संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
22-01-2024
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र च्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित एक दिवसीय पुरस्कार सोहळा, स्नेह भेट व कविसंमेलन नुकतेच १४/०१/२०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन दादर मुंबई येथे मोठया उत्साहाने पार पडला. ह्या सोहळ्यात मान. मिलींद बी. खोब्रागडे, रा. गडचिरोली ह्यांना "राज्यस्तरीय काव्यलेखन गौरव पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले.
संमेलनाचे उद्धघाटक सन्माननीय भीमराव यशवंत आंबेडकर (धम्म सम्राट) यांच्या उपस्थितीत "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या चैत्य भूमीत" हा सोहळा दिनांक १४/०१/२०२४ रोजी संपन्न झाला. राष्ट्रीय व राज्यस्तरीय किर्तीचे जेष्ठ साहित्यिक ह्यांच्या हस्ते अनेक मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे मार्गदर्शक मान. विनोद जाधव सर, अध्यक्ष नरेंद्र पवार सर, उपाध्यक्षा मान. सौ. मालाताई मेश्राम मॅडम, सचिव मान. अनिल सावंत सर, व संमेलनाध्यक्ष बबन सरवदे सर तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा उत्साहात पार पडला.
संमेलनाला उपस्थित मान.राजीव खंडारे सर, मान. मधुकर दिवेकर सर, मान. सुभाष मानवटकर सर (क्रांतिज्योती सावित्रीमाई विचारमंच छ.संभाजीनगर महाराष्ट्र), मान.अर्चनाताई चव्हाण,मान. मालाताई मेश्राम, मान. प्रितीबालाताई बोरकर (रमाई साहित्यिक विचारमंच नागपूर महाराष्ट्र), मान. कल्पनाताई टेंभुर्णीकर, मान. नानाजी रामटेके सर, मान. हरिछंद्र धिवार सर (साहित्य दर्पण कला मंच नागपूर) चे सर्व कार्यकारी समिती तसेच मान. वैशालीताई खंडाळे, कांचनताई लांजेवार यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सर्व पदाधिकारी, ह्याचे खुप सुंदर रित्या संकलन केले.
सर्व अनेक राज्यभरातून आलेले नवकवी, ज्येष्ठ साहित्यिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वांनी मिलिंद बी. खोब्रागडे, गडचिरोली यांना यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments