RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
F
22-04-2024
गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने मांडले थैमान
घरांच्या छतासह शेतातील रब्बी व भाजीपाला पिकाचं प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल
गडचिरोली ता. २२:-
गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार व सोमवारला (ता.२१/२२) झालेल्या विजांच्या कडकडाटात व वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे तर चामोर्शी तालुक्यातील कढोली येथे विज कोसळल्याने एक मुलगी जखमी झाल्याची घटना घडली आहे
आणि काही ठिकाणी झालेल्या वादळी वाऱ्याने घरांवरील छत उडाले आहेत
रविवारी दिनांक (२१) ला तालुक्यातील कढोली येथे आपल्या घराच्या दारात उभी असताना त्यांच्याच नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने एका १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली.
या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व विज कोसळून जखमी झालेल्या मुलीला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी आष्टी परिसरातील नागरिकांनी केली आहे
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला होता. यातच रविवारी सकाळपासूनच शहर व ग्रामीण भागासह जिल्हाभरात ढग दाटून आले. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारा व विजांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे काही तास विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरातील व तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांचे रब्बी व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. या भागामध्ये गारांचा पाऊस देखील झाला आहे.
जिल्ह्यातच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे भाजीपाला या पिकांबरोबरच आंबा, फळबागा व पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय कढोली येथे वीज पडून १५ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटनाही घडली आहे. काही दिवसापूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यावेळी शेकडो क्षेत्रावरील शेतपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्याबद्दल माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असतानाच त्यातच २१, २२ एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने नुकसान क्षेत्रात आता वाढ झाली आहे. त्यामुळे याचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी केली आहे
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments