बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
30-03-2024
आष्टी शहरातील नळ योजना एक महिन्यापूर्वी पासून बंद, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची इलूर कडे धाव
आष्टी : अशोक खंडारे मुख्य संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी शहरातील पाणीपुरवठा नळ योजना एक महिन्यापासून ठप्प पडली आहे पाणी पुरवठा होत नसल्याने शहरातील नागरिकांना ईल्लूरकडे पिण्याच्या पाण्यासाठी धाव घ्यावी लागत आहे. दोन महिन्यापासून शहरवासीयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
आष्टी शहरातील ग्रामपंचायतीमध्ये पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असलेली ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यात ओळख आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी शहरवासीयांना ईल्लूरकडे धाव घ्यावी लागत असल्याने ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ आष्टी शहरवासीयांवर आलेली आहे. आष्टी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वैनगंगा नदी पात्रातून पाणी पुरवठा केला जातो आणि या शहरात तीन पाण्याच्या टाक्या आहेत याच दरम्यान वैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली आहे त्यामुळे दोन महिन्यापासून शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे असे ग्रामपंचायत पदाधिकारी सांगतात पण नदीतील पाण्याची पातळी कमी झाली आहे तर तेथील पाण्याच्या टाक्यातील गाळ उपसा करायला पाहिजे असे शहरवासियांची बोंब आहे.
दोन महिन्यापासून पाणी पुरवठा ठप्प झाला असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याच्या टंचाईने गृहिणींचे मात्र गणित कोलमडून पडले आहे.
वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी होऊन पाणीपुरवठा ठप्प असेल तर शहरात पाण्याअभावी आणीबाणी होवू नये म्हणून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे नदीपात्रातील पाण्याच्या विहीरीतील गाळ उपसा करण्याची गरज आहे असे शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोलल्या जात आहे मात्र या बाबी कडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना कुणीही लक्ष देईना झाले आहेत अशीच स्थिती दिसून येते आहे
पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आष्टी येथील ग्रामस्थांनी इलूर पेपरमील समोरील नळ हा चोविस तास सुरू राहत असल्याने त्या नळाचे पाणी आपल्या घरात पिण्यासाठी आणण्यास लगबग सुरू आहे असे दिसून येते आहे
आष्टी शहरातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सत्यशिल डोर्लीकर यांना शहरातील पाणी पुरवठा एक महिन्यापासून ठप्प का पडला आहे असे विचारले असता त्यांनी वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली असल्याने शहरातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे असे सांगितले
आता प्रश्न असा पडतो आहे की, ऐन उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी पुरवठा बंद झाल्याने गावकऱ्यांनी ससेहोळपड होते आहे तरीसुद्धा ग्रामपंचायत प्रशासन याबाबत उदासीन आहे असेच दिसते आहे
तात्काळ पाणी समस्या दुर करावी अशी मागणी आष्टी येथील ग्रामस्थांनी केली आहे
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments