समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
20-01-2024
गडचिरोली - खरीप पणन हंगाम २०२३-२४ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी केली जात आहे. यासाठी ऑनलाइन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरिता १५ जानेवारी ही अंतिम मुदत होती; परंतु २० ते २५ टक्के शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण नोंदणीसाठी विभागाने ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय हमीभावाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वी नोंदणी करावी लागते.
नोंदणी केल्यानंतरच शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत खरेदी केंद्रांवर विक्री करता येतो. जिल्ह्यात मागील वर्षी 9 नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली. सुरुवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. त्यानंतर एक महिन्याची म्हणजेच ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतरही नोंदणी न झाल्याने १५ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळाली. तरीसुद्धा नोंदणीसाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळली. त्यामुळे १५ जानेवारी रोजी शासनाने पत्र काढून ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments