राठोड, ग्रा.प.सदस्य प्रकाश गेडाम, विजय सोमनकर, से.निवृत्त पोलीस मेश्रामजी, भीमराव मेश्राम, सेमसर, गेडाम, मंडळाचे अध्यक्ष विजय भोयर, प्रमोद पिपरे, संदीप ठाकरे, राहुल काळे, ज्ञानदीप कुद्रपवार, राकेश भोयर, सुशील शर्मा, हर्षद गोहणे, मयूर भोयर, विजय भोयर, स्वप्नील भांडेकर, सुरेश पेडपल्लीवार, निखिल पुण्यप्रेडीवार, सुरज मेश्राम, वृषभ धात्रक, वृषभ भोयर, आदी बहुसंख्येने गावातील नागरिक , खेळाडू उपस्थित होते.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments