संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
08-04-2024
आष्टी ते गोंडपिपरी वैनगंगेच्या पुलावरील खड्डे अजूनही जैसे थे, खासदार व आमदार यांची बघ्याची भूमिका
जनतेला करावा लागतोय जीवघेणा प्रवास
पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि उन्हाळ्यात धुरीचा मारा
आष्टी : -
आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर मागील अनेक दिवसांपासून खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या पुलावरील खड्डे बुजविण्याची मागणी आष्टी शहरातील नागरिकांसह आमदार डॉ. देवराव होळी यांनीही केली होती. तेव्हा अवघ्या आठ दिवसांत वैनगंगा नदी पुलावरील खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होईल असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले मात्र पावसाळा संपला आणि आता उन्हाळा सुरू झाला तरीसुद्धा अवस्था जैसे थे आहे
पुलावरील खड्डे 'जैसे थे' असल्याने शासन जीव गेल्यावरच खड्डे बुजविणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वैनगंगा नदी पुलावर मागील अनेक दिवसांपासून जीवघेणे खड्डे पडले असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील बरेचसे विद्यार्थी विघार्जनाकरीता आष्टी येथील शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत व ते विद्यार्थी,विद्यार्थीनी सायकलने प्रवास करुन शिक्षण घेत आहेत तसेच आष्टी येथील गोडपिपरी तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शेकडो विद्यार्थी जात आहेत. सायकलस्वार विद्यार्थ्यांना पुलावरील खड्डयांमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तसेच गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकही विविध कामांसाठी तसेच रुग्णालयात आष्टी येथे येत असतात. त्यांनासुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने पावसाळ्यात चिखलाचा मारा आणि आता उन्हाळ्यात धुळीचा मारा सहन करावा लागत आहे. त्या खड्ड्यांमुळे एखादे वाहन नदीपात्रात कोसळण्याचा धोका असतो. खड्ड्यांमुळे पुलावर अपघात होऊन जीव गेल्यास याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
सदर खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुलाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते परंतू त्यांनी या बाबींवर लक्ष दिले नाही त्यानंतर आष्टी येथील काही सामाजिक कार्यकर्ते यांनी नदीपुलावरच रास्तारोको आंदोलन केले होते तेव्हा थातुरमातुर काही खड्डे बुजविण्यात आले होते ते अवजड वाहतुकीने काही दिवसातच अवस्था जैसे थे झाली गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव खासदार यांनी या बाबतीत शासकिय अधिकारी यांना कधी सुचीत तर केलेच नाही व स्वतः लक्ष घालून पाहिले सुद्धा नाही अशी मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे व पुलावरील त्या खड्ड्यांची स्थिती 'जैसे थे'राहीली
सदरच्या खड्ड्यांमुळे वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनक्यांचे ,कमरेचे आजार होत असल्याचे दिसून येते आहे
पुन्हा यावर्षीही पावसाळ्यात चिखलाचा मारा खाण्याची वेळ वाहन चालकांवर येईल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments