रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
21-01-2024
गडचिरोली - आलापल्ली वन विभाग अंतर्गत येत असलेल्या मार्कंडा (कं) वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यातआणखी एकजण ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बापूजी नानाजी आत्राम (४५) रा. लोहारा, ता. मुलचेरा असे मृतकाचे नाव असून रेंगेवाही उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक २९३ मध्ये त्याचा मृतदेह १८ जानेवारी रोजी आढळून आला आहे.
मागील पाच महिन्यापासून मुलचेरा तालुक्यात वाघिणीने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. सुरुवातीला त्या वाघिणीने पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार केले. त्यानंतर विश्वनाथनगर आणि कोठारी येथील दोन जणांवर हल्ला करून जखमी केले. तर ७ जानेवारी रोजी चिंतलपेठ येथील सुषमा देवदास मंडल आणि १५ जानेवारी रोजी कोडसापूर येथील रमाबाई मुंजमकर या दोन महिलांचा बळी घेतला. या घटनांमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. वन विभागाने आरआरटी ला पाचारणकरून १८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास वाघिणीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास घेतला. मात्र, वाघिणीला जेरबंदकेलेल्या त्याच परिसरात जवळपास दोनशे मीटर अंतरावर पुन्हा एक मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
वनाधिकाऱ्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष भोवले
बापूजी नानाजी आत्राम हा बेपत्ता असल्याने गावकऱ्यांनी शोधमोहीम राबविली असता त्याचा मृतदेह खंड क्रमांक २९३ मध्ये आढळून आला. विशेष म्हणजे शरीरापासून डोके गायब असून मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने वाघिणीने जेरबंद होण्यापुर्वीच त्याला हल्ला करून ठार केल्याच्या बाबीस वनाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. वाघीणीस जेरबंद करण्याची मोहीम सुरू असतांना सदर ईसम दारू पिऊन जात होता. त्याला प्रतिबंधित क्षेत्रात जाण्यास मनाई करण्यात आली असतांनाही त्याने वनाधिकाऱ्यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले. वाघीणीचीशोधमोहीम सुरू असतांनाच वाघिणीने त्याला ठार केले. त्याच्या कुटूंबियांना ५० हजारांची मदत करण्यात आली आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments