समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
08-03-2024
कुरखेडा: कुटुंबात कलह वाढल्याने पत्नी महिनाभरापूर्वी माहेरी निघून गेली. त्यामुळे वाढलेल्या भांडणतंट्यांमुळे पतीच्या मनातही नैराश्य आले. पत्नी माहेरी निघून गेल्याचे व कौटुंबिक कलहाचे दुःख चे दुःख सोसवेना झाल्याने पतीने चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवार ६ मार्च रोजी सकाळी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथे उघडकीस आली. किरपाल रामजी भोंडे (३१) रा. आंधळी,
असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. भोंडे यांच्या कुटुंबात सततची भांडणे होत होती. याच कौटुंबिक कलहामुळे महिनाभरापूर्वी किरपालची पत्नी घर सोडून माहेरी गेली. तेव्हापासून किरपाल हा नैराश्यात होता. दरम्यान, बुधवार ६ फेब्रुवारी रोजी सकाळी गावालगतच्या चिंचेच्या झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत किरपाल यांचा मृतदेह आढळून आला. पुढील तपास कुरखेडा पोलीस करीत आहेत.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments