ProfileImage
598

Post

4

Followers

3

Following

PostImage

सुपर फास्ट बातमी

Today

PostImage

भाजप कार्यकर्त्यांनी सभेत प्रश्न विचारल्याने मारहाण केल्याचा आरोप


 चिमूर : अधिकृत प्रचाराला सुरुवात होण्यापूर्वीच उमेदवाराच्या समर्थनार्थ आयोजित कॉर्नर सभेत प्रश्न विचारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून मला मारहाण केली, अशी तक्रार केली असता पोलिसांनी स्वीकारली नाही, असा आरोप बोडधा (हेटी) शंकर रामटेके यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केला. भिसी पोलिस ठाणे अंतर्गत बोडधा (हेटी) येथे मांगलगाव येथील सरपंच प्रफुल्ल कोलते यांनी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी रविवारी सकाळी कॉर्नर सभा घेतली होती.

 

या सभेत हा प्रकार घडल्याचे रामटेके यांनी यावेळी सांगितले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्याशी संपर्क साधला असता दोन्ही बाजूने बयान नोंदविले असून त्यांनी तक्रार चौकशीत ठेवण्यात आल्याचे सांगितले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today

PostImage

जंगली हत्तींचा दिभना शेतशिवारात धुडगूस


 

 

 

 

धान पिकांचे नुकसान; शेतकरी सापडले संकटात

 

वडधाः आरमोरी तालुक्यात गेलेला जंगली हत्तींचा कळप पुन्हा पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाला असून शनिवारी कळपाने कुहाडी शेतशिवारात हैदोस घालत दिभना परिसरात एन्ट्री केली आहे. वर्षभरात दुसऱ्यांदा गडचिरोली जिल्हा मुख्यालयानजीक हत्तींचा कळप दाखल झाल्याने वनविभागासह शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे.

 

गडचिरोली तालुक्यांतर्गत येणाऱ्या कुऱ्हाडी येथील प्रतिष्ठित शेतकरी जितेंद्र मुनघाटे यांच्या शेतात हत्तींनी रात्रभर धुडगूस घातला. सध्या जवळपास सर्वच

 

धानपीक कापणीला आले आहेत. याच परिसरात काही शेतकऱ्यांनी खरिपातील धान पिकाची कापणी केली आहे. याच कालावधीत हत्तींनी धुडगूस घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातात आलेले धानपीक हत्तींकडून पायदळी तुडवले जात असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, हत्तीच्या कळपाने मागील काही दिवसांपासून ज्या मार्गाने चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होऊन त्याच मार्गाने पुन्हा परत आरमोरी तालुक्यात प्रवेश केला होता.

 

वनविभागाचे कर्मचारी सुस्त

 

हत्तींनी पिकांचे नुकसान केल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी संबंधित वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता, वन अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मागील दोन वर्षांपासून पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तींकडून नुकसान होत असतानाही या वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी केवळ शेतकऱ्यांना सूचना करताना दिसून येत आहेत. मात्र हत्तींचा बंदोबस्त करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. एखाद्या व्यक्तीने जंगलात जाऊन सरपण आणल्यास त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते. मात्र वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान झाल्यास तत्काळ कारवाई केली जात नाही, हा दुजाभाव नाही का? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पोर्ला वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी याबाबतीत सुस्त असल्याचे दिसून येते.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Today

PostImage

अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाबाबत चुकीची माहिती बिंबवली. मात्र, संविधानाचा भाजप कायम आदर करत आहे


 

 

 आरमोरी : विधानसभा निवडणुकीसाठी एकजुटीने कामाला लागा, कुठल्याही स्थितीत विरोधकांच्या भूलथापांना मतदार बळी पडता कामा नयेत, याची दक्षता घ्या, असे आवाहन ज्येष्ठ सहकार नेते व राज्य सहकार विकास महामंडळाचे अध्यक्ष अरविंद सा. पोरेड्डीवार यांनी केले.

 

येथे महायुतीचे उमेदवार व आमदार कृष्णा गजबे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ५ नोव्हेंबरला पोरेड्डीवार यांच्या हस्ते फीत कापून झाले. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, माजी

 

उपनगराध्यक्ष हैदर पंजवानी, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेटेवार, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, शिंदेसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिलीप मोटवानी, अमीन लालानी आदींची उपस्थिती होती.

 

यावेळी अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान बदलाबाबत चुकीची माहिती बिंबवली. मात्र, संविधानाचा भाजप कायम आदर करत आहे. अपप्रचार होऊ नये, यासाठी कार्यकत्यांनी दक्ष राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पंकज खरवडे यांनी संचालन केले तर अक्षय हेमके यांनी आभार मानले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday

PostImage

अधिकारीच म्हणतात, मोबाइल टॉवर जाळून टाका


 

 

एटापल्ली: येमली येथे एअरटेल कंपनीचा मोबाइल टॉवर उभारण्यात आला आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून सतत सेवा विस्कळीत होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांना फोन केल्यास टॉवर जाळून टाका, असे उत्तर देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

टॉवर बंद असल्याबाबत फोन करून विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचारी फोन उचलत नाही. कंपनीचे अधिकारी रामटेके हे तुम्हाला वाटत असेल तर टॉवर जाळून टाका, असे उत्तर देतात तर सचिन लोंडे हे तुम्हाला काय करायचे ते करा, असे उद्धट उत्तर नागरिकांना देतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. ज्या कंपनीच्या भरवशावर त्यांची नोकरी आहे, त्याच कंपनीचा टॉवर जाळण्यास सांगतात. कंपनीने या दोन्ही अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्र शासनाने कंपनीला टॉवर बांधण्यासाठी अनुदान दिले आहे. तसेच नागरिकांना सेवा देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. टॉवरमधील बिघाड दुरुस्त करावा, अशी मागणी येमलीच्या उपसरपंच पल्लवी विजय खोब्रागडे यांनी केली आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday

PostImage

Chamorshi news: अल्पवयीन मुलीची आत्महत्या


 घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट गटग्रामपंचायत अंतर्गत कुर्दुळ येथे एका अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ३ नोव्हेंबरला रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. ऋती अनिल पचारे (१७, रा. कर्दळ (घोट) असे मयत मुलीचे नाव आहे. तिचे वडील अनिल पचारे यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ऋती व घरातील सर्व जण ३ नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करून ओठ्यावर बसले होते.

 

 त्यावेळेस ऋती ही मोबाइलवर काहीतरी पाहते म्हणून घरात गेली. काही वेळाने लहान बहीण अनुष्का ही घरात गेली असता तिला ऋती ही घराच्या आळ्याला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. तिने कुटुंबीयाला माहिती दिली. तिला फासावरून उतरविले, पण त्याआधीच मृत्यू झाला होता. आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. तपास सहायक निरीक्षक नीलेश गोहणे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday

PostImage

तू मला खूप आवडतेस… मी तुझ्या प्रेमात पडलो… तू जर साथ देशील तर आपण दोघे प्रेमविवाह करु…अन्


नागपूर : अजनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ वर्षीय मुलगी दिव्या (बदललेले नाव) सातव्या वर्गात शिकते. तर आरोपी श्रावण हा मूळचा गोंदियाचा असून कामाच्या शोधात नागपुरात आला होता.

 

दीड वर्षापासून तो अजनीतील एका डेकोरेशन कंपनीत कामाला लागला. त्याच्या वस्तीत राहणारी दिव्या ही शाळेत जात असताना तो तिचा पाठलाग करीत होता. शाळेपर्यंत तो जात होता. तिच्या घरासमोर तासनतास बसत होता. तिच्या घरी कुणी नसताना तो तिला भेटायला घरी गेला. तू मला खूप आवडतेस… मी तुझ्या प्रेमात पडलो… तू जर साथ देशील तर आपण दोघे प्रेमविवाह करु…असे बोलून जाळ्यात ओढले. लग्न करणार असल्यामुळे दिव्यासुद्धा फसली.

 

 

 

दोघांच्याही भेटी-गाठी वाढल्या. घरी कुणी नसताना दोघेही एकमेकांना भेटायला लागले. महिन्याचे वेतन मिळाले की श्रावण तिला चित्रपट, हॉटेल आणि फिरायला घेऊन जायला लागला. त्यामुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.

 

आई-वडिल गाढ झोपल्यानंतर मुलगी मध्यरात्री एक वाजता प्रियकराच्या दुचाकीवरुन घरातून बाहेर पडली. ती सकाळी पाच वाजता घरी परतली आणि तेवढ्यात वडिलांना जाग आली. मुलीला युवकाच्या मिठीत बघताच वडिल संतप्त झाले. वडिलांनी दम देताच तिने प्रियकराने बळजबरी शारीरिक संबंध केल्याची कबुली दिली. या प्रकरणी तक्रारीवरुन अजनी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली. श्रावण राऊत (३०, अजनी) असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.

 

 

मध्यरात्री भेटण्याचा मोह आला अंगलट

श्रावण आणि दिव्याचे शनिवारी मध्यरात्रीला भेटण्याचे ठरले होते. एक वाजता कुटुंब झोपल्यानंतर हळूच चौकात आली. तेथे श्रावण दुचाकी घेऊन उभा होता. त्याने तिला फुटाळ्यावर फिरायला जाण्यासाठी विचारले. तिने नकार दिल्यामुळे डेकोरेशनच्या गोदामात नेले. तेथे दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पहाटे पाच वाजेपर्यंत थांबल्यानंतर दिव्याने घरी सोडून मागितले.

 

 

प्रियकर पळून गेला

श्रावणने पहाटे पाच वाजता दिव्याला घरासमोर सोडले. तिने जाताना प्रियकराला मिठी मारली आणि तेवढ्यात तिचे वडिल लघुशंकेसाठी घराबाहेर आले. मुलीला प्रियकराच्या मिठीत बघताच त्यांचा पारा चढला. दरम्यान, प्रियकर पळून गेला. मुलीला विचारणा केली असता तिने प्रियकर असल्याची कबुली दिली. तसेच प्रियकराने बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचेही वडिलांना सांगितले. या प्रकरण अजनी पोलिसांत तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन प्रियकराला अटक केली.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday

PostImage

महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत उमेदवार म्हणून लढणार जयश्रीताई वेळदा - जराते


 

 

गडचिरोली : भाजप महायुती विरोधात देशपातळीवरील तयार झालेल्या इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचे आदेश दिलेले असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते या आता महाविकास आघाडी - इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.

 

शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चिटणीस भाई ॲड. राजेंद्र कोरडे यांनी पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व उमेदवारांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जे अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत ते इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचेच पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्ष भाजप महायुती विरोधात प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते यांनी दिली आहे.

 

जयश्री वेळदा - जरातेंवर दाखल आहेत ३ गुन्हे 

 

शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांच्यावर वेगवेगळे आंदोलन केल्याबद्दल ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलेली आहे.जयश्री वेळदा यांचेवर एटापल्ली पोलीस स्टेशन येथे भांदवी ३६५, भांदवी १८८, १४३, २७९ म.पो.का. ३७(१), (३), १३५ असे दोन तर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवी १८८ म.पो.का.१३५ असा एक गुन्हा दाखल असून अहेरी व गडचिरोली न्यायालयात सदर प्रकरणे प्रलंबित आहेत. गडचिरोली विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकांसाठी काम करतांना, आंदोलन करतांना गुन्हे दाखल असलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. जल, जंगल, जमीन आणि खदानविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांपेकी एक असलेल्या जयश्री वेळदा यांनी भाई रामदास जराते यांचेसह २०१७ मध्ये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविलेले आहेत हे विशेष!


PostImage

सुपर फास्ट बातमी

Yesterday

PostImage

उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप


 

 

गडचिरोली दि. 5 (जि.मा.का.) : विधानसभा निवडणूकसाठी आरमोरी मतदारसंघातून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. या सर्व उमेदवारांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक चिन्हाचे वाटप केले आहे.

विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:  

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : अनिल (क्रांती) तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी (हत्ती), कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी (कमळ), रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस (हात). 

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी -कांशी राम (किटली), मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर).

इतर उमेदवार : आनंदराव गंगाराम गेडाम,अपक्ष (बॅट), खेमराज भाऊ नेवारे- अपक्ष(ऊस शेतकरी), डॉ. शिलु चिमुरकर पेंदाम- अपक्ष (रोड रोलर).

 

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ:

राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्षाचे उमेदवार : 

मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस (हात), डॉ. मिलिंद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी (कमळ), संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी(हत्ती)

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : जयश्री विजय वेळदा- पीझन्टस् ॲन्ड वर्कर्स् पार्टी ऑफ इंडिया (ऊस शेतकरी), भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर), योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी (करवत).

इतर उमेदवार : दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष (ऑटो रिक्शा), बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष(बॅट), डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष (शिट्टी)

69- अहेरी विधानसभा मतदार संघ: अत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(घड्याळ), अत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार (तुतारी वाजवणारा माणूस), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी (हत्ती), संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन).

नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार : निता पेंटाजी तलांडी- प्रहर जनशक्ती पार्टी(बॅट). 

इतर उमेदवार : आत्राम दिपक दादा – अपक्ष (टेबल), कुमरम महेश जयराम- अपक्ष(अंगठी), गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष (स्टूल), नितीन दादा पदा- अपक्ष (कढई), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष(ऑटो रिक्शा), लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष (ट्रम्पेट), हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष (रोड रोलर).

00000


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 4, 2024

PostImage

गडचिरोली जिल्ह्यात 11 उमेदवारांची माघार


 

29 उमेदवारांमध्ये लढत

आरमोरी-8, गडचिरोली-9 आणि अहेरीतून-12 उमेदवार रिंगणात

 

गडचिरोली दि. 4 (जि.मा.का.) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण 11 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले. यामुळे आता आरमोरीतून 8, गडचिरोलीतून 9 आणि अहेरीतून 12 उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.

 67-आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी, वामन वंगनुजी सावसाकडे, निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी, 68-गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम, डॉ. देवराव मादगुजी होळी, मोरेश्वर रामचंद्र किनाके, वर्षा अशोक आत्राम, विश्वजीत मारोतराव कोवासे या 5 उमेदवारांनी आणि 69- अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. 

 

 उमेदवार आहेत रिंगणात :नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव, पक्ष पुढीलप्रमाणे आहे

67-आरमोरी विधानसभा मतदार संघ:  

रामदास मळूजी मसराम- इंडियन नॅशनल काँग्रेस, कृष्णा दामाजी गजबे- भारतीय जनता पार्टी, आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष, शिलू प्रविण गंटावार- अपक्ष, मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी, चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम), अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष.

68-गडचिरोली विधानसभा मतदार संघ: मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस, डॉ. मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी, संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी, जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी, योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना गणतंत्र पार्टी, दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष, बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष, डॉ. सोनल चेतन कोवे- अपक्ष 

69- अहेरी विधानसभा मतदार संघ:आत्राम धरमरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा – नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी, संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना, निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी, आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष, कुमरम महेश जयराम- अपक्ष, गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष, नितीन कविश्वर पदा- अपक्ष, राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष, लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष, हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष

00000


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 4, 2024

PostImage

Brahmpuri news: धानाचे पूजने गावातील डासखोर नागरिकाने जाळले


 

ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील अवघ्या पाच कि. मी अंतरावरील असलेला झिलबोडी येथील रहिवाशी देविदास दमके यांचे अंदाजे दोन-तीन ऐकरातील धान कापून बांधून जमा केलेले धानाचे पूजने याच गावातील डासखोर नागरिकाने जाळल्यामुळे दमके या अत्यंत गरीब कष्टकरी

 

शेतकरी यांची भरून न निघनारी हानी झाली आहे. या जळालेल्या पुजन्यापासुन पंचेवीस ते तीस पोते धानाचे उत्पादन होण्याचा अंदाज होता. या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली चौकशी सुरू केली आहे. या कालावधीत दोन तीन दिवस दिवाळीच्या शासकीय सुट्ट्‌या असल्यामुळे महसूल अधिकारी यांना सूचना देण्यात आली नाही.

 

अज्ञात आरोपीवर कारवाईची मागणी

 

ऐन हातात आलेले पिक जळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जळालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी देविदास दमके यांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्यामुळे सदर प्रकरणाची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली नाही तरी संबधीत प्रकरणाची चौकशी करून व अज्ञात आरोपी वर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला यावा अशी मागणी केली आहे. (ता.प्र.)

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 4, 2024

PostImage

दारूच्या नशेत महिलेने कापला पतीचा प्रायव्हेट पार्ट


दिल्ली, . राजधानी दिल्लीत पतीसोबत भांडण झाल्यानंतर एका महिलेने नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापून पळ काढला. पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिस आरोपी महिलेचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित पुरुष बिहारच्या मधुबनी येथील रहिवासी आहे. चार-पाच महिन्यांपूर्वीच तो पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाला होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पत्नीने आपले गुप्तांग कापले, असा आरोप पीडित पतीने केला आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, पीडित पतीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी महिला सध्या फरार असून तिला पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

दिवाळीच्या रात्री पती-पत्नीमध्ये भांडण 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 ऑक्टोबर आणि 01 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 2:34 वाजता रूप नगर पोलिस स्टेशनला एका महिलेने आपल्या पतीचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून पळ काढल्याची माहिती मिळाली.

 

 

दारूच्या नशेत केला नवऱ्यावर हल्ला

दिवाळी पाडव्या दिवशी पीडित विष्णूचा जबाब नोंदवण्यात आला. पीडित विष्णूने आपल्या जबाबामध्ये सांगितले की, तो बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी आहे. आणि 4-5 महिन्यांपूर्वी पत्नीसह दिल्लीला शिफ्ट झाले. तो शक्तीनगर येथील पीजीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो. 31 ऑक्टोबरच्या रात्री तो दारूच्या नशेत होता. काही कारणावरून त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणानंतर त्याची पत्नी घरातून निघून गेली आणि तो झोपायला गेला. काही वेळाने त्यांच्या पत्नीने घरात घुसून त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार वस्तूने वार केले. या घटनेनंतर त्याची पत्नी फरार झाली. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 4, 2024

PostImage

Kurkheda news: भगवानपुरातील कोंबड बाजारावर छापा 9 आरोपींना अटक; कुरखेडा पोलिसांची धडक कारवाई


 

कुरखेडा, (ता. प्र.). कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर येथे सुरू असलेला कोंबडबाजारावर शनिवारी (दि. 2) कुरखेडा पोलिसांनी छापा टाकून 9 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून कोंबड्यांसह जुगारावर लावलेली रोख रक्कमही जप्त केली आहे. कुरखेडा तालुक्यातील भगवानपूर येथे कोंबडबाजार भरवला जातो. हा कोंबडबाजार परिसरात प्रसिद्ध आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 2) बलिप्रतिपदानिमित्त येथे कोलडबाजार भरविला असल्याची माहिती कराया बाजारावर छापा टाकून 9 आरोपींना अटक केली. यात आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील रहिवासी छोटू अरुण बोदेले (30), कुरखेडा तालुक्यातील शिरपूर येथील रवींद्र चिंतामण मडावी (35), कढोली येथील समीर दिवाकर कोडाप (22), शिरपूर येथील हंसराज रामलाल मडावी (31), गुरनोली येथील रमेश दशरथ काटेंगे (40), देऊळगाव येथील प्रणीत माधव गहाल (29), शिरपूर येथील मनोज गुणाजी कबाडकर (35), देऊळगाव येथील तौमेश्वर गजानन खुणे (41) व भगवानपूर येथील सुखदेव श्रावण कुमरे (38) यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून कोंबडे व रोख असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र कांबळे, प्रभू पिलारे, संतोष कांबळे, संदेश भैसारे यांनी केली. कुरखेडा पोलिसांच्या या कारवाईने तालुक्यातील कोंबड बाजार भरविणाऱ्यांना धडकी भरली आहे.

 

दारूविक्रेत्यांवर गुन्हा दाखल

 

कुरखेडा पोलिसांनी अवैध धंद्यांवि रोधात कारवाईचे धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी दारूविक्रेतेव तस्करांवर कारवाई करून दारूसह मुद्देमाल जप्त केला. तालुक्यातील कुरखेडा-नान्ही मार्गावर कारवाई करत पोलिसांनी अवैध दारूसह 26 हजार 10 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत इडदा रहिवासी धीरज युवराज ताराम व तुषार शामराव नैताम यांच्यावर कारवाई केली. तसेच उराडी जवळील वासी टोला मार्गावर 83 हजार 500 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरमोरी येथील रामनगर वॉर्डातील तुषार देविदास मेश्राम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पीएसआय मोंबे, पोलिस हवालदार नरसिंग कोरे, मेश्राम, शेखलाल मडावी, प्रदीप मासरकर यांनी केली. तालुक्यातील सोनसरी येथे पोलिसांनी कारवाई करून 10,250 रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी राजेंद्र नामदेव दहीकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गेवर्धा मार्गावर कारवाई करत 14 हजार 450 रुपयांची दारू जप्त केली. याप्रकरणी येडापूर येथील सुजित सुशील बिस्वास याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Gadchiroli news: मुले पळविणारी टोळी सक्रिय ? पालकांमध्ये खळबळ


 

पालकांमध्ये खळबळ; जिल्हानजीकच्या नवेगाव येथे प्रयत्न फसला

 

गडचिरोली, ब्युरो. सद्यः स्थितीत दिवाळीचा उत्सव सुरू असून सर्वसामान्य नागरिक दीपोत्सवात मग्न आहेत. यात बालगोपालांचाही समावेश आहे. पालक वर्ग दीपोत्सवात व्यस्त असताना बच्चेकंपनी मौजमस्तीत दंग आहेत. अशातच जिल्हास्थळ असलेल्या गडचिरोली परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 2) दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्हास्थळपासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे अज्ञात इसमाने 12 वर्षीय बालकास बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न बालकाच्या धाडसामुळे फसला. मात्र, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लक्ष्मीपूजनानंतर शनिवारी शहरासह ग्रामीण भागात (बलीप्रतिपदा) गायगोधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान जिल्हास्थळापासून चंद्रपूर मार्गावर 5 किमी अंतरावर असलेल्या नवेगाव येथे तोंडावर रुमाल बांधलेल्या एका अज्ञात इसमाने घरातील अंगणात खेळत असलेल्या 12 वर्षीय बालकास चॉकलेटचे आमिष दाखविले.

 

 बालक घराबाहेर येताच तोंड तसेच हात दाबून त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने इज्ञात इसमाच्या हाताला चावा घेत स्वतःची सुटका करून घेत घराकडे धाव घेतली. आपल्यावर घडलेली आपबिती बालकाने कुटुंबीयांना देताच एकच खळबळ निर्माण झाली. गांभीर्य लक्षात घेता पालकाने याची माहिती गडचिरोली पोलिसांना दिली. सद्यःस्थितीत दिवाळी सणानिमित्त प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहेत. काही अज्ञात व्यक्ती (मुले पळविणारी टोळी) फायदा घेत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. समयसूचकतेमुळे बालकाला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला गेला असला तरी या घटनेमुळे जिल्हास्थळ परिसरात मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने घेत या टोळीचा पर्दाफाश करावा, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

 

अज्ञाताने घेतली होती विशेष खबरदारी: मुले पळविणाऱ्या टोळीतील अज्ञात इसमाने बालकास पळवितांना विशेषखबरदारी घेतल्याचे एकंदरीत घटनास्थळावरून स्पष्ट होत आहे. अज्ञात इसमाने नवेगाव येथील संबंधित बालकाच्या घरासमोरील गेटवर येऊन बालकास चॉकलेटचे आमिष दाखवून घराबाहेर बोलाविले. त्यानंतर त्याचे तोंड व हात दाबून घेत त्याला पळवून नेले. यादरम्यान त्याने तोंडाला रुमाल, डोक्यावर टोपी घातली असल्याचे बालकाने सांगितले.

 

सीसीटीव्हीमध्ये आढळून आला इसम संबंधित बालकाच्या पालकाने घरासमोरील चंद्रपूर मार्गस्थित काही दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता काळा पेंट, हिरवा शर्ट, डोक्यावर टोपी घातलेला तसेच तोंडाला रुमाल बांधलेला स्थितीत असलेला अज्ञात इसम येताना दिसून आले. मात्र फुटेजमध्ये चेहरा स्पष्ट होत नसल्याने इसमाची ओळख पटविणे शक्य होऊ शकले नाही. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजवरुन चंद्रपूर मार्गावर एक चारचाकी उभी असल्याचे तसेच इसम संबंधितांना इशारा करीत असल्याचेही निर्देशनास आले. यावरुन यात आणखी काही आरोपी असल्याचे स्पष्ट होत आहे.

 

जिल्हा पोलिस प्रशासनाचीअसंवेदनशीलता

 

बालकास पळविण्याचा प्रयत्न फसल्यानंतर संबंधित पालकाने यासंदर्भात तक्रार देण्यासाठी गडचिरोली पोलिस ठाणे गाठले असता ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल न करता उलट पालकास संबंधित घटनेचे फुटेज भागविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने घटनास्थळ गाठून विशेष चौकशी करणे गरजेचे होते. मात्र, याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनाने दाखविलेली असंवेदनशीलता पोलिस विभागाच्या कार्यप्रणालीवरप्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे.

 

 

 

अज्ञाताने चाकू दाखवून मारण्याची दिली धमकी

 

संबंधित 12 वर्षीय बालकाने सांगितलेलेल्या आपबितीनुसार तोंडाला रुमाल बांधून असलेल्या अज्ञात इसमाने बालकास चॉकलेट आमिष दाखवून घराबाहेर काढले. बालक घराबाहेर येताच हाताने तोंड दाबून तसेच हात बांधून त्याला नेले. दरम्यान घरापासून काही अंतरावर जाताच बालकाने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता इसमाने चाकूचा धाक दाखवित तुझ्यासह तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकण्याची धमकी दिल्याची माहिती आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Armori news: अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस आरमोरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या


 

आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, पाच दिवसांची पोलीस कोठडी

 

आरमोरीः फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर शारिरीक सबंध ठेऊन अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस आरमोरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुजित कैलास गेडाम (२२) रा. मोहाडी ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर असे आरोपीचे नांव असून त्याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी सुजित गेडाम व पीडितेची ओळख मागील ४ ते ५ महिन्यापुर्वी फेसबुक वरून झाली. दोघांची बोलचाल सुरू झाली. याचे रूपांतर प्रेमात झाले. आरोपीने पीडित मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करून पीडितेला आपले गावी भेटण्यास बोलाविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अल्पवयीन पीडितेस पळवून नेले.

 

या संदर्भात आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीचे तक्रारीवरून व पीडितेचे बयान ग्राह्य धरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात पोस्को अंतर्गत कलम ४,६,८,१२ तसेच भारतीय न्याय संहिता ६४(१), ६४ (२) (i), ६४(२) (२)८७, १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरमोरी पोलिसांनी दि. ३१ ऑक्टोबर रोजी आरोपीस त्याच्या मोहाडी गावावरून ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कैलास गवते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोहूर्ले करीत आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

घरकुल योजनेवरून दोन सख्ख्या भावात वाद ,रागाच्या भरात थोरल्याने केली धाकट्याची हत्या


 

पालघरः वीज बिल आणि सरकारी योजनेवरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने धाकट्या भावाची हत्या केली. पालघर जिल्ह्यातील साकळे पाडा गावात ही घटना गुरुवार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 

चंद्रकांत जीतू पाटील असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर,सतीश जितू पाटील असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी घरकुल योजनेचा लाभ आणि घरातील वीज बिलावरून चंद्रकांत आणि सतीश यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका पेटला की, रागाच्या भरात सतीने चंद्रकांतवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात चंद्रकांत जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच सातपाटी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि सतीशला अटक केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार


 

 

आठ महिने उलटूनही आरोपीला अटक नाही

 

• मुंबई, (वा.) कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून अभिनेत्रीवर बलात्कार करण्यात आलेल्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन आठ महिने उलटले तरी अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पीडित महिला गेल्या आठ महिन्यांपासून पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत असूनही तिला न्याय मिळत नसल्याची घटना समोर आली आहे. पोलिस आरोपीला अटक करण्याचे धाडस का दाखवू शकत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पॉर्न फिल्म्समध्ये काम करणारा अभिनेता गौरव सिंग राजपूत (२८) याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीवर त्याच्या ३४ वर्षीय सह-अभिनेत्रीवर शूटिंगदरम्यान कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर त्याने तिचे अश्लील व्हिडीओ बनवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार बलात्कार केला असा या अभिनेत्रीचा आरोप आहे. पीडित अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार करून आठ महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही.

 

राजस्थानमध्ये गुन्हा या संदर्भात ओशिवरा पोलीस ठाण्याचे पोलीस

 

निरीक्षक गणेश गायके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आरोपीने या अभिनेत्रीसोबत राजस्थानमध्ये हा गुन्हा केला आहे. आम्ही एफआयआर नोंदवला असून पुढील तपासासाठी हे प्रकरण राजस्थान पोलिसांकडे वर्ग केले जाणार आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Bihar news: पैसे घ्या पण 'योग्य' उमेदवार निवडा


 

 

पटणा, . प्रशांत किशोर यांनी बिहारच्या मतदारांना एक अनोखे आवाहन केले आहे, ज्यात त्यांनी पैसे घेऊन मतदान करणाऱ्या मतदारांना पैसे घ्या पण पैसे देणाऱ्यांना मतदान करण्याऐवजी योग्य उमेदवाराला मतदान करा असे सांगितलं आहे. मत देण्यासाठी कोणी पैसे देत असेल तर ते घ्या, कारण तो तुमच तुमचाच पैसा आहे, जो राजकारण्यांनी लुटला आहे असा टोलाही प्रशांत किशोर यांनी लगावला. तसेच विरोधी पक्षांनी दिलेला पैसा घेण्यात काही गैर नाही, कारण तो जनतेचा पैसा आहे, मात्र जनतेने मतदानाच्या वेळी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे असेही म्हटले आहे. प्रशांत किशोर लोकांना म्हणाले की, विरोधक पैसे देत असतील तर ते नक्की घ्या, पण मतदानाच्या दिवशी आत जाऊन जन सुराज्यच्या बाजुने मतदान करा.

 

 

कोणी 500 रुपये देतील, कुणी दोन हजार रुपये देतील. मात्र हा पैसा सर्वसामान्य जनतेचा असून, इंदिरा आवास, रेशन कार्ड आणि अन्य योजनांमध्ये लाच म्हणून घेतला गेला आहे. नेत्यांनी 5 वर्षे जनतेचा पैसा लुटला आणि आता तोच पैसा निवडणुकीत थोडा थोडा देऊन मते विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेच्या विश्वासाचा गैरवापरकरणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्याची ही संधी असल्याचे प्रशांत किशोर यांनी जनतेला सांगितले.

 

जन सुराज्यच्या समर्थनार्थ सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन केले आणि जनतेच्या निर्णयानेच नवीन व्यवस्थेची आणि सुशासनाची सुरुवात शक्य असल्याचे आश्वासन दिले.

 

प्रशांत किशोर यांनी लालू यादव आणि नितीश कुमार यांच्यावर थेट हल्लाबोल करताना म्हटले की, हे लोक बिहारमध्ये 35 वर्षांपासून सत्तेत आहेत, मात्र बिहारच्या शेतकऱ्यांना आजपर्यंत शेतीसाठी जमीन देण्यात आलेली नाही. आता वेळ आली आहे की, बिहारमध्ये एक नवीन व्यवस्था बनवायला हवी, जी प्रत्यक्षात जनतेच्या हिताला प्राधान्य देईल.

 

निवडणुकीत सल्ला देण्यासाठी 100 कोटी घेतो

 

जनसुराज्य पक्षाचे संयोजक तथा माजी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी स्वतः संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. किशोर म्हणाले, जेव्हा आपण निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करत होतो. तेव्हा केवळ एका निवडणुकीत कुठल्याही पक्षाकडून अथवा नेत्याकडून सल्ला देण्यासाठी 100 कोटी अथवा त्याहूनही अधिक शुल्क घेत होतो.  प्रशांत किशोर यांनी विहारच्या बेलागंज येथे होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुरुवारी हा खुलासा केला. प्रशांत किशोर हे गुरुवारी बेलागंजमध्ये जन सूराज्यचे उमेदवार मोहम्मद अमजद यांच्या समर्थनार्थ प्रचार करत होते.  यावेळी, आपण प्रचारासाठी पैसा कुठून आणतात, असा प्रश्न आपल्याला नेहमीच विचारला जातो? तर आपण निवडणुकीमध्ये पक्षाच्या कोणत्याही नेत्याला सल्ला देण्यासाठी 100 कोटींहून अधिक शुल्क आकारतो, असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Nagpur news: डॉक्टर पतीचे चार तरुणींशी अनैतिक प्रेमसंबंध


नागपूर : वैद्यकीय शिक्षण घेताना युवक वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडला. दोघेही डॉक्टरची पदवी घेऊन बाहर पडताच प्रेमविवाह केला. मात्र, त्याच महाविद्यालयातील अन्य चार तरुणीशीही त्याचे अनैतिक संबंध असल्याचे उघडकीस आले. संसार तुटण्याच्या मार्गावर असतानाच पत्नीने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. समूपदेशनानंतर त्यानेही प्रेमप्रकरणाची कबुली दिली आणि भविष्यात अनैतिक संबंध न ठेवण्याचे पत्नीला वचन दिले. अशाप्रकारे डॉक्टर दाम्पत्याचा संसार पुन्हा फुलला.

 

सुनील आणि श्वेता (बदललेले नाव) हे दोघेही एकाच वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. दोघेही अभ्यास हुशार होते. शिक्षण घेताना सुनीलने तिच्याशी मैत्री केली. दोघांची मैत्री काही दिवसांत प्रेमसंबंधात बदलली. त्यांनी पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान, दोघांचेही प्रेमप्रकरणाची महाविद्यालयात मोठी चर्चा होती. डॉक्टरची पदवी घेतल्यानंतर सुनील आणि श्वेता यांनी कुटुंबियांच्या परवानगीने प्रेमविवाह केला. तो धरमपेठमधील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नोकरी करायला लागला तर श्वेताने स्वतःचे क्लिनिक उघडले. वर्षभर संसार सुरळीत सुरु होता. त्यांना एक गोंडस बाळ झाले आणि काही दिवसांतच सुनीलचा स्वभाव बदलला. तो उशिरा घरी यायला लागला आणि तो बरेचदा मोबाईलवर कुणाशीतरी बोलत राहायचा. त्यामुळे श्वेताला त्याच्यावर संशय आला. त्याला जुगाराचा नाद लागला आणि कर्जसुद्धा काढले. पगारही तो जुगारात गमवायला लागला. कर्ज मागणाऱ्यांचे धमक्यांचे फोन आणि काही जण थेट घरापर्यंत यायला लागले. त्यामुळे घरात वाद-विवाद सुरु झाले. शेवटी श्वेता घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचली.

 

 

 

पतीचे चार तरुणींशी प्रेमसंबंध

डॉ. सुनीलचे दोन वर्गमैत्रिणींशी प्रेमप्रकरण सुरु असल्याची माहिती पत्नी डॉ. श्वेता हिला मिळाली. तिने दोन्ही डॉक्टर मैत्रिणींची समजूत घालून संसारात विघ्न न घालण्याची विनंती केली. मात्र, पती मानायला तयार नव्हता. तसेच हॉस्पिटलमधील एक महिला डॉक्टर आणि एका परिचारिकेशीही त्याचे प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आली. त्यापैकी एका डॉक्टर महिलेला तर लग्नाचेही आमिष दाखविल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पत्नीने डोक्यावर हात मारुन घेतला.

 

 

समूपदेशनाने संसार फुलला

डॉ. सुनीलविरुद्ध पत्नी डॉ. श्वेताने रितसर लेखी तक्रार भरोसा सेलला केली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी त्याला भरोसा सेलमध्ये बोलावले. जयमाला बारंगे यांनी डॉ. सुनीलचे समूपदेशन केले. तो प्रेमप्रकरण असल्याचे मान्य करीत नव्हता. शेवटी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केला असता सत्य स्थिती उघडकीस आली. त्यामुळे डॉ. सुनीलने चारही तरुणींशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. त्या चारही तरुणींची पोलिसांनी समजूत घातली. त्या तरुणींनीही डॉ. सुनीलचा नाद सोडला तर त्यानेही प्रेमसंबंध संपविण्याचे वचन पत्नीला दिले. भरोसा सेलच्या प्रयत्नाने दोघांचाही सुखी संसार पुन्हा फुलला.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Armori news : लोकसभा असो की विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात - माजी आमदार आनंदराव गेडाम यांची टीका


गडचिरोली : लोकसभा असो की विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गडचिरोलीत कायम हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील नेत्यांना डावलून परस्पर निर्णय घेतात. इतके वर्ष प्रामाणिकपणे पक्षात कार्य करूनही आमची कोंडी होत असेल तर वेगळा मार्ग का निवडू नये, असा सवाल उपस्थित करून आरमोरीचे माजी आमदार आनंदराव गेडाम ची यांनी आपण अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

जिल्ह्यातील तिन्ही विधानसभेत सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. उमेदवारी न मिळाल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता आहे. यात आरमोरी विधानसभेतून काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी बंडाचे निशाण कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्यावर टीका केली आहे. याठिकाणी काँग्रेसने माजी आमदार गेडाम यांना डावलून रामदास मसराम यांना संधी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असेलेले माजी आमदार आनंदराव गेडाम, वामनराव सावसागडे, डॉ. शिलू चिमुरकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, पक्षाकडून नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न होत आहे. यासंदर्भात माजी आमदार आनंदराव गेडाम यांना विचारणा केली असता त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, वडेट्टीवार नेहमीच गडचिरोली जिल्ह्यात हस्तक्षेप करतात. जिल्ह्यातील आदिवासी नेत्यांकडे दुर्लक्ष केल्या जाते. आम्ही देखील इतके वर्ष पक्षासाठी काम केले. पण वडेट्टीवारांकडून आमची कायम कोंडी केल्या जाते. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीत देखील हाच प्रकार झाला. सर्वच दृष्टीने मी पात्र असताना देखील एका नवख्या आणि निष्क्रिय व्यक्तीला संधी देण्यात आली. हे केवळ वडेट्टीवार यांच्या हस्तक्षेपामुळे झाले. अशी टीका करून गेडाम यांनी अपक्ष अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. गेडाम यांच्या बंडामुळे आरमोरीत काँग्रेसला मत विभाजनाचा फटका बसू शकतो, असे जाणकार सांगतात. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

 

अहेरी, गडचिरोलीतही आव्हान

जिल्ह्यात केवळ आरमोरीच नव्हे तर अहेरी आणि गडचिरोलीत देखील काँग्रेस समोर बंडखोरांचे आव्हान आहे. गडचिरोलीत विश्वजीत कोवासे, डॉ. सोनल कोवे तर अहेरीत हणमंतू मडावी आणि नीता तलांडी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यातून कोवासे, कोवे हे माघार घेऊ शकतात पण मडावी आणि तलांडी ठाम आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला याचा फटका बसू शकतो. बंडखोरांची समजूत काढण्यासाठी काँग्रेसचे काही महत्त्वाचे पदाधिकारी उद्या गडचिरोलीत येणार आहे. त्यांच्या भेटीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Nov. 3, 2024

PostImage

Armori news: माजी आमदार आदरणीय हरिरामजी आत्मारामजी वरखडे साहेब यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे निधन


 

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार हरिरामजी वरखडे यांचे आज 2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता दरम्यान नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारदरम्यान निधन झाले .

सुरवातीला शिक्षकी पेशात असतांना झाडीपट्टी रंगभूमी च्या माध्यमातून अनेक भूमिका साकारलेले वरखेडे गुरुजी जनमाणसात अत्यंत लोकप्रिय होते.त्यांची लोकप्रियता बघून शिवसेनेने 1990 मध्ये त्यांना आरमोरी विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांनी तब्बल 36 हजार 528 मते घेत विजयी पताका फडकविली होती. 1990 ते 1995 च्या दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात शिवसेनेचे पहिले आमदार होण्याचा बहुमान त्यांनी पटकविला होता.नंतर ते छगन भुजबळ यांच्यासोबत काँग्रेसवासी झाले होते.

समाजकारण व राजकारणात नेहमीच सक्रिय राहणारे वरखडे गुरुजी अत्यंत सुस्वभावी व मनमिळाऊ होते. कुरखेडा, कोरची सह आरमोरी विधानसभा क्षेत्रातील दुर्गम भागात त्यांनी गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. काही दिवसापूर्वी त्यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया देखील झाली होती. मात्र पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु होते. मात्र आज 2 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मावाळली.त्यांच्या पच्छात पत्नी,मुलगी, जावाई, नात व बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या त्यांच्या पार्थिवावर मुळगावी जोगीसाखरा येथे सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.तत्पुर्वी काही वेळासाठी आरमोरी येथे त्यांच्या निवासस्थानी

पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवन्यात येणार आहे.

 

 

आरमोरी: जनसेवक ,सर्वसामान्य व्यक्तिमत्व, नटवर्य, उत्कृष्ट नाटककार, तथा शिक्षक ,सर्वांशी मिळून मिसळून राहणारे अष्टपैलू व्यक्तीमहत्व माजी आमदार आदरणीय हरिरामजी आत्मारामजी वरखडे साहेब यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे उपचारादरम्यान दिनांक 02 नोहेंबर 2024 ला रात्री 09:00 वा. दु:खद निधन झाले.  

*अंत्य विधी दिनांक 03 नोव्हेंबर 2024*

आरमोरी येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिववर सकाळी 10:00 वाजेपर्यंत दर्शन.

 

-सकाळी 10 वा नंतर आरमोरी हून मूळ गाव जोगीसाखरा येथे अंतिम संस्कार करिता अंतिम यात्रा.

 

-सकाळी 11:00 ते 1:00वाजेपर्यंत जोगीसाखरा येथील मूळ निवासस्थानी अंतिम दर्शन. 

 

-दुपारी 2 वा जोगिसाखरा येथील रामपुरी रोडवरील गाढवी नदी तीरावरील शेतावर (शेतमाऊली) अंतिम संस्कार.

 

*💐शोकाकुल💐*

     वरखडे परिवार तथा समस्त मित्र मंडळी 🙏🏻


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध इसमाचा मृत्यू


 

भद्रावती : पाळीव गुरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी शिवारात गेलेल्या एका ७८ वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३०) कोंढेगाव शिवारात दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. श्रीराम मडावी (रा. कोंढेगाव) असे मृतकाचे नाव आहे.

 

या घटनेने परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. कोंढेगाव हे जंगलव्याप्त गाव आहे. श्रीराम मडावी हे बुधवारी सकाळी गावालगतच्या शिवारात आपल्या पाळीव गुरांसाठी हिरवा चारा आणण्यासाठी गेले होते. झुडपातून चारा काढत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेचा माहिती मिळाल्यानंतर वन विभाग व ठाणेदार अमोल काचोरे यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

 

शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले. श्रीराम मडावी यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

नोंदणीचे पोर्टल बंद; शेतकऱ्यांची धावपळ देलनवाडी परिसरातील स्थिती


 

 देलनवाडी: शेतकऱ्यांना हमीभाव धान खरेदी करण्याकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागते; परंतु मागील आठ दिवसांपासून पोर्टलची साइट बंद असल्याने शेतकऱ्यांना नोंदणी करताना अडचणी येत आहेत.  देलनवाडी परिसरातील शेतकरी आठवडाभरापासून शेतकरी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या कार्यलयात हेलपाटे मारत आहेत.

 

आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत हमीभाव धान खरेदीकरिता सन २०२४-२५ करिता २० आक्टोबर २०२४ पासून हमीभाव धान खरेदीचे फार्म भरणे सुरू झाले आहे. त्यासाठी दररोज १०० ते २०० शेतकरी ऑनलाइन नावनोंदणी करण्याकरिता कामधंदे सोडून सोसायटीत येतात. मात्र, काम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. आठवडाभरापासून साईट बंद असल्याने पुन्हा घरी परत जावे लागते. शेतकरी नावनोंदणीची पोर्टल

शासनस्तरावरूच बंद असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. ऑक्टोबर महिना उलटत असतानाही शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर पोर्टल सुरू करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

देलोडात नासधूस करून रानटी हत्ती पुन्हा चुरचुराच्या जंगलात


 

शेतकऱ्यांत दहशत : तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

 

 

गडचिरोली : पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा उपक्षेत्राच्या जंगलातून मरेगाव बिटातील देलोडा परिसरात हत्तींनी सोमवारी प्रवेश केला. येथे एक दिवस धुडगूस घातल्यानंतर हत्तींच्या कळपाने पुन्हा चुरचुरा चेक परिसरात पुनरागमन केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची धाकधूक पुन्हा वाढलेली आहे.

 

हत्तींचा कळप १० दिवसांपूर्वी गडचिरोली वन विभागातून दिभनाच्या जंगलात दाखल झाला होता. या कळपाने दिभना, जेप्रा, कळमटोला, धुंडेशिवणी व पिपरटोला भागातील शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस करीत चुरचुरा जंगल परिसरात प्रवेश केला. या भागात तीन ते चार दिवस धान पिकावर ताव मारला. पुन्हा हा कळप नवरगावमार्गे देलोडा बिटात सोमवारी दाखल झाला. येथे एक दिवस शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केल्यानंतर हा कळप पुढे सिर्सी बिटात जाईल, असे वाटत होते; परंतु हत्तींनी आपला मोर्चा चुरचुराकडे वळविला.

 

 

कापणीला आलेले धानपीक हिरावतोय कळप

 सध्या अल्प मुदतीच्या व मध्यम प्रतिच्या धानाची कापणी व बांधणी सुरू आहे. काही भागांत अल्प मुदतीच्या धान पिकाची मळणीसुद्धा सुरू झालेली आहे. अशातच शेतकऱ्यांच्या हातात येणाऱ्या उभ्या पिकांवरही हत्तींचा कळप ताव मारत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. चुरचुरा व देलोडा भागातील अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींच्या कळपाने केलेली आहे.

 

कळपाचे तळ्यात मळ्यात

 

रानटी हत्तींचा कळप दोन दिवसांपूर्वी पाल नदी ओलांडून मरेगाव उपक्षेत्रातील देलोडा परिसरात दाखल झाला; परंतु, तेथील वातावरण कळपाला मानवले नसावे. पुन्हा हा कळप चुरचुरा चेक परिसरात मागे फिरला. यामुळे या कळपाचे सध्यातरी तळ्यात मळ्यात दिसून येत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

Armori news: 'त्या' प्रकरणात शिक्षकासह मुख्याध्यापिकाही निलंबित


 

आरमोरी : सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेतील चौथ्या वर्गात शिकत असलेल्या मुलींसोबत गैरवर्तन करणाऱ्या चंद्रभान मोतीराम बांबोळे या शिक्षकाला आरमोरी पोलिसांनी अटक केली आहे. शिक्षण विभागाने त्याला निलंबित केले आहे. तसेच शाळेत होत असलेल्या गैरवर्तनाबाबत वरिष्ठांना कळवण्यात कसूर केल्याबद्दल मुख्याध्यापिका दिलेश्वरी दामोधर कोटांगले यांनाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.

 

चंद्रभान बांबोळे या आरोपी शिक्षकाची मुख्य नियुक्ती ठाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील आहे. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्याला सीताबर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत पदस्थापना दिली. अशा विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्तीला आरमोरी सारख्या शहरातील शाळेत नेमकी कोणत्या कारणासाठी पदस्थापना दिली, हे मात्र कळण्यास मार्ग नाही. आरमोरीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्र कोकुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

Aheri news: दारू पिऊन प्रशिक्षणाला गेलेल्या शिक्षकावर गुन्हा ,मद्यपान करणारे कर्मचारी धास्तावले...


 

बेशिस्त वर्तन अंगलट : कारणे दाखवा

 

 अहेरी : अहेरी विधानसभा क्षेत्रातील मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देत असताना या प्रशिक्षणात सहभागी काही मतदान केंद्राध्यक्ष मद्य प्राशन करून असल्याचे निदर्शनास आले. 'लोकमत'ने याबाबत वृत्त प्रकाशित केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र, याबाबत खुलासा सादर करण्यात न आल्याने अखेर नायब तहसीलदार नाना दाते यांच्या फिर्यादीवरून प्रशिक्षणार्थी शिक्षकावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

 

आलापल्ली येथील आयटीआयमध्ये २७ ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण सुरू असताना हा प्रकार उजेडात आला. आता कारणेदाखवा नोटीस बजावल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम १३४ अन्वये बुधवारला अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देवलमरी येथील भगवंतराव आश्रमशाळेतील शिक्षक श्रावण वासेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

मद्यपान करणारे कर्मचारी धास्तावले...

 

 निवडणूक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे अहेरी उपविभागातील कर्मचारी धास्तावले आहेत. दुर्गम, अतिदुर्गम भागात निवडणुकीसारख्या महत्त्वाच्च्या वेळी काही कर्मचारी बेशिस्त वर्तन करत असल्याचे यापूर्वी देखील उघडकीस आलेले आहे.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 31, 2024

PostImage

Armori news : प्रेम सबंध प्रस्थापित केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याऱ्या तरूणाला आरमोरी पोलीसांनी केली अटक


 

 

 

 

आरमोरी: प्रेम सबंध प्रस्थापित केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेचे शारीरीक शोषण करणाऱ्या आरोपी युवकाविरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची घटना आज २९ ऑक्टोबर रोजी आरमोरीत घडली.

 

 

कुणाल घनश्याम धाकडे (२१) रा. सिद्धार्थनगर, आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नांव आहे. त्याला न्यायालयाने ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. पिडीत युवती ९ व्या वर्गात शिकत असतांना आरोपीने तिच्यासोबत प्रेमसबंध निर्माण केले व अश्लिल फोटो काढले. पिडीता १० वीत गेल्यानंतर आरोपीने तिच्याघरी तसेच नागपूर येथील एका युवकाच्या रूमवर बोलावून त्याच्या मोबाईलमध्ये असलेले अश्लिल फोटो व्हायरल करतो अशी धमकी देऊन शारीरीक अत्याचार केला तसेच मारहाण केली. याबाबत पिडीत युवतीने आरमोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

 

आरमोरी पोलीसांनी आरोपी कुणाल धाकडे यास अटक करून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ६४(२) (ग्) ६४(२) (२) ६४ (२) (स) ४,६,८,१२ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. आज दिनांक २९ ऑक्टोबरला आरोपी धाकडे यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने ३१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कडाळे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

निवडणुकसंबंधी तक्रारीसाठी संपर्क करण्याचे आवाहन


विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

 

गडचिरोली, दि. 29 - विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत अधिकाऱ्यांची विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निरीक्षक (सामान्य) नेमणूक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात 67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी विनीत कुमार, 68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी राजेंद्र कुमार कटारा, आणि 69-अहेरी(अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी अनिल कुमार ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

67-आरमोरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त विनीत कुमार यांचा संपर्क क्रमांक 9404306018 व 07137-272021 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आरमोरी येथे सकळी 11 ते दुपारी 1 पर्यंत उपलब्ध राहतील.

68-गडचिरोली (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त राजेंद्र कुमार कटारा यांचा संपर्क क्रमांक 9404306011 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील विश्रामगृहात सकाळी 11 ते दुपारी 12 पर्यंत उपलब्ध राहतील.

69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त अनिल कुमार ठाकूर यांचा संपर्क क्रमांक 9404306029 असा असून ते नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे सायंकाळी 4 ते 6 या वेळेत उपलब्ध राहतील.

निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांनी निवडणूक निरीक्षक यांच्या मोबाईल क्रमांकावर किंवा विश्रामगृह येथे दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष भेटून तक्रार सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

00000


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

विमान कंपन्यांना धमकी देणारा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील


दहा वर्षांपूर्वी सोडले गाव : २०२३ मध्ये पुस्तकही प्रकाशित

अर्जुनी मोरगाव : विमान कंपन्या, रेल्वे स्टेशन यांना ई-मेल पाठवून धमक्या देणारा जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ताडगाव टोली येथील मूळ रहिवासी आहे. सध्या त्याचे कुटुंबीय गोंदिया येथे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. तपासात त्याचे नाव पुढे आल्याने मंगळवारी खळबळ उडाली.

 

उईकेने हे कृत्य केल्याचा नागपूर पोलिसांना संशय आहे. उईके याला यापूर्वी २०११ मध्ये दहशतवादावरील एका लेखाच्या प्रकरणातही अटक केल्याची माहिती आहे.

 

जगदीशच्या मागावर पोलिस

सूत्रांच्या माहितीनुसार, विविध धमक्यांचे ई-मेल पाठविणारा संशयित आरोपी जगदीश उईके सध्या फरार आहे. त्याला लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. पथकाकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे.

 

आणखी १०० विमानांत बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या नवी दिल्ली/

मुंबई : भारतातील विविध विमान कंपन्यांच्या सुमारे १००हून अधिक विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या मंगळवारी देण्यात आल्या अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या १६ दिवसांत देशात व आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करणाऱ्या ५१० विमानांमध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमक्या देण्यात आल्या. यातील बहुसंख्य धमक्या या सोशल मीडियाद्वारे मिळाल्या आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

नवीन धान निघताच दर गडगडले, उत्पादक हैराण क्विंटलमागे बसतोय एक हजाराचा फटका


 गडचिरोली : हलक्या धानाची मळणी होऊन विक्री केली जात आहे. या धानाला जुन्या धानाच्या तुलनेत तब्बल एक हजार रुपये भाव कमी मिळत आहे. व्यापारी शेतकऱ्याला प्रतिक्विंटल २ हजार ३०० ते २ हजार ५०० रुपये भाव देत आहेत. मात्र, काहीच पर्याय नसल्याने धान विकावे लागत आहे.

 

गडचिरोली जिल्ह्यातील कमी, मध्यम व जास्त कालावधीचे धान, अशा तीन प्रकारच्या धानाची लागवड केली जाते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही, असे शेतकरी कमी कालावधीच्या धानाची लागवड करतात. हे धान आता निघाले आहे. दिवाळी व इतर खर्च राहत असल्याने शेतकरी धान निघताच त्याची विक्री करतात.

 

जिल्ह्यात धान खरेदी केंद्र अजूनपर्यंत सुरू झाले नाही. परिणामी, खासगी व्यापाऱ्याकडे धान विकल्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नाही. मात्र, धानाला अतिशय कमी भाव दिला जात आहे. जुन्या धानाला ३ हजार ३०० रुपये ते ३ हजार ४०० रुपये एवढा भाव दिला जात आहे. त्या तुलनेत नवीन धानाला अतिशय कमी भाव आहे.

 

शेतकऱ्यांनी विक्रीसाठी घाई करू नये

 

• मागील वर्षीसुद्धा नवीन धानाला तीन हजार रुपये भाव मिळाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी किमान २०० रुपये तरी अधिक भाव मिळाल्यास धानाचा भाव किमान ३ हजार २०० रुपये राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धानाची विक्री करण्यासाठी शेतकयांनी घाई करू नये, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

 

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

आविका' संस्थांचे ३० टक्के कमिशन जमा संस्थांना दिलासा : यंदा ९० केंद्रांवर खरेदी


 

गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्हाभरात एकूण ९० आधारभूत केंद्रांवरून यंदाच्या खरीप हंगामात धानाची खरेदी होणार आहे. गडचिरोली क्षेत्रात ५३ व अहेरीत ३७ असे एकूण ९० केंद्र मंजूर झाले असून या केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. धानाची आवक सध्या झाली नसली तरी आवक झाल्यावर काटा होणार आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकास महामंडळाने धानखरेदीपोटीचे मागील हंगामातील ३० टक्के कमिशन आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना अदा केले आहे. त्यामुळे यावर्षी धान खरेदीत कुठलीही अडचण नाही, असे महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांभरे यांनी  सांगितले.

 

आविका संस्थांच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित होत्या. यामध्ये धानातील तुट, प्रलंबित कमिशन, बारदाना, नुकसान व इतर विषयांचा समावेश होता. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढतयातील बरेचसे प्रश्न मार्गी लावले. शासनाच्या अनुदानाची प्रतीक्षा न करता महामंडळाच्या निधीतून आविका संस्थांचे गतवर्षीच्या हंगामातील ३० टक्के कमिशन अदा केले आहे. त्यामुळे आविका संस्थांना दिलासा मिळाला असून त्या यंदा धान खरेदी करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

 

 

गोदामात चार लाख बारदाना उपलब्ध

 

• बारदानाअभावी धान खरेदीमध्ये अडथळा येऊ नये म्हणून महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिककार्यालयाने बारदान्याची व्यवस्था केली आहे. गोदामामध्ये सध्या चार लाख इतका बारदाना उपलब्ध आहे. •

 

 अहेरी कार्यालयाकडेही बारदाना उपलब्ध आहे. त्यामुळे धान खरेदीला सध्यातरी अडचण नाही. बोनसची रक्कम वाढली असल्यामुळे यंदाही जिल्ह्यात महामंडळाची विक्रमी धान खरेदी होणार आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

आरमोरी : शाळेतील मुलींना बॅड टच करणारा शिक्षक आरमोरी पोलिसांच्या ताब्यात


 

 

आरमोरी : शाळेतील मुलींना बॅड टच करणाऱ्या आरमोरी येथील सीताबर्डी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शिक्षक चंद्रभान बांबोळे (५०) याला आरमोरी पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अटक केली आहे. शिक्षकी पेशाला कलंक लावणाऱ्या या शिक्षकाला कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

 

चंद्रभान बांबोळे हा चौथ्या वर्गाचा वर्गशिक्षक आहे. मुलींच्या खांद्यावर हात ठेवणे, कमरेत हात घालणे, मुलींच्या खांद्यावर स्वतःचे डोके ठेवणे, खाऊ देऊन मुलींची पप्पी घेणे अशा प्रकारचे असभ्य वर्तन वर्गातच करीत होता. त्याचे हे वर्तन बघून काही मुली दुसऱ्या वर्गामध्ये जाऊन बसत होत्या. याबाबतची माहिती शाळेतीलच एका शिक्षकाने पालकाला दिली. 

 

त्यानंतर पालकाने मुलींकडे शहानिशा केली. तेव्हा बाब सत्य असल्याचे दिसून आले. एका पालकाने याबाबतची तक्रार आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली.

 

पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक चंद्रभान बांबोळे याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४ सहकलम १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

Nagpur news: महीला पोलीस उपनिरीक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन ठेवले शारीरिक संबंध


 Nagpur news : नागपूर : अहमदनगरच्या एका बेरोजगार युवकाने पोलीस विभागात कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंधाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. सध्या गर्भवती महिला पोलीस उपनिरीक्षकाने सोलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास नागपुरात वर्ग केला. या प्रकरणाची नागपूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा, फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

३१ वर्षीय पीडित तरुणीची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली होती. २०२३ मध्ये ती पोलीस रुजू झाली. दरम्यान लग्नासाठी तिने विवाह संकेतस्थळावर ‘बायोडाटा अपलोड’ केला. तिथे ३२ वर्षीय आरोपी युवकाचा बायाडोटा होता. त्यात त्याने शासकीय इलेक्ट्रिकल कंत्राटदार असून इतरही व्यवसाय असल्याची नोंद केली होती. बायोडाटा पाहिल्यावर तो पीडित तरुणीच्या संपर्कात आला. डिसेंबर २०२३ मध्ये तो शहरात आला. महिला पोलीस उपनिरीक्षकाला हॉटेलमध्ये घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. लग्नापूर्वीच ती महिला अधिकारी गर्भवती राहिली. त्यामुळे तिने लग्नाची गळ घातली. दोघांनीही आपापल्या कुटुंबियांना प्रेमप्रकरणाबाबत माहिती दिली. दोघांच्याही कुटुंबियांनी लग्न करण्याची तयारी दर्शविली. २०२४ मध्ये आरोपीने तरुणीसोबत लग्न केले. लग्नानंतर आरोपीचे बींग फुटले. पती बेरोजगार असून कुठलाही कामधंदा करीत नाही. एवढेच काय तर त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना काही ‘न्यूड फोटो आणि व्हिडिओ मोबाईलने काढले होते. ते व्हिडिओ तो एका मैत्रिणीच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवित होता. ही बाब तिच्या लक्षात आली. त्यामुळे तिने त्या तरुणाला याबाबत जाब विचारला. त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, त्याच्याकडे अनेक अश्लिल व्हिडिओ असल्याचे लक्षात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे आता त्या तरुणाला अटक करण्यात येणार आहे.

 

दारु पिऊन मारहाण

आरोपीने महिला पोलीस अधिकाऱ्याचा मोबाईल आणि मेलही हॅक केला. आरोपी हा महिला पोलीस अधिकाऱ्याला दारु पिऊन मारहाण करीत शारीरिक छळ करायला लागला. धमकी देऊन महिलेचा पगार घ्यायला लागला. बेरोजगार असल्यामुळे तो पत्नीच्या पैशावर जगत होता. तो पत्नीचा पगार झाला की लगेच एटीएमने काढून घेत होता. तसेच तिला रोज मारहाण करीत होता. अलिकडेच महिला अधिकारी प्रसुती रजेवर गेली असून तिने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

लिव्ह-इन पार्टनरची हत्या; भावाच्या बायकोसोबतच संबंध


 

मुंबईः दारुच्या नशेत एका व्यक्तीने आपल्याच लिव्ह इन पार्टनरची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबईत ही घटना घडल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५५ वर्षीय व्यक्तीला पनवेल येथून अटक केली आहे. या व्यक्तीची लिव्ह इन पार्टनर ही त्याच्याच मोठ्या भावाची बायको असल्याची माहिती आहे, जो आता या जगात नाही. २००८ मध्ये हा आरोपी आपल्या पत्नीच्या हत्येप्रकरणात तुरुंगात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो त्याच्या विधवा बहिनीसोबत राहू लागला, अशी माहिती आहे. कमल्या रागो निरगुडा असे आरोपीचे नाव असून त्याला - पनवेल तालुका पोलिसांनी

 

मंगळवारी रात्री हत्येनंतर अटक् केली आहे. पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ज्य ठिकाणी ही घटना घडली त्या टॉवर वाडीतील पोलिस पाटील यांनी आम्हाला सांगितले की एक महिलेवर तिच्या लिव्ह इन पार्टनरने हल्ला केला. त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे.

 

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी निरगुडा ह तिथेच होता. तर, ज्यांच्यावर हल्ल झाला त्या शनिवारी गोमा निरगुड या जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेलं .

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

Desaiganj news: 'त्या' दोषी वीज अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाच्या गुन्ह्याची मागणी


 

देसाईगंज: वीज वितरण विभागाकडे लोंबकळणाऱ्या विद्युत तारांबाबत वारंवार तक्रार करूनही याकडे कमालीचे उदासीन धोरण दाखविल्या गेल्यामुळे १३ ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाच्या दिवशी रवी गोविंद राऊत (३७) रा. गवराळा या इसमाचा लोबकळणाऱ्या विजेच्या तारात अडकून मृत्यू ओढावला होता. या मृत्यूस सर्वस्वी वीज वितरण विभागाचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी संतप्त जनतेकडून होत आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, वडसा आमगाव या बायपास मार्गावर गेल्या वर्षभरापासून सावंगी येथून आलेल्या ३३ केव्ही विद्युत लाइनच्या तारा लोंबकळत होते. याबाबतची सूचना आमगाव येथून अनेकदा देसाईगंज वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलो होती. मात्र वर्ष लोटनही हायहोल्टेज असलेल्या तारा लोंबकळत असलेल्याच स्थितीत ठेवण्यात आल्या. यामुळे दुर्दैवाने यात रवी राऊत या निरपराध व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांवर सर्वचस्तरावरून रोष व्यक्त होतआहे.

 

 वर्षभरापासून लोंबकळत असलेल्या तारांचा विषय सध्या चांगलाच तापला असून मोठा तणाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ३३ केव्ही वीज वाहिनीवर उपकार्यकारी अभियंता पदावरील अधिकाऱ्यांचे नियंत्रण असते. वीज वाहिनी वर्षभरापासून लोंबकळत असल्याची सूचना नजीकच्या आमगाव गावातून अनेकदा देण्यात आली. मात्र. कामचोर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच एका निरपराध इसमाचा जीव गेला. गावकऱ्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संगनमत करून याला अपघाताचे वर्णन दिल्याचा आरोप जनतेकडून होत आहे.

 

हा अपघात नसून बीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंतांच्या निष्काळजीपणाचे पाप असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. त्यामुळे बेजबाबदारीचा कळस गाठणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची वरिष्ठांनी निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 30, 2024

PostImage

एकमेकांना वाचविताना तीन मित्रांचा बुडून मृत्यू


 

 अहेरी : सहलीचा आनंद लुटतानाच एकाला नदीत पोहण्याचा मोह आवरता आला नाही व तो पाण्यात उतरला. तो खोल पाण्यात बुडत असतानाच दूसरा मित्र वाचवायला गेला. दुसराही मित्र बुडताना पाहून तिसरा मित्र पाण्यात शिरला व दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिसराही बुडाला. तिघांनाही जलसमाधी मिळाली. ही घटना शनिवार, २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेवरील प्राणहिता नदीत घडली. मात्र, तिसरा मृतदेह सोमवारी सापडला, जहीर हुसेन, मोहम्मद इरशाद, मोहम्मद मोहिद रा. बेज्जूर (तेलंगणा) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मित्रांची नावे आहेत. हे तिघेही मित्र विशीतील होते.

 

 

तेलंगणाच्या हद्दीतील बेज्जुर परिसरातील प्राणहिता नदीत तीन मित्र सहलीसाठी आले व बुडाल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळताच त्यांनी गडचिरोली जिल्हा पोलिसांची मदत घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, यतिशदेशमुख, श्रणिक लोढा यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांनी प्राणहिता पोलिस उप मुख्यालयातील रबर मोटार बोटसह पोलिस कर्मचाऱ्यांचा चमू पाठविला. बेज्जुरचे पीएसआय विक्रम यांनी रविवारी शोधमोहीम राबवून दोघांचे मृतदेह रविवारी हस्तगत केले, तर तिसरा मृतदेह मंचेरियालजवळ सापडला.

 

 

सोमवारी जहीर हुसेन मोहम्मद मोहीद मोहम्मद इर्शाद२५ किमीवर सापडला मृतदेह बेज्जूर येथील तिघेही मित्र कामकरून शिक्षण घेत होते. यापैकी दोघेजण चप्पल विक्रीच्या दुकानात, तर एकजण मोबाइल विक्रीच्या दुकानात काम करीत होता. दोघांचे मृतदेह हे जवळच मिळाले; परंतु तिसऱ्याचा मृतदेह घटनास्थळापासून २५ किमी वाहत आला. शोधकार्यावेळी पोलिसांची दमछाक झाली.

 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 29, 2024

PostImage

Gadchiroli : जिल्ह्यात आज 36 उमेदवारांकडून 46 नामनिर्देशन अर्ज दाखल, प्रत्येक विधानसभात होणार अपक्ष उमेदवार मध्ये जोरदार लढाई


 

गडचिरोली, (जिमाका) दि.29: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजच्या शेवटच्या दिवशी एकूण 36 उमेदवारांनी 46 नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत.

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी 16 नामनिर्देशनपत्र दाखल केले यात आनंदराव गंगाराम गेडाम (अपक्ष), वामन वंगणुजी सावासाकडे (अपक्ष), शिलु प्रविण गंटावार (अपक्ष), माधुरी मुरारी मडावी (अपक्ष) दोन अर्ज, खेमराज वातूजी नेवारे (अपक्ष), गजबे कृष्णा दामाजी (भारतीय जनता पार्टी) दोन अर्ज, मोहनदास गणपत पूरम(वंचित बहुजन आघाडी) दोन अर्ज, निलेश देवाजी हलामी (अपक्ष), चेतन नेवशा काटेंगे (आझाद समाज पार्टी-काशीराम), अनिल तुलाराम केरामी (बहुजन समाज पार्टी), दामोधर तुकाराम पेंदाम(बहुजन समाज पार्टी), रामदास मळू मसराम (इंडियन नॅशनल काँग्रेस), निलेश छगनलाल कोडापे (अपक्ष) यांचा समोवश आहे.

68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आज 10 उमेदवारांनी 13 नामनिर्देशनपत्र दाखल केले यात डॉ. देवराव मादगुजी होळी (अपक्ष)-दोन अर्ज, आसाराम गोसाई रायसिडाम(अपक्ष), विश्वजीत मारोतराव कोवासे(इंडियन नॅशनल काँगेस) दोन अर्ज, योगेश बाजीराव कुमरे (गोंडवाना गणतंत्र पार्टी), डॉ. सोनल चेतन कोवे (अपक्ष) दोन अर्ज, मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस), मोरेश्वर रामचंद्र किनाके(अपक्ष), सौ वर्षा अशोक आत्राम (अपक्ष), दिवाकर गुलाब पेंदाम(अपक्ष), संजय सुभाष कुमरे (बहुजन समाज पार्टी), 

 69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज 13 उमेदवारांनी एकूण 17 नामनिर्देशन पत्र दाखल केले. यात नितीन कविश्वर पदा (अपक्ष), भाग्यश्री मनोहर लेखामी (अपक्ष), आत्राम धरमराव भगवंतराव (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी) यांचे तीन अर्ज, निता पेंटाजी तलांडी (अपक्ष), आत्राम तनुश्री धर्मरावबाबा(नॅशनालिस्ट काँगेस पार्टी) यांचे तीन अर्ज, संदीप मारोती कोरेत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), रमेश वेल्ला गावडे (बहुजन समाज पक्ष), अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष), हनमंतु गंगाराम मडावी (अपक्ष), पोरतेट ऋषी बोंदय्या(नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट), कुमरम महेश जयराम (अपक्ष), गेडाम शैलेश बिच्चू(अपक्ष) यांचा समावेश आहे. 

आज 29 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 1 व्यक्तींकडून 2 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत 31 व्यक्तींकडून 92 अर्जांची उचल झाली. गडचिरोली विधानसभा मतदार संघातून आज 3 व्यक्तींकडून 4 अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत 31 व्यक्तींकडून 77 अर्जांची उचल झाली. अहेरी मतदारसंघातून आज 6 व्यक्तींकडून 7 अर्जाची उचल झाली तर आतापर्यंत एकूण 48 व्यक्तींकडून 61 अर्जांची उचल करण्यात आली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 29, 2024

PostImage

बंडखोरीचा काँग्रेसची उमेदवारी मिळवलेल्या मसराम यांना बसणार जबर फटका वर्तुळात चांगलीच


 भोजराज नागपुरे मोब. ९४२२८२५५९७

देसाईगंज /- राज्यात सद्यास्थितीत महायुती सरकारच्या प्रचंड भ्रष्टाचाराला वैतागून तसेच महागाई, बेरोजगारी या मुद्द्याला घेऊन असंतोष उफाळून येऊ लागला आहे. भाजपाच्या लोकसभेतील उमेदवारांनी चक्क ४०० पार झाल्यास संविधान बदलण्याची जाहिर व्याख्याने केल्याने एकवटलेल्या बहुजन समाजाने काँग्रेसचे विद्यमान खासदार डॉ. नामदेव किरसान यांना तब्बल दिड लाखाच्या फरकाने निवडून आणले. मात्र काँग्रेसचा खासदार निवडून येताच काँग्रेसीत हवा शिरल्याने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तसेच पक्षासाठी कुठलेही योगदान नसलेल्या रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे पक्षासाठी खपलेला एक नाराज गट एकत्र येऊन उमेदवार देणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने बंडखोरीचा मसराम यांना जबर फटका बसणार असून मसराम यांची ही राजकीय आत्महत्या असल्याचे बोलल्या जाऊ लागल्याने राजकीय खळबळ माजली आहे

आरमोरी विधानसभा क्षेत्रा करीता काँग्रेस कडुन रामदास मसराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मसराम हे काँग्रेस पक्षाची वाताहत करण्यासाठी वाड्यावरून सोडलेले दलालांच्या माध्यमातून राजकीय स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्यांच्या भोवताली असलेल्या सक्रिय दलालांमुळे कट्टर काँग्रेसीत असंतोष उफाळून आला असून मसराम यांना विरोध नसला तरी दलालांनी वारंवार पक्षाच्या प्रामाणिक व सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रयत्न केल्याने व दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतिने काढण्यात आलेल्या जनसंवाद परिवर्तन यात्राही हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. केवळ पक्षाची तिकीट मिळावी या उद्देशाने आठ महिण्यापुर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करून लोकसभा निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांचे खिसे भरून पक्षात दावेदारीचे वातावरण निर्माण केले. दरम्यान काँग्रेसच्या इतर पदाधिकारी कार्यकत्यांनी पक्ष वाढीसाठी

 

विविध आंदोलन करून, महायुती सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. मात्र मसराम अँड होऊ कंपनिने इतरांना डावलून प्रसंगी खोटे व्हिडिओ व्हायरल करून पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांना आहे. बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तोंडावर दरम्यान जिल्हाध्यक्ष यांनी सर्वांना विश्वासात घेऊन यावर तोडगा काढायला गंभीर पाहिजे होता. मात्र ज्यांच्या सहकायनि जिल्हाध्यक्ष बनलेल्या महेंद्र ब्राम्हणवाडे स्थितीत यांनी त्यांचेच पंख छाटून मसराम यांची तसेच एकतर्फी बाजु घेतल्याने पक्षात त्याचक्षणी दुफळी निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी उमेदवार एकोप्याने निवडणुकीला सामोरे जाणे गरजेचे असतांना ब्राम्हणवाडे यांनी जेष्ठ स्वप्न पदाधिकाऱ्यांना डावलून जाहिरातीसाठी कित्येकांना लाखो रुपये खर्च करवून तसेच यामुळे परिवर्तन यात्रेसाठी संभाव्य उमेदवारांकडून वाताहत वसुली करण्यात आल्याने सर्वांना समान येऊ न्यायाने वागवून पैकी एका उमेदवारावर प्रश्न लक्ष केंद्रित करणे आवश्यक होते. मात्र असे 

 

करण्यात न आल्याने मसराम यांना समोर समोर करून इतरांचे पंख छाटले ज्याचा रोष घातलेल्या निवडणुकीत व्यक्त होणार असल्याचे यामुळे स्पष्ट समोर येऊ लागले विशेष म्हणजे ऐन निवडणुकीच्या मसराम यांचा जमिन विक्रीतून आपल्याच नातेवाईकाच्या फसवणूकीची बाब चव्हाट्यावर आल्याने आदिवासी समाजही मसराम यांना झटका देण्याच्या असल्याचे सांगीतले जात आहे. समोरचा उमेदवार तगडा आणि संघटितपणे निवडणुक लढणारा असल्याने ऐन निवडणुकीत असंतोष गट एकवटून आपला उभा करणार असल्याने उभा केलेल्या बैलोबाच्या माध्यमातून मुख्यमंत्री होण्याचे रंगविणाऱ्याला हा चांगलाच झटका असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. पक्षाचा जनाधार असुनही काँग्रेसची होणार असल्याचे यावरून समोर लागल्याने यास जबाबदार कोण? असा आता उपस्थित केल्या जाऊ लागला आहे 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 29, 2024

PostImage

आरमोरी विधानसभेत आझाद समाज पार्टीने  शेकडो कार्यकर्त्यांसह चेतन काटेंगे यांचां भरला उमेदवारी अर्ज 


 

गडचिरोली : आझाद समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आदिवासी विकास परिषद  आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन काटेंगे  यांनी आज शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत मंगलवार दिनांक २९ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

आझाद समाज पक्षाचे जिल्हा  प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, आरमोरी विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे, जिल्हा संघटक हंसराज उराडे,  विधानसभा प्रभारी धनराज दामले,तालुका अध्यक्ष आरमोरी ॲड नर्गिस पठाण, आरमोरी तालुका प्रभारी गोवर्धन धोटे, तालुका महासचिव ॲड राज सुखदेवे, शहर अध्यक्ष नागसेन खोब्रागडे, तालुका सचिव सुरेंद्र वासनिक, शहर अध्यक्ष नितीन भोवते, युवा आघाडी तालुका अध्यक्ष आरमोरी शुभम पाटील, मीडिया प्रमुख सतीश दूर्गमवार , तालुका संघटक रोहिदास बोदेले, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम मैंद, रमेश तुलावी, सोमाजी काटेंगे, रमेश तुलावी, बारशू   तुलावी, रेवणाथ मारगाये, देविदास कुमरे, कुरखेडा तालुका अध्यक्ष सावन चीखराम,युवा आघाडी अध्यक्ष रोहित कोडवते, विधानसभा उपाध्यक्ष सोनुभाऊ चौधरी, भूपेंद्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम, 

 

यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.द्र बनसोड, आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अंकुश कोकोडे, महिला तालुका अध्यक्ष वडसा संगीता मोटघरे, तालुका सचिव करण डोंगरे, महिला आघाडी सचिव शिला सहारे,किशोर कावळे वडसा, तालुका अध्यक्ष वडसा बबन रामटेके, गजानन केलझळकर कुरुड, सचिन गेडाम, 

 

यावेळी आरमोरी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष, आदिवासी विकास परिषद आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 28, 2024

PostImage

ल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली म्हणून उमेदवारी रद्द झाली


पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर मुंबईवरून गडचिरोली येथे प्रथमच आगमन केलेले गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक लढवायची की नाही हा निर्णय मी पक्ष कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेईन याविषयी माहिती दिली.

 

आमदार डॉक्टर देवराव होळी पुढे म्हणाले जिल्ह्यातील निवडणुकीत हार खालेल्या काही नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे आपली बदनामी केली.आपल्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवून आपली उमेदवारी रद्द केली. त्यामुळे आपण अतिशय दुःखी झालो आहोत.

 

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हा सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, साईनाथ बुरांडे, राष्ट्रवादीचे नगरसेवक लौकिक भिवापूरे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विवेक ब्राह्मणवाडे, पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव ईचोडकर उपसभापती विलास दशमुखे, पारडीचे सरपंच संजय निखारे, भाजपा माजी तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक भारसाकडे , भाजपा ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, भाजपाच्या शहराच्या अध्यक्ष कविता उरकुडे, बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 28, 2024

PostImage

जिल्ह्यात आज 10 उमेदवारांचे 13 नामनिर्देशन अर्ज दाखल


 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.28: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 साठी गडचिरोली जिल्ह्यात आज 10 उमेदवारांकडून एकूण 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्र दाखल केले यात कृष्णा दामाजी गजबे (भारतीय जनता पार्टी) यांनी दोन तर प्रा. रमेश गोविंदा मानागडे (अपक्ष) यांनी एक अर्ज दाखल केला आहे.

68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात भरत मंगरूजी येरमे (वंचित बहुजन आघाडी) यांनी दोन अर्ज दाखल केले तर बाळकृष्ण वंगणुजी सावसाकडे (अपक्ष), डॉ. मिलिंद रामजी नरोटे (भारतीय जनता पार्टी), जयश्री विजय वेळदा (भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष), मनोहर तुळशिराम पोरेटी (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.  

69-अहेरी (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात आज चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले. यात हनमंतू गंगाराम मडावी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अपक्ष असे दोन नामनिर्देशनअर्ज भरले. तसेच आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट) व राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम (अपक्ष) यांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत 15 उमेदवारांकडून एकूण 19 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

आज 28 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 5 व्यक्तींनी 12 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 2 व्यक्तींनी 5 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 9 व्यक्तींकडून 10 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत (28 ऑक्टोबर) एकूण 213 नामनिर्देशन अर्जाची उचल झाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून २९ ऑक्टोबरला नामनिर्देशन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

000


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 28, 2024

PostImage

हजारो कार्यकर्त्यांसह जयश्रीताईंनी भरला उमेदवारी अर्ज 


 

गडचिरोली : शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र आघाडीच्या अधिकृत उमेदवार जयश्रीताई वेळदा - जराते यांनी आज हजारो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करीत सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके - विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भाई रामदास जराते, भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सरचिटणीस संजय दुधबळे, आझाद समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, कार्याध्यक्ष विनोद मडावी, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, चामोर्शी तालुकाध्यक्ष रघुनाथ वासेकर, शेकापच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता ठाकरे, पोर्णिमा खेवले, शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा बाबनवाडे, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवित्र दास, भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष डंबाजी भोयर, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास आलाम, शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शर्मिश वासनिक, भाई अक्षय कोसनकर यांच्या नेतृत्वात शेतकरी कामगार पक्षाचे कार्यालयापासून लाल - निळे झेंडे घेऊन रॅली काढण्यात आली.

 

यावेळी गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्ष, आझाद समाज पक्ष आणि प्रागतिक आघाडीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 28, 2024

PostImage

पगार घेऊ लाख रूपये पण गावात नाही राहू....


गडचिरोली : जिल्ह्यातील निमशासकीय कार्यालय, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी विभाग, विद्युत कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालयासह इतर क्षेत्रात कार्यरत कर्मचारी मुख्यालयी राहात नसल्यामुळे सर्वसामान्यांना अनके अडचणीचा सामना करावा लागत आहे.

 

 

 

अधिकारीवर्गाकडून कर्मचाऱ्यांची पाठराखण होत असल्याने शासकीय कर्मचारी मुख्यालयाला 'खो' देत असल्याची ओरड होवू लागली आहे, दर पाच वर्षांनी निवडणूका येतात. एका मागून एक वेगवेगळ्या पार्टीचे सरकार सत्तेवर पहावयास मिळत आहे. जनतेचे चांगले शासकीय दिवस असे सांगितले. मात्र, एक वेळ निवडणूक झाली की सत्ता बसली की परिस्थिती 'जैसे थे' राहत असल्याचीओरड केली जाते.

 

 

 

 

 

चांगले दिवस येणार वअसणाऱ्या समस्येचा निपटारा लागणार अशा आश्वासनांची खैरात वाटण्यात येते. मात्र, राजकीय स्वार्थापोटी समस्या मार्गी लागत नाही. सर्वसामान्यांना अच्छे दिनाऐवजी वाईट दिवस पहावयास मिळत असल्याची खंत जनतेत व्यक्त केली जात आहे. कोणतेही शासन आले तरी प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांना तेच दिवस भोगावे लागतात. शासनाच्या सेवेत समाविष्ट होत असताना कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून कार्य करण्याची अट असते. त्यासाठी काहींना निवासस्थान उपलब्ध करून दिल्या जाते. तर काहींना घरभाडे भत्ता दिला जातो. त्यामुळे राहणे बाध्य आहे.

 

 

 

मात्र, बहुतेक विभागाचे कर्मचारी नावापुरती खोलीदाखवून शहराच्या ठिकाणावरून ये-जा करतात. त्यामुळे शासनाच्या विकासकामांवर परिणाम होत आहे. शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आवश्यक कागदपत्रे यासाठी हेलपाटे मारावे लागण्याची लाभार्थ्यांवर वेळ येते. बहुतेक ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, कर्मचारी, शिक्षक व यासारखे अन्य कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठराखण संबंधित अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे बोलले जाते. बहुतेक तलाठी व ग्रामसेवक अथवा अन्य शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी दोन गावांचा कारभार असल्याचे सांगून या गावी, त्यागावी होतो, असे सांगत असल्याचे बोलले जाते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 28, 2024

PostImage

Dhanora: स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या तलाठ्याचा दोन चिमुकल्यांवर अत्याचार


 

 धानोरा : स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या ५६ वर्षीय तलाठ्याने दोन अल्पवयीन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना २७ ऑक्टोबरला धानोरा पोलिस ठाणे हद्दीत उघडकीस आली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यास बेड्या ठोकल्या. शंभू मुरारी आतला (५६) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी

 

सांगितले. त्याने प्रकृतीच्या कारणास्तव दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. तो दुमजली घर बांधून पत्नीसमवेत राहत होता.

 

त्याची पत्नी व मुले बाहेरगावी गेले होते, त्यामुळे तो २६ रोजी एकटाच घरी होता. घराजवळ अंदाजे सहा व नऊ वर्षीय मुली खेळत होत्या. त्याने चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना घरात नेले व त्यांच्याशी कुकर्म केले.

 

भावाने पाहिले अन्...

 

• दोन मुलींपैकी एका मुलीचा भाऊ बहिणीच्या शोधात बाहेर आला. शंभू आतला याच्या घरातून बहिणीचा ओरडण्याचा आवाज आल्याने त्याने तिकडे धाव घेतली व हा सगळा घृणास्पद प्रकार पाहिला. त्यानंतर त्याने आरडाओरड केली. रात्री उशिरा गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी शंभू आतला यास बेड्या ठोकल्या.

 

तीन दिवसांची पोलिस कोठडी

 

दरम्यान, आरोपी शंभू आतला यास २७ रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक स्वप्निल धुळे व उपनिरीक्षक स्वरूपा नाईकवाडे हे तपास करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

अखेर आरमोरी विधानसभा क्षेत्रातून रामदास मसराम यांना कांग्रेस कडून उमेदवारी जाहीर


 

गडचिरोली :- काही दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वांच्या नजरा आरमोरी विधानसभा क्षेत्राकडे लागलेल्या दिसून येत होत्या. अशातच आता काही वेळापूर्वी काँग्रेसची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात १४ उमेदवारांचे नाव पुढे आले आहेत. १४ उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या वतीने आरमोरी विधानसभा मतदारसंघाकरीता रामदास मसराम यांना तिकीट देण्यात आली आहे. यावेळेस आरमोरी विधानसभा मदारसंघात नवीन चेहरा देण्यात आल्याने चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे. त्यामुळे 'जूनं की नवं' असा महासंग्राम दिसून येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

 

काँग्रेसच्या १४ उमेदवारांची यादी

 

अमळनेर - डॉ. अनिल नाथु शिंदे

 

उमरेड - संजय नारायणराव मेश्राम

 

आरमोरी - रामदास मसराम

 

चंद्रपूर - प्रवीण नानाजी पडवेकर

 

बल्लारपूर - संतोषसिंग रावत

 

वरोरा - प्रवीण काकडे

 

नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार अब्दुल गफूर

 

औरंगाबाद पूर्व - लहू शेवाळे

 

नालासोपारा - संदीप पांडे

 

अंधेरी पश्चिम - अशोक जाधव

 

शिवाजीनगर - दत्तात्रेय बहिरत

 

पुणे छावणी - रमेश बागवे

 

सोलापूर दक्षिण - दिलीप माने

 

पंढरपूर - भागीरथ भालके


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

धानोरा तालुक्यातील जंगली टस्कर हत्ती


 

धानोरा: चामोर्शी मुतनूर तालुक्यातील पर्यटनस्थळावजळ आबापूर येथे शशीकांत सतरे नामक युवक मजुराचा बळी घेतल्यानंतर टस्कर हत्ती धानोरा तालुक्यातील मेंढा लेखा जंगली परिसरात शुक्रवारी दाखल झाला असून अनेकांना दर्शन दिले आहे. टस्कर हत्ती आल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सात-आठ दिवसांपासून जंगली टस्कर हत्ती आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व आता धानोरा तालुक्यात येरझरा मारत आहे. 

.

गडचिरोली तालुक्यातील चांदाळा जंगल परिसरातून चामोर्शी तालुक्यातील मुतनूर पर्यटनस्थळाजवळील आबापूर जंगल परिसरात असलेल्या टस्कर हत्तीने चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव भुजला येथील शशीकांत सतरे या युवकाचा बळी घेतला होता. त्यानंतर हा हत्ती शुक्रवारी रात्रीच्या सुमारास धानोरा तालुक्यातील मेंढा लेखा जंगल परिसरात आढळल्याची माहिती आहे. टस्कर हत्तीने अनेकांना दर्शन दिले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील धान कापणी व धान बांधणीचा हंगाम जोरात सुरू असून बहुसंख्य महिला व पुरुष मजूर शेतात असतात. शेत परिसर जंगलाला लागून असल्याने व टस्कर हत्तीचा वावर असल्याने शेतकरी व शेतमजुरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने टस्कर हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या समर्थनार्थ भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते राजीनामा देणार


 

गडचिरोली : येथील विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांना भाजपा पक्षाने उमेदवारी नाकारल्याने संपूर्ण क्षेत्रात भाजपा कार्यकर्त्यांसह जनतेमध्ये नाराजीचा सूर असून विधानसभा क्षेत्रातील अनेक भाजपा पक्षाचे पदाधिकारी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख हे रविवार (२७ ऑक्टोबर) रोजी राजीनामे देणार आहेत. त्यामुळे भाजपाच्या अंतर्गत पोटात एकच खळबळ उडाली आहे.

 

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत गडचिरोली क्षेत्राची उमेदवारी डॉ. मिलिंद नरोटे यांना जाहीर केली. मात्र, गेल्या दहा वर्षात भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी

 

या विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विविध विकासात्मक कामे केल्याने त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा झाला होता. शेवटपर्यंत त्यांना भाजपाची तिकीट मिळेल असेच बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी भाजपाकडून गुरुवारी १० ते १२ हजार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता. विशेष म्हणजे आ. डॉ. देवराव होळी यांच्या सोबतीला उमेदवारी अर्ज सादर करताना शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवळ त्यांना एबी फॉर्मची वाट होती, अशातच

 

आजच्या भाजपा उमेदवारांच्या यादीत त्यांचा समावेश नसल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये एकच नाराजीचा सूर दिसून आला, याचा प्रत्यय म्हणून भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी तातडीची बैठक घेतली असून या बैठकीत अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांसह अनेक भाजपा पक्षाचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख हे सुद्धा भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन पूर्णपणे आ. डॉ. देवराव होळी यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना निवडून आणण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. विद्यमान आमदारांची तिकिट कापल्याने भाजपातील डॉ. होळी समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर


 

गडचिरोली. अवजड साहित्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि. 26) दुपारी 2 वाजताच्या सुमारास आष्टी-चामोर्शी मार्गावरील अड्याळ गावानजीक घडली. पराग गिरीधर हटवादे (34, रा. कळमगाव, ता. सिंदेवाही जि. चंद्रपूर) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. ते लगामवरून गडचिरोलीकडे एमएच-34/बीएक्स- 0901 क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-33/डब्ल्यू-377 क्रमांकाच्या ट्रकने समोरून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. आष्टी पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

अखेर जखमी काकूची झुंज दहा दिवसांनी ठरली अपयशी पुतण्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल


 

 

 पिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव भो येथील सख्या पुतण्याने कुंपणाचे वादातून काकूला नालीत ढकलून डोक्यावर विटांनी प्रहार केल्याने नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करत होत्या. शनिवारी (दि. २६) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सीता रामाजी टिकले (६०) असे मृतकाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पुतण्या संदीप रामचंद्र टिकले (३५) याला पोलिसांनी अटक केली.

 

मृतक सीता टिकले आणि सख्खा पुतण्या संदीप टिकले यांच्या कुंपणावरून कडाक्याचे भांडण झाले. यावेळी सीताचे पती शेतात गेले होते. रागाच्या भरात आरोपी पुतण्या संदीप टिकले याने काकू सीता हिला लाथाबुक्क्याने मारत नालीत ढकलून दिले व विटांनी डोक्यावर प्रहार केला.

 

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सीता टिकले यांना नागरिकांनी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्याचा

 

सल्ला देण्यात आला. त्यानंतर कुटुंबीयांनी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज दाखल केले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी (दि. २६) दहाव्या दिवशी सीता टिकले यांचा मृत्यू झाला. पती रामाजी टिकले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी संदीप टिकले याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८ (२),१०३ (१) अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. सीता टिकले हिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 

पुढील तपास ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक स्वाती खोब्रागडे, अरुण पिसे करत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

तुझा एक मत देवराव होळींना पडतेय भारी


 

Gadchiroli: एक मत होळींना पडतेय भारी तुम्ही आदिवासींसाठी आरक्षित मतदारसंघातून निवडून येता, मग आदिवासींची बाजू का घेत नाही, असा प्रश्न विचारणाऱ्या सूरज कोडापे नावाच्या एका युवकाला गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी तुझ्या एका मताने मी निवडून येतो का, असे सुनावले होते. या दोघांमधील संवादाची 'ऑडिओ क्लिप' चांगलीच व्हायरल झाली होती. क्लिपमधील याच सूरज कोडापे या युवकाने पुढे होळींच्या विरोधात रणशिंग फुंकले. होळी यांच्या विरोधात आदिवासींनी अप्रत्यक्षरीत्या दोन मोठी आंदोलने केली. रविवारीही गडचिरोलीत अडीच तास चक्का जाम आंदोलन झाले. होळींना 'त्या' एका मताची किंमत चांगलीच भारी पडतेय, अशी कुजबुज यानंतर राजकीय क्षेत्रात रंगलीये.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

कुऱ्हाडीने वार, पुतण्याने केली काकाची हत्या


 

जमिनीचा वाद : जंगलपल्ली येथील थरार

 

 सिरोंचा : जमिनीच्या वादातून काका व पुतण्या यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या दरम्यान, राग अनावर झाल्याने पुतण्याने काकावर कुन्हाडीने वार करून त्याला जागीच ठार केले. ही थरारक घटना शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील जंगलपल्ली येथे घडली. नरेश पोचम तेरकरी (५०) असे ठार झालेल्या काकाचे नाव आहे, तर राजू धर्मय्या तेरकरी (३०) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. तेरकरी कुटुंबामध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून अधूनमधून वाद निर्माण होत होते.

 

 

 

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी नरेश व राजू यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. भांडणाच्या दरम्यान राजूने घरची कुन्हाड आणून नरेशच्या डोक्यावर वार केला. यात नरेश हा जागीच ठार झाला. खून होताच राजू गावातून पसार झाला. मात्र, आसरअल्ली पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.

 

ही कारवाई आसरअल्ली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक समाधान दौड, पोलिस उपनिरीक्षक निखिल मेश्राम, पोलिस हवालदार गोपी आकुलवार, पोलिस शिपाई बिभीषण अनवने, राजू कळंबे, संजय चाबुकस्वार, सोपान अनकाडे, बापूराव काळे यांच्या पथकाने केली.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

प्रेयसीच्या खुनाचा धक्का; प्रियकराने घेतला गळफास


 

नवे वळण : आलापल्लीत आढळला मृतदेह

 सिरोंचा : कोटा पोचमपल्ली येथे घरगुती भांडणातून पतीने २३ ऑक्टोबरच्या रात्री झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरून हत्या केली होती. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, विवाहित महिलेचे गावातीलच एका युवकाशी विवाहबाह्य प्रेम संबंध असल्याच्या संशयातून पतीने महिलेची हत्या केली. दरम्यान, महिलेच्या प्रियकराचाही मृतदेह अहेरी तालुक्याच्या आलापल्लीजवळ २६ ऑक्टोबर रोजी सकाळी गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला

लिंगय्या गट्ठ येलकुच्ची (३२, रा. कोटा पोचमपल्ल) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. समय्या मुतय्या बोल्ले याला पत्नी पद्मा हिचे समय्या बोल्ले गावातीलच लिंगय्या येलकुच्ची याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून दोघांमध्ये भांडण होत होते. गत आठवड्यापासून दोघांमध्ये खटके उडत होते. २३ ऑक्टोबर रोजी पद्मा हिचा धारदार शस्त्राने खून करून पसार झाला होता. या घटनेमुळे प्रियकर लिंगय्या गट्ठ येलकुच्ची याच्यावर मानसिक आघात झाला. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 27, 2024

PostImage

Armori news: अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या इंजेवारी येथील युवकास आरमोरी पोलिसांनी केली अटक


हर्ष साखरे सुपर फास्ट बातमी संपादक 

आरमोरी: एका अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेऊन तिला गर्भवती करणाऱ्या आरोपी युवकास आरमोरी पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केल्याची घटना दिनांक २४ ऑक्टोबर रोजी घडली. विनोद घनश्याम पात्रीकर (२०) रा. इंजेवारी ता. आरमोरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. 

 

पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार यातील फिर्यादी पिडीतेची आई ही दि २२ ऑक्टोबर २०२४ रोजी काम करुन घरी आल्यावर त्यांना त्यांची मुलगी पिडीता ही घरी आढळून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेवुनही ती मिळुन नआल्याने आरमोरी पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्यासाठी आली असता आरमोरी पोलीसांनी तिच्या लोकेशन बाबत माहीती काढुन तिचा त्वरीत शोध घेतला. मुलगी मिळुन आल्याने कोणतीही तक्रार करायची नाही असे लेखी दिले व रिपोर्ट न देता मुलीला ताब्यात घेवुन घरी गेली.

 

त्यानंतर दि. २३ ऑक्टोबर रोजी पिडीतेच्या आईला व नातेवाईकांना पिडीता गर्भवती असल्याबाबत शंका आल्यानेपिडीतेच्या आईने केलेल्या तपासणीत पिडीता ही गर्भवती असल्याचे लक्षात आले. पिडीतेला विश्वासात घेवून तिच्या आईने विचारले असता पिडीतेने इंजेवारी येथील विनोद पात्रीकर याने आपल्यासोबत शारिरीक सबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.

 

 

यामुळे पिडीतेच्या आईने आरमोरी पोलीस ठाण्यात येवुन दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात कलम ३७६ (२) (१), ३७६ (२) (नं, भा. द. वी. सहकलम ४,६,८,१२, बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम२०१२ अन्वये गुन्हा नोंद केली व दिनांक २४ ऑक्टोबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीवर गुन्हा दाखल होताच आरोपीस न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती राक्षे करीत आहेत.

पीडितेला पुढील वैद्यकीय उपचारासाठी गडचिरोली येथील महीला व बालरुग्णालय येथे पाठविण्यात आले.

 

 

 

आरमोरी तालुक्यात पोक्सो अंतर्गत गुन्ह्यांची वाढली संख्या

आरमोरी हे विद्येचे माहेरघर असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, विद्यार्थीनी आरमोरी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन नको ते कृत्य करीत असल्याने आरमोरी पोलीस ठाण्याअंतर्गत पोक्सो खालील गुन्ह्यामध्ये वाढ होत असल्याचे दिसुन येत आहे. याकरीता शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज व्यक्त होत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 26, 2024

PostImage

कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाकडून दारू, पैसा वाटप होईल तर इथे तक्रार करा


विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 :

 

उमेदवारांकडून प्रलोभन : खर्च निरीक्षकांकडे करा तक्रार

 

 

गडचिरोली दि. २६: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाकडून आमिष अथवा प्रलोभन दाखविणेकरीता वस्तुंचे वाटप करुन आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन निवडणुक खर्च निरीक्षक राजेश रामाराव कल्याणम यांनी केले आहे.

 

 नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्र. 1950 किंवा निवडणुक निरीक्षक (खर्च). राजेश रामाराव कल्याणम यांचा मोबाईल नंबर 9420067626 यावर तक्रार नोंदवता येईल. यासोबतच 67- आरमोरी विधानसभा मतदारसंघ करिता 9403326705 या क्रमांकावर, 68- गडचिरोली विधानसभा मतदारसंघ करिता 8261824675 आणि 69- अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता 8999325319 या सहाय्यक निवडणुक खर्च निरीक्षकांकडील संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवता येतील.

 

०००


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 25, 2024

PostImage

नवऱ्याने केली पत्नीची हत्या


 

सिरोंचा : झोपलेल्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून नवऱ्याने तिची हत्या केल्याची घटना काल २३ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्ली येथे घडली. पद्मा समय्या बोल्ले (३५) रा. कोटा पोचमपल्ली असे मृतकाचे नांव आहे. तर समय्या मुथय्या बोल्ले (४०) असे आरोपी पतीचे नांव असून तो फरार झाला आहे.

 

प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून बोल्ले पती- पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होता, काल रात्रीच्या सुमारास पद्मा ही झोपली असतांना आरोपी समय्या याने धारदार शस्त्राने पत्नीच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली व घटनास्थळावरून पळ काढला.

 

घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास सिरोंचा पोलीस ठाण्यातील पोलीस निरक्षक हे करीत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 25, 2024

PostImage

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात रामदास मळूजी मसराम (इंडीयन नॅशनल काँग्रेस) यांनी आज केले नामनिर्देशनपत्र दाखल


*जिल्ह्यात आज दोन उमेदवारी अर्ज दाखल*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.25: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यात आज दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

67-आरमोरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात रामदास मळूजी मसराम (इंडीयन नॅशनल काँग्रेस) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. तर 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. डॉ. होळी यांनी काल व आज असे एकूण दोन अर्ज दाखल केले आहेत. 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. जिल्ह्यात आजपर्यंत पाच उमेदवारांकडून एकूण सहा नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

आज 25 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 11 व्यक्तींनी 32 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 4 व्यक्तींनी 8 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात चार दिवसात एकूण 186 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

भाजप मधुन डॉ.देवराव होळी व डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले नामनिर्देशनपत्र दाखल


 

गडचिरोली, (जिमाका) दि.24: सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी 68-गडचिरोली (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात दोन अर्ज दाखल करण्यात आले आहेत. डॉ. मिलिंद रामजी नारोटे (भारतीय जनता पार्टी) व डॉ. देवराव मादगुजी होळी (भारतीय जनता पार्टी) यांनी आज नामनिर्देशनपत्र दाखल केले. 67-आरमोरी (अ.ज.) व 69-अहेरी (अ.ज.) या दोन विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही. तर 69-अहेरी (अ.ज.) या विधानसभा मतदारसंघात कालपर्यंत दोन अर्ज दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आजपर्यंत एकूण चार नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.

 

आज 24 ऑक्टोबर रोजी आरमोरी विधानसभा मतदारसंघातून 6 व्यक्तींनी 16 नामनिर्देशन अर्जाची उचल केली तर गडचिरोली विधानसभा मतदार संघातून 7 व्यक्तींनी 19 अर्जाची आणि अहेरी मतदारसंघातून 6 व्यक्तींकडून 9 अर्जाची उचल करण्यात आली आहे. जिल्ह्यात तीन दिवसात एकूण 137 नामनिर्देश अर्जाची उचल झाली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 29 ऑक्टोबर 2024 पर्यंत आहे.  

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले


 

चामोर्शी : रानटी टस्कर हत्तीसोबत सेल्फी काढण्याचा नाद एका मजुराच्या जिवावरच बेतला. टस्कर हत्तीने हल्ला करून या मजुराला चिरडून जागीच ठार केले. ही घटना चामोर्शी तालुक्याच्या आबापूर जंगलात आज सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास घडली.

 

श्रीकांत रामचंद्र सतरे (२३, रा. नवेगाव, भुजला, ता. मूल, जि. चंद्रपूर) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात केबल टाकण्याचे काम करण्याकरिता नवेगाव येथून श्रीकांत सतरे हे आपल्या काही सोबत्यांसह आले होते. गडचिरोली वनविभागातील कुनघाडा रै. वन परिक्षेत्रांतर्गत आबापूर गाव परिसरातच हे काम सुरू होते. दरम्यान, २३ ऑक्टोबर रोजी चातगाव व गडचिरोली वन परिक्षेत्रातून रानटी टस्कर हत्तीने कुनघाडा रै. वन परिक्षेत्रात प्रवेश केलेला होता. नियत क्षेत्र मुतनूर वनक्षेत्रातील आबापूर जंगलात टस्कर हत्ती वावरत असल्याची माहिती केबल टाकणाऱ्या मजुरांना मिळाली व त्यापैकी तिघेजण हत्ती पाहायला गुरुवारी सकाळीच गेले होते.

 

पळ काढल्याने वाचला दोघांचा जीव

 

हत्ती दूरवरच असताना श्रीकांत हा हत्तीसोबत सेल्फी काढण्यात मग्न असतानाच हत्तीने हल्ला करून त्याला चिरडले. तोपर्यंत अन्य दोघेजण तेथून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यशस्वी झाले. हे मजूर केबल टाकण्याचे काम करण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात आले होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देणार


गडचिरोली : भाजपने जाहीर केलेला पहिल्या यादीत जिल्ह्यातील केवळ आरमोरीचा समावेश आहे. यात गडचिरोलीचे नाव नसल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली असून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांना उमेदवारी दिल्यास भाजपमधील एक मोठा गट पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. तर होळींनी देखील समर्थकांना पुढे करून दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

गडचिरोली विधानसभेसाठी भाजपमधून विद्यमान आमदार डॉ.देवराव होळी यांच्या व्यतिरिक्त डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी या तिघांमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आमदार होळी यांच्या विरोधात आदिवासी समाजाची असलेली नाराजी आणि लोकसभेत पक्षविरोधी कारवाया केल्याच्या तक्रारी, यामुळे याठिकाणी उमेदवार बदलण्यासंदर्भात पक्षाकडून चाचपणी करण्यात आली. दुसरीकडे संघपरिवाराचे जवळचे असलेले डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासाठी संघ आणि भाजपधील महत्वाचे पदाधिकारी आग्रही आहे. त्यामुळे भाजपमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पहिल्या यादीमध्ये गडचिरोलीचे नाव नसल्याचे बघून आमदार होळी समर्थकांमध्ये खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी होळी यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.

 

 

मात्र, यात भाजपचे महत्वाचे पदाधिकारीच अनुपस्थित होते. उमेदवारी जाहीर करण्यात विलंब होत असल्याने डॉ. मिलिंद नरोटे समर्थकदेखील अस्वस्थ झाले आहे. भाजप आणि संघातील एक मोठा गट नरोटे यांच्या पाठीशी आहे. त्यांचा होळींच्या उमेदवारीला विरोध आहे. त्यामुळे आज गुरुवारी नरोटे समर्थकांनी एक बैठक आयोजित केली असून नरोटे यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाला सोडचिठ्ठी देणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे गडचिरोलीची उमेदवारी जाहीर करताना भाजप नेतृत्वाची चांगलीच दमछाक होणार आहे.

 

 

आमदार होळी समर्थकांची २५ ला सभा

आमदार होळी उमेदवारीसाठी दाबतंत्राचा वपार करीत असून २५ ऑक्टोबरला त्यांनी समर्थकांची सभा आयोजित केली आहे. यामध्यमातून ते पक्षावर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे गडचिरोली भाजपामध्ये मोठे राजकीय वादळ उठण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे डॉ. उसेंडी हे देखील उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यांच्यासाठी चिमूरचे आमदार बंटी भंगाडिया मैदानात उतरले आहे. उसेंडी यांना उमेदवारी मिळावी म्हणून भंगाडिया यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना गळ घातली आहे. परंतु स्थानिक भाजप पदाधिकारी त्यांच्यासाठी अनुकूल नाही. त्यामुळे ऐन निवडणुकीत भाजपला बंडाखोरीचा फटका बसू शकतो


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

अहेरीत ‘वडील विरुद्ध मुलगी’ असा थेट होणार सामना


गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेतून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून अहेरी विधानसभेतील राजकारणाची राज्यपातळीवर चर्चा होती. सोबतच काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. अहेरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक दावा राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आग्रही असताना देखील शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अहेरीत ‘वडील विरुद्ध मुलगी’ असा थेट सामना होणार आहे. दरम्यान, भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मंत्री आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात होते. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे ते आता अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. अहेरीतील एकंदरीत राजकीय समिकरण बघता यंदा कधी नव्हे ते चार तुल्यबळ उमेदवार उभे राहणार आहे. त्यामुळे विजश्री खेचून आणण्यासाठी सर्वांचाच कस लागणार आहे.

 

 

 

काँग्रेसही लढणार

महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार हे हणमंतू मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या बैठकीत वाडेट्टीवार यांनी अहेरीची जागा आम्ही लढवणारच यावर ठाम होते. गुरुवारी दिवसभर काँग्रेसच्या गोटात घडलेल्या घडामोडीनंतर हणमंतू मडावी देखील काँग्रेसकडून नामांकन दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. पुन्हा तीच पारिस्थिती उद्भवल्यानेमहाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... अयोध्याप्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला


 

पुणे: अनेकदा न्यायालयात काम करताना एखाद्या प्रकरणावर कोणते उपाय सूचवावेत हे आपल्याला सूचत नाही. ज्यावेळी अयोध्येचे काम माझ्यापुढे आले होते, त्यावेळी ३ महिने आम्ही अयोध्येच्या कामावर विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्यावर कुणी उपाय काढला नाही ते काम आमच्यापुढे आले. हे काम सुरू असताना यातून मार्ग कसा शोधायचा हे कुणालाही माहीत नव्हते. मी दैनंदिन जीवनात दररोज पूजा करतो, त्यामुळे

 

यातून मार्ग शोधून द्या, अशी प्रार्थना केली. मनात आस्था असेल तर मार्ग नेहमी निघतो असे मला वाटते, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले. रविवारी सरन्यायाधीश त्यांच्या मूळ गावी खेड तालुक्यातील कनेरसर येथे असताना त्यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्या. ए. एस. सय्यद, न्या. एस. बी. पोळ, न्या. एस. बी. पवार, उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे आदी उपस्थित होते.

 

देवीच्या कृपेमुळे मी सरन्यायाधीश झालो

 

गावातील यमाई देवीच्या कृपेमुळे मी सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे मला कायम वाटते. कनेरसर गावासोबतचे माझे नाते लहानपणापासून आहे, या शब्दांत चंद्रचूड यांनी भावना व्यक्त केल्या.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 24, 2024

PostImage

ट्रकची दुचाकीला धडक; सरपंच गंभीर कढोली-वैरागड मार्गावरील घटना


कढोली, (वा.). दुचाकीस्वार सरपंच यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. 23) कढोली- वैरागड मार्गावरील सती नदीच्या पुलाजवळ घडली. अविनाश टेकम (37, रा. सावलखेडा, ता. कुरखेडा) असे जखमी सरपंचाचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सरपंच अविनाश टेकाम हे आपल्या दुचाकीने काही कामानिमित्त कढोली येथे आले होते.

 

काम आटोपून ते आपल्या स्वगावी कराडीला जात होते. दरम्यान, कढोली-वैरागड मार्गावरील सती नदीपुलावर दोन ट्रकांच्या मध्ये त्यांची दुचाकी आल्याने एका ट्रकचा हुक त्यांच्या दुचाकीला लागताच ते दुचाकीसह खाली कोसळले. घटनेची माहिती शेतावरून काम करून परत येत असलेल्या महिलांनी कढोलीचे माजी सरपंच चंद्रकांत चौके यांच्यासह पदाधिका-यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून जखमी सरपंचास उपचाराकरीता कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यानंतर सोनसरी येथील डॉ. विवेक आकरे यांनी जखमी सरपंचावर उपचार केले.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 21, 2024

PostImage

गडचिरोली : पोलीस चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार


गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. गडचिरोलीतील छत्तीसगड सीमावर्ती भागात नक्षलविरोधी पोलीस पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर एक पोलीस जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. भामरागडमधील कोपरीच्या जंगलात ही चकमक झाली आहे. या भागात अनेक नक्षलवादी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात कारवाई केली. या चकमकीत तीन ते चार नक्षलवादी ठार झालेत.

 

 

गडचिरोलीत पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक

गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील कोपरी हा शेवटच्या जंगल परिसर आहे. या भागात सध्या चकमक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या कोपरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी असल्याचा गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर या जंगलात ऑपरेशन राबविण्यात आलं आहे. सी. सिक्सटी पोलीस पथकाचे तुकड्या वाढवण्यात येत आहेत.

 

धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धर्माराव आत्राम आज भामरागड दौऱ्यावर आहेत. अशातच भामरागड तालुक्यात चकमक घडल्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आत्राम यांच्या सुरक्षेसाठी वाहनांच्या ताफा येण्यास सुरुवात झालीय. आत्राम यांना पोलिसांच्या मोठा बंदोबस्त देण्यात येणार असल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी कॅबिनेट मंत्री आत्राम हे भामरागड तालुक्याला सकाळी गेले. त्यानंतर ते आता गडचिरोलीत विविध ठिकाणी प्रचारासाठी फिरणार आहेत. अशातच पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. त्यामुळे आत्राम यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 19, 2024

PostImage

सर्पदंशाने पलसगडच्या शेतकऱ्याचा झाला मृत्यू


 

 कुरखेडा : शेतातील चवळीच्या शेंगांचीतोडणी करीत असताना शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना तालुक्याच्या पलसगड येथे घडली.

 

मोहन आत्राम (६१) रा. पलसगड, असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मोहन आत्राम यांच्या शेतातील धान कापणी व बांधणीचे काम पूर्ण झालेले आहे. त्यांच्या शेतातच चवळीचे वेल आहेत. येथे लागलेल्या शेंगा ते तोडता असताना त्यांच्या पायाला

 

विषारी सापाने दंश केला. त्यांच्या पायाला काहीतरी रुतल्याचा भास झाला. त्यांनी लक्ष दिले नाही. गावापासून खूप लांब अंतरावर शेत आहे. त्यामुळे त्यांना घरी परत येण्यासाठी बराच उशीर झाला. तोपर्यंत त्यांची प्रकृती खालावली. दरम्यान, त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंड आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 19, 2024

PostImage

बँक व्यवस्थापकाने केले युवतीचे शारीरिक शोषण


 

आरोपीला पीसीआर : मुलचेरातील प्रकार

 

 मुलचेरा तालुक्याच्या लभानतांडा येथील २० वर्षीय युवतीचे लैंगिक शोषण करणाऱ्या धानोरा येथील बँक व्यवस्थापकावर मुलचेरा पोलिसांनी गुन्हा नोंदविला. त्यानंतर सदर आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 

विजय सदानंद राठीपिटने (३६, रामटेक, जिल्हा नागपूर), असे आरोपीचे नाव आहे. विजय राठीपिटने हा २०२३ रोजी मुलचेरा येथील विदर्भ कोकण बँकेत व्यवस्थापकपदी कार्यरत होता. तेव्हा लभाणतांडा येथील युवती ही बँकेत ये जा करायची. दरम्यान, दोघांचाही परिचय झाला. 'तुला शिक्षणासाठी मदत करतो व अधिकारी बनवतो व लग्न करतो' असे आमिष आरोपी विजय राठीपिटने याने युवतीला दिले. त्यानंतर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, मुलीने जेव्हा लग्नासाठी आग्रह धरला तेव्हा 'तू वाईट प्रवृत्तीची मुलगी असून माझ्याकडून पैसे घेतलेले आहेत' अशी दमदाटी देत लग्नास नकार दिला. झालेल्या मानसिक त्रासामुळे मुलीने मुलचेरा पोलिस स्टेशनमध्ये १५ ऑक्टोबरला शारीरिक शोषणाची तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून आरोपीला अटक करून गुन्हा नोंद करीत न्यायालयात हजर केले असता १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश विधाते व पीएसआय ऋतुजा खाते करत आहेत.

 

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 7, 2024

PostImage

कुकडी: प्रेमप्रकरणाचा संशय; मुलीने घेतले विष


वैरागड (गडचिरोली): दोन अपत्ये असलेल्या व्यक्तीवर प्रेमप्रकरणाच्या संशयावरून त्याची पत्नी, आई व वहिनीने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन मारझोड केली. हा अपमान मुलीच्या जिव्हारी लागला आणि तिने विष प्राशन केले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता आरमोरी तालुक्याच्या कुकडी येथे घडली.

 

शिवानी फकीरदास कोवे (१७, रा. कुकडी, ता. आरमोरी) असे मृत मुलीचे नाव आहे. शिवानी ही विहीरगाव येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ व्या वर्गात शिकत होती. विहीरगाव येथीलच चिकन सेंटर चालक प्रशांत विश्वनाथ भोयर यांच्याशी तिचे प्रेम असल्याचा संशय प्रशांतची पत्नी शिल्पा भोयर (२८), आई कल्पना भोयर (५५) आणि वहिनी अरुणा प्रफुल्ल भोयर (३३) यांना होता. प्रेमप्रकरणाच्या संशयातून त्यांनी गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुकडी गावात

पोहोचून थेट शिवानीचे घर गाठले व मारझोड केली. झालेले आरोप व अपमान शिवानीच्या जिव्हारी लागला. घरीच उपलब्ध असलेले उंदीर मारण्याचे विष प्राशन केले. काही वेळेतच तिची प्रकृती बिघडायला लागली. शेजाऱ्यांनी तिला आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. तेथे उपचार सुरू असतानाच शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिन्ही महिलांवर आरमोरी पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

 

आई-वडील परजिल्ह्यात, साधला डाव

घटनेच्या दिवशी शिवानीची आजी शेतावर गेली होती, तर लहान बहीणसुद्धा घरी नव्हती. तर शिवानीचे आई-वडील काही दिवसांपूर्वीच परजिल्ह्यात मजुरीसाठी गेलेले होते. हाच डाव साधून तिन्ही महिलांनी शिवानीशी जोरजोरात भांडण करून तिला खोलीत डांबून मारझोड करीत धमकीसुद्धा दिली. शिवानीला मारझोड करताना कुणीही अटकाव केला नाही. मारझोडीनंतर तिन्ही महिला विहीरगाव येथे निघून गेल्या. 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 5, 2024

PostImage

वन्यजीव सप्ताह निमित्ताने रामाळा येथे रॅली 


 

आरमोरी वनपरिक्षेत्रातील मौजा रामाळा येथे "वन्यजीव सप्ताह " निमित्ताने जनजागृती रॅली काढण्यात आली. दरवर्षी 1 ते 7 ऑक्टोंबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो त्या दरम्यान वनविभागाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून वन्यजीवांविषयी मार्गदर्शन व जनजागृती करण्यात येतो. सदर सप्ताहाचे औचित्य साधून आरमोरी पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा रामाळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रामाळा व वनपरिक्षेत्र आरमोरी यांच्या वतीने रॅली काढून गावांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

 सदर कार्यक्रमाला, आरमोरी उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री.फुलझेले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री . मडावी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती श्री.खुशाल नैताम, शिक्षीका सौ.पिलारे मॅडम, माकडे मॅडम, वनरक्षक अजय उरकुडे,पी.आर.पाटील, आनंद साखरे,कु.डोंगरे मॅडम, वनमजूर किर्ती मेश्राम, होणाजी कुथे, मोरेश्वर बोरूले, वाहन चालक सुनील उरकुडे व विद्यार्थी उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Oct. 4, 2024

PostImage

Breking news : पोलिसांनी केले 30 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना केले ठार


नारायणपूर: छत्तीसगडमधील नारायणपूर-दंतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर शुक्रवारी सुरक्षा दलाला मोठे यश आले. चकमकीत सुरक्षा दलाने ३० नक्षलवाद्यांना ठार केले. घटनास्थळावरून जवानांना मोठ्या प्रमाणात ऑटोमॅटिक शस्त्रे सापडली आहेत. नक्षलवाद्यांकडे एके ४७ देखील असल्याचे समोर आले आहे. या चकमकीनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आले आहे. चकमकीत सहभागी झालेले सर्व जवान सुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

नक्षलवाद्यांसोबतची चकमक अबूझमाड येथे झाली. हा परिसर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात सीमाभागात येतो. अबूझमाड क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलाच्या संयुक्त पथकाने सर्च ऑपरेशन सुरू केले. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. उत्तरादाखल सुरक्षा जवानांनी कारवाई केली.

 

सुरक्षा दलाला आतापर्यंत १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. त्याच बरोबर AK 47, SLR सह अन्य शस्त्रे सापडली आहेत. गेल्या काही महिन्यात छत्तीसगड नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीच्या बातम्या समोर येत आहेत. याआधी २३ सप्टेंबर रोजी नारायणपूर येथे झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले होते, ज्यात २ पुरुष आणि १ महिलेचा समावेश होता. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ सप्टेंबरला सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाने दोघ नक्षलवाद्यांना ठार केले होते. चकमकीनंतर दोघांचे मृतदेह त्यांचे सहकारी घेऊन गेले होते. या वर्षभरात छत्तीसगडच्या बस्तर क्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या १५०च्या पुढे आहे.

 

 

 

राज्याचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय हे देखील बस्तर दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष रमन सिंह आणि वनमंत्री केदार कश्यप देखील दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच सुरक्षा दलाने ही मोठी कारवाई केली आहे.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 30, 2024

PostImage

चक्क गडचिरोली जवळ सेमाना देवस्थान येथे पोहचले हत्ती


 

गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून हौदोस घालणारे जंगली हत्ती गडचिरोली शहरापर्यंत पोहचले आहे.

 

आज रात्री शहरालगत असलेल्या सेमाना देवस्थान जवळ जंगली हत्ती राष्ट्रीय मार्गावर आले आहे. यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला असून येथे या मार्गावर प्रवास करणाऱ्याना जंगली हत्तीचे दर्शन झाले आहे. या वेळी वन विभाग कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून तुतास नागरिकांना ध्वनीक्षेपण द्वारे आव्हान करण्यात येत आहे.

 

या लिंक वर आपणाला हत्ती पाहायला मिळेल.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://youtu.be/FWqNE9TRHXs?si=wgVbf7UyghYkAU_V

सदर हत्तीच्या कळप मध्ये २२ हत्ती असल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे. सकाळी मोर्निंग वाक करिता जाणाऱ्यानी स्वताची सुरक्षेची काळजी घ्यावी. हत्तीचा मुक्काम किती काळ राहणार हे पाहणे आवश्यक आहे, सदर हत्ती हे ओरिसा राज्यातून आले आहे. या जिल्ह्यतील वातावरण त्यांना मानवले असल्याने त्यांचा या जिल्ह्यत कायमचा मुक्काम रराहण्याची शक्यता आहे.

 


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 16, 2024

PostImage

आरमोरी येथे आझाद समाज पार्टीची विषेश बैठक संपन्न.......


 

 

              आज दिनांक १६ सप्टे. रोज सोमवार ला आरमोरी येथील रेस्ट हाऊस मध्ये आझाद समाज पार्टी तालुका आरमोरी ची विषेश बैठक घेण्यात आली. सदर बैठकीला अध्यक्ष म्हणुन ऋषी सहारे तालुका अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी आरमोरी तालुका कार्याध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम मैंद यांची नियुक्ती करण्यात आली.

 

सदर बैठकीमधे सविस्तर चर्चा करुन खालील मुद्दे घेण्यात आले.

 

१) लेटर हेड तयार करणे

२) ग्रामीण भागातील बस सेवा सुरू करण्यात बाबत 

३) कामगार वर्गाकरिता आंदोलन करणे. कामगारांना, हमाल पेन्शन लागू करा. ५० वर्ष वयाची अट 

४) बांधकाम विभाग विरोधात आंदोलन

५) शालेय पोषण आहार वर भर देणे 

६) भरम साठ बिला संदर्भात एम एस ई बी वर आंदोलन करने 

 

               सदर बैठकीला आझाद समाज पार्टी आरमोरीचे तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, पुरुषोत्तम मैद तालुका कार्याध्यक्ष, सुरेंद्र वासनिक ता.सचिव, शुभम पाटील ता. अध्यक्ष युवा आघाडी, स्वाती खोब्रागडे ता.महीला अध्यक्ष, नितीन भोवते शहर अध्यक्ष, पियूष वाकडे ता.उपाध्यक्ष युवा आघाडी, नितेश बगमारे, आदी पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.


PostImage

सुपर फास्ट बातमी

Sept. 16, 2024

PostImage

दुचाकीची झाडाला धडक; होमगार्ड ठार


 

शिरपूर मार्गावर रात्री अपघात : सकाळी मृतावस्थेत आढळला

 

 मोहटोला (किन्हाळा) : दुचाकीवरील चालकाचे सुटले व वाहन रस्त्यालगत पळसाच्या झाडावर आदळले. हा अपघात एवढा भीषण होता की, झाडाच्या फांद्या तुटून युवकावर पडल्या. यात गृहरक्षक दला (होमगार्ड) च्या जवानाचा जागेवरच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, १४ सप्टेंबरच्या रात्री देसाईगंज तालुक्यातील मोहटोला (किन्हाळा) शिरपूर मार्गावर महाजन डोंगरी या परिसरात झाला. देवेंद्र श्यामराव देवरे (३५) मु. वासी ता. कुरखेडा असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तो कुरखेडा पोलिस ठाणे अंतर्गत गृहरक्षक दलाचा जवान होता. रविवारी सकाळी व्यायामाकरिता गेलेल्या

मोहटोला व विहीरगाव येथील युवकांना रस्त्यावर दुचाकीला उपघात झाल्याचे दिसून आले. या युवकांनी या अपघाताची माहिती देसाईगंज पोलिस स्टेशनला दिली. एमएच ३३, एल- ४००३ या क्रमांकाची दुचाकी घटनास्थळावर पडून होती. देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करून मर्ग दाखल केला आणि प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक