बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
F
30-01-2025
मराठीचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश
जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
गडचिरोली, दि.३० – मराठी भाषा ही संत ज्ञानेश्वर, तुकाराम आणि समर्थ रामदास यांची भाषा असून तिचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा न्यायालयात आयोजित "मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा" निमित्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या कक्ष क्रमांक ३०६ मध्ये दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या. कुलकर्णी यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर गोंडवाना विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलकंठ पंढरी नरवाडे हे प्रमुख पाहुणे व मुख्य वक्ते म्हणून उपस्थित होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर.आर. पाटील यांचीही विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात मुख्य न्यायिक दंडाधिकारी एस.पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), सी.पी. रघुवंशी, सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे आणि इतर न्यायाधीश मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे संचालन सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्रीमती पठाण यांनी केले. प्रा. डॉ. नरवाडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे न्यायालयीन कामकाजातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले.
यावेळी न्या. कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषा समृद्ध, श्रेष्ठ आणि अभिजात असल्याचे स्पष्ट करत पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, संत ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या कार्याचा उल्लेख केला. मराठी भाषा लोप पावण्याची भीती दूर करण्यासाठी तिचा रोजच्या जीवनात अधिकाधिक वापर व्हावा, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अधिक्षक एस.जे. शेंडे यांनी परिश्रम घेतले. सह-दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. भैसारे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला न्यायालयीन कर्मचारी तसेच वकील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती.
Your car is our responsibility
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments