बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
19-07-2024
राजूर/जालना: भोकरदन तालुक्यातील राजूर येथून जवळच असलेल्या वसंतनगर येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत जालना येथून येणाऱ्या काळी पिवळी जीप मोटारसायकल स्वरास वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायवरचा ताबा सुटून कोसळली त्यात सात जण मृत्यूमुखी पडले.
ही घटना जालना-राजूर रोडवरील तुपेवाडी फाट्यावरील खडेश्वरी बाबाजी यांच्या शिवशक्ती आश्रम असलेल्या बाजूच्या विहिरीजवळ गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान घडली. अपघातातील मृत हे पंढरपूर
यात्रेवरून गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात घडला. मृतामध्ये चनेगाव व तपोवन येथील नागरिकांचा समावेश होता. गाडीत एकूण १३ जण होते पैकी ५ जणांना वाचवण्यात गाडी ड्राइव्हर बाबुराव हिवाळे व वसंतनगर येथील स्थानिकांना यश मिळाले. तर ७ मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये प्रल्हाद उत्तम महाजन (वय ६५), ताराबाई मालुसरे, नंदा बाळू तायडे (वय ३५), प्रल्हाद आनंद बिटले, नारायण किसण निहाळ (वय ४५), चंद्रभागा अंबादास घुगे (वय ४८) व एक महिला जिची ओळख पटली नाही यांचा समावेश आहे.
३ जण सुखरूप असून दोन जणांना शासकीय रुग्णालय जालना येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक दोन अग्निशमक पथकाने भेट देऊन बचावकार्य केल.
५ भाविकांना वाचविण्यात यश
घटनास्थळी क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढण्यात आली. आणखी काही मृतदेह विहिरीत असण्याची शक्यता आणखी शोध सुरु आहे.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments