नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
29-01-2024
नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याने कोट्यवधी लोकांना एकत्र आणले.
कार्यक्रमाच्या वेळी देशाची सामूहिक शक्ती दिसून आली. प्रभू रामाचे सुशासन संविधान निर्मात्यांसाठी प्रेरणास्रोत होते आणि म्हणूनच २२ जानेवारीला अयोध्येत मी 'देव ते देश' आणि 'राम ते राष्ट्र' बद्दल बोललो होतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.
या वर्षीच्या पहिल्या 'मन की बात' प्रक्षेपणात ते बोलत होते केले. अयोध्येतील अभिषेक सोहळ्याबाबत प्रत्येकाची भावना सारखीच आहे, या काळात अनेकांनी राम भजने गायली. तर २२ जानेवारीच्या संध्याकाळी देशाने 'राम ज्योती' पेटवून दिवाळी साजरी केली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महिला शक्त्ती प्रदर्शनाचे कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले की, २० तुकड्यांपैकी ११ तुकड्या पूर्णपणे महिलांच्या होत्या. २१व्या शतकातील भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचा मंत्र घेऊन पुढे जात आहे. या वेळी १३ महिला खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.प
द्म पुरस्कारांची प्रक्रिया बदलली
"पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले अनेक मान्यवर असे आहेत ज्यांनी तळागाळात काम केले आणि मोठे बदल घडवून आणले. मला खूप आनंद आहे की गेल्या दशकात पद्म पुरस्कार प्रदान करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. आता ती लोकांची पद्मा झाली आहे. आता लोकांनाही स्वतःला उमेदवारी देण्याची संधी मिळते. पद्म पुरस्कारांसाठी यंदाची नामांकने २०१४ पेक्षा २८ पट अधिक होती, असे पंतप्रधान मोदीनी या वेळी सांगितले.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments