समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
11-06-2024
भुमी अभिलेख कार्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे 75 वर्षीय वृद्ध शेतकरी करणार उपोषण
गडचिरोली:-
येथील आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा. गडचिरोली यांच्या नावे गडचिरोली येथील जुना
सर्वे नंबर 548/2,549/2 (0.60) हेक्टर आर ही शेती 1995 पासून आहे. त्यांना फेरफार क्रमांक 912,913 असून शेतीवर न विचारता व साधा पत्रही न देता भूमी अभिलेख कार्यालयाने पुनर मोजणी च्या नावाखाली नवीन सातबारा नंबर 513/1 (0.36) व 528/1 (0.24) मुळ मालकाच्या नावाने बनवले. त्यामुळे अजूनही त्या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.सदर शेतकऱ्याला कार्यालयाचे कुठलेही हेलपाटे न मारता त्याचे काम पूर्ण व्हावे याकरिता माजी खासदार अशोक नेते यांनी दोन पत्र कार्यलयाला पाठवले त्याचप्रमाणे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्याचे काम पूर्ण होण्यासाठी तीन पत्र दिले परंतु अधिकारी त्यांच्या पत्राकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे.
सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सर्व लगत धारक शेतकऱ्यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली व काही त्रुटी पूर्ण करुन 8 दिवसात प्रकरण सादर करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली ला उपविभागीय कार्यालयाने अवगत केले मात्र कार्यालयाने अजूनही कुठलीही त्रुटी पूर्ण न करता प्रकरण सादर केला. सातबारा दुरुस्ती च्या नावाखाली होणाऱ्या विलंबास जबाबदार कोण ? व माझ्या नावे नवीन सातबारा केव्हा तयार करून देणार ? या मागणीसाठी त्रस्त वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे (वय 75) रा.
गडचिरोली हे नाइलाजास्तव 24 जून 2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारत असल्याची माहिती उपोषणाच्या पत्रातून दिली आहे. तसेच जो पर्यंत माझा सातबारा भूमी अभिलेख कार्यालयातून सुधारणा होऊन येत नाही तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम राहणार आहे व माझ्या जीवाला काही कमी जास्त झाल्यास सर्व जिम्मेदारी भूमी अभिलेख कार्यालयाची राहील असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर गंभीर प्रकरणाकडे प्रशासन काय पाऊल उचलते याकडे लक्ष लागले असून 75 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला केवळ सातबारा साठी उपोषणाला बसावे लागत असल्याची वेळ आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्न उपस्थित होत आहे. सातबारा साठी वृद्ध शेतकरी उपोषणाला बसणार असल्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्हावासियांचे लक्ष्यही लागले आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments