आयुर्वेदिक पंचकर्म मल्टीस्पेशलिटी क्लिनिक
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
F
03-04-2024
एलसीबीच्या अधिकाऱ्यांनीच मागीतली लाच मात्र सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना लाच मागितल्याप्रकरणी अटक
धुळे : -
धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीकडून हद्दपार कारवाई न करण्यासाठी २ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. धुळे येथे झालेल्या कारवाईने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे (सम्राट चौक, शाहू कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 2, बीड) व पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने (रा. प्लॉट नंबर 58, गंदमाळी सोसायटी, देवपूर, धुळे) व पोलीस हवालदार अशोक साहेबराव पाटील (प्लॉट नंबर 25, मधुमंदा सोसायटी, नकाने रोड, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे
तक्रारदाराने 1 एप्रिल रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेत जावून लाच पडताळणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय सखाराम शिंदे यांनी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करुन रक्कम पोलीस हवालदार नितीन आनंदराव मोहने व अशोक साहेबराव पाटील यांना देण्यास सांगितले. तक्रारदाराने दोन्ही कर्मचार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तडजोडीअंती दिड लाखांची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले व सोमवारी सायंकाळी दोंडाईचा येथील धुळे रस्त्यालगत असलेल्या जैन मंदिरा समोरील मोकळ्या जागेत लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारण्यात आल्याचे एसीबीच्या चौकशी निष्पन्न झाल्यानंतर रात्री उशिरा पोलीस निरीक्षक शिंदे यांना अटक करण्यात आली.
कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण मोरे, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे
काय तुम्ही सुद्धा,उपचार करून त्रस्त झालेले आहेत, तर आम्हाला भेट द्या
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments