संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
02-05-2024
गडचिरोली जिल्ह्यात खरचं दारुबंदी आहे काय? बंदी असताना मुबलक प्रमाणात उपलब्ध कशी?
आष्टी परिसरात अवैध दारू विक्री ,कुनाच्या आशिर्वादाने?
जिल्ह्यात दारूबंदी असताना रस्त्यावर दिसतात दारूच्या खाली बाटल्या
आष्टी -:
गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असुन सुद्धा देशी, विदेशी, बिअर च्या बाटला येतात कुठुन ? हे एक पोलीसांना आव्हानच आहे. बिअरच्या बाटल्या चोरट्या मार्गाने आणणे कठीण काम आहे. तरीही अवैध दारू तस्करांनी आपले मार्ग वेगळे शोधले काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे
एकतर बिअरच्या व इंग्रजी दारुच्या दोन लिटच्या बाटल्या मोठ्या असतात बिअर आणुन त्या फ्रिजमधे थंड कराव्या लागतात एवढे कठीण काम अवैध बिअर विक्रेत्यांना करावे लागतात. यावरून गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदिपार करून चोरट्या मार्गाने इंग्लीस व देशी दारू किती प्रमाणात येत असेल यांची कल्पना न केलेली बरी. निवडणुकीच्या काळात पोलीसाची नाकेबंदी होती तरीही एवढा दारुचा पुरवठा गडचिरोली जिल्ह्यात झाला कसा असाही प्रश्न उपस्थित होतो आहे
चामोर्शी तालुक्यातील
आष्टी परिसरात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे तरीसुद्धा पोलीस नेहमी गस्तीवर असताना पुरवठा कसा होतो आहे की,याला जबाबदार पोलीसच आहेत अशी परिसरातील सुज्ञ नागरिकात चर्चा सुरू आहे
आष्टी परिसरातील आष्टी,चंदनखेडी (वन), ठाकरी ,कोनसरी जैरामपूर,मुधोली, चितरंजनपूर अनखोडा,येनापूर , रामक्रिष्णपूर,राममोहनपूर, व बऱ्याच गावात अवैध देशी दारूचे विक्रेते बिनबोभाट पणे दारू विक्री करीत आहेत मात्र पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शांत झोपले आहेत असेच दिसून येते आहे त्यामुळे "तेरी भी चूप व मेरी चुप" असाच प्रकार सुरू आहे हे दिसून येते आहे व यात पोलीसांचे चांगभले होत आहे काय? असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे
सदर बाबीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देतील काय ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यावरून जिल्ह्यात खरचं दारू बंदी आहे की काय ? की बंदीच्या नावाखाली मात्तबरा़चे घर भरण्याच्या धंदा सुरू आहे?
असा विचारात्मक प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील सूजान नागरिकाना पडला आहे.
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments