STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
27-01-2024
*मंदार कृषी तंत्र विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*प्रतिनिधी : दिलीप अहिनवे*
मुरबाड, दि. २६ : मुरबाड तालुक्यातील कोळींब गावातील मंदार कृषी तंत्र विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून श्री चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोटे, संस्थेच्या उपाध्यक्षा विजयाताई पोटे, कल्याण मधील डॉ. अभिजीत शिंदे, स्थानिक उपसरपंच संकेश पाठारे, प्राचार्या निलाक्षी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य भुषण गायकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी जाधव, शिवसेना कार्यकर्त्या राजलक्ष्मी अंगारखे, माजी सरपंच कृष्णा राऊत, उद्योजक मोहन राऊत, विद्यार्थी व सर्व शिक्षक हे उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद पोटे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बासरी व बिगुल वाजवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शिक्षकांनी चांगल्याप्रकारे शिकवले व विद्यार्थ्यांची इच्छा असली तर रिझल्ट काय असतो हे उत्तम बासरी वाजवुन विद्यार्थिनींनी आम्हाला दाखवुन दिले. आपले हे ॲग्रीकल्चर कॉलेज आहे. मुले दहावी पास झाली की, त्यांना शेती करण्यास कमीपणा वाटतो. शेती मालाला बाजारभाव कमी मिळाला की, शेतकरी नाराज होतात. परंतु शेतीत प्रगती केली तर भविष्य चांगले आहे. सध्या परदेशात व आपल्या देशात शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती करत आहेत. भातशेती करायला येथील शेतकरी तयार नसतात. खर्च भरपुर परंतु त्यामानाने उत्पन्न कमीच मिळते.
कल्याण मधील एका संस्थेने मागील वर्षी आपल्या कॉलेजमधील १८ विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर काम केले. सन २०१२ च्या बॅचमधील चंद्रकांत पष्टे हा विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. आपल्याकडे आलेल्या संधीचे सोने करता आले पाहिजे. करता येण्याजोगे चांगले व्यवसाय भरपुर असतात ते करताना आपल्याकडे इच्छा हवी. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण आपल्या आयुष्यात काही तरी चांगले करायचे आहे असा निश्चय करुया. आपण यशस्वी व्हायचे आहे. आपल्या जोडीदाराला देखील सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे.
कल्याण मधील डॉ अभिजीत शिंदे यांनी सांगितले की, आज आपण ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय. आपल्या संविधानात न्याय, समता, एकता व बंधुता या चार घटकांचा समावेश होतो. ही चतु:सूत्री अंमलात आणण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक म्हणजे असे राज्य की, जेथे लोकांचा प्रतिनिधी लोकांमधुन जातो आणि तो लोकांसाठी सेवा तसेच कार्य करतो. म्हणून भारत हा प्रजासत्ताक देश आहे. भारतात आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो. भारताची आणि आपल्या प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याची संधी त्याला मिळते. आजच्या दिवशी आपण एक निश्चय करुया की, ही चतु:सुत्री अंमलात आणु. या चतु:सुत्रीचा कोठेही अवमान होऊ देणार नाही याची निश्चित स्वरुपाची काळजी घेऊ. एकमेकांच्या सहाय्याने आमच्या राष्ट्राचे कल्याण कसे होईल याचा विचार करु. तुम्ही आज छान पद्धतीने संविधानाचे वाचन केले आहे. आपण प्रत्येकाने संविधान आत्मसात करावे अशी आशा व्यक्त करतो.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments