नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
31-12-2023
गडचिरोली: म्हणता म्हणता २०२३ हे वर्ष संपण्यास अवघे काही तास उरले असून रविवार ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण राहणार असून रविवारी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने कोंबड्या, बकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कत्तल होणार असल्याचे बोलल्या जात आहे.
आज ३० डिसेंबर रोजी शनीवारी शहरातील मटन व चिकन मार्केटमध्ये फेरफटका मारला असता विशेष गर्दी दिसुन आली नाही. मात्र ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असून याच दिवशी रविवारही आला असल्याने रविवारी मटन चिकन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी उसळणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. ३१ डिसेंबर रोजी मोठ्या प्रमाणात मासांहार केला जात असल्याने चिकन, मटन विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या, बकऱ्या दुकानात आणुन ठेवल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील चिकन, मटन बाजारपेठेत प्रतिकिलो २५० पॅरेट रूपये आहे. बायलर २०० रूपये प्रतिकिलो तर कॉकरेल १५० रूपये प्रतिकिलो आहे. गावठी कोंबडीचा दर ५५० रूपये प्रतिकिलो आहे. तसेच बकऱ्याच्या मटनाचा दर ७०० रूपये प्रतिकिलो आहे. यामध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होऊ शकतो.
मात्र हौसेला मोल नसल्याने डिसेंबरला मासाहार ३१ करणाऱ्यांची पावले चिकन, मटन मार्केटकडे वळतील असे बोलल्या जात आहे. यामुळे रविवारी या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होणार असल्याचे मटन, चिकन विक्रेत्यांची चांदी होणार आहे.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments