संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
04-03-2024
रायपूर. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये रविवारी झालेल्या चकमकीत बस्तर फायटरचा आरक्षक शहीद झाला तर याच चकमकीत एक नक्षली ठार झाला. रमेश कुरेठी असे शहीद जवानाचे नाव आहे. कांकेर जिल्ह्यातील (छत्तीसगड) छोटेबेठिया पोलिस स्टेशन अंतर्गत हिदूर गावाजवळील संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक झाली. हिदूर जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात सुरू आली होती.
दरम्यान, वृत्त लिहीपर्यंत जंगलात चकमक सुरूच होती. चकमकीच्या घटनास्थळावरून एका नक्षलवाद्याचा मृतदेह आणि एके-47 रायफल जप्त करण्यात आली आहे. परिसरात शोधमोहीम सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. छत्तीसगडच्या बस्तर भागातील सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे तीन जवान, विशेष कमांडो बटालियन रिझोल्युट फॉर ऍक्शनमधील दोन जवान शहीद झाले होते. यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर ही घटना घडली आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments