ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
31-12-2023
कलेक्टरला खूप अधिकार आहेत.पण ते त्याचा वापर करीत नाहीत.त्यांना रेती माफियांचा राग नाही.जे त्यांचे ऐकत नाहीत,त्यांचा राग आहे.
डंम्पर पकडले. अंगावर घातले.जिवे मारण्याचा प्रयत्न केला.जप्त केले.गुन्हा दाखल केला.दंड आकारला.दंड माफ केला.ही बातमी टेम्पो,रेपो रेट वाढवण्यासाठी असते.तो कारवाई चा भाग नसतो.तो वसुली चा भाग असतो.त्यासाठी असे अधूनमधून करावे लागते.केले जाते.या कामी पत्रकार,चैनेल मदत करतात.
तलाठी, तहसीलदार, कलेक्टर ने आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अनेक रेती चोरांवर असे वाङमय निर्माण केले.परिणाम काय? वसुली.अधिकृत कमी आणि अनधिकृत जास्त.
काही तथाकथित आरटीआय, सामाजिक कार्यकर्ते बिरूद मिरवणारी माणसे सुद्धा रेती, राशन ,दारू, सट्टा,घुटका बाबत तक्रारी करतात.त्यांचेही हेच नियोजन असते.तुम्ही इतके कमवता तर आमचे काय?
महसूल, पोलिस, आरटीआय मंडळी असे मेवा खाण्याच्या कामाला सेवा म्हणतात.पेपरवाले सुद्धा त्यातून फुलाची पाकळी घेऊन बातमी छापतात.चोर आणि पोलिस चा असा खेळ चालू असतो.सामान्य जनता या खेळाला जास्त मनावर घेत नाहीत.उलट चीड निर्माण झाली आहे.उद्या खोटी बातमी आली.कलेक्टर ला रेती माफिया ने गोळ्या घालून हत्या केली.तर फक्त हितसंबंध असलेले लोक मेणबत्ती पेटवतील.श्रद्धांजली वाहतील.जसे एखादा बलात्कार झाला.तेंव्हा करतात,तसेच.आरोपी पकडला की, पुन्हा दुसऱ्या बलात्काराची वाट पाहातात.कारण बलात्काराची चीड येत नाही.उलट तो पैसा आणि प्रसिद्धीचा विषय बनतो.आतापर्यंत अनेक पोलिस आधिकाऱ्यांनी आत्महत्या केल्या.काहींना आप्तेष्टांनी मारले.काहींना गुंडांनी मारले.असिटंट कलेक्टर पेटवून मारले.कोण कोण रडायला गेले?कोणी सुतक पाळले?कोणी श्राद्ध केले?
नोकर आणि समाजसेवक यांची अशी मानसिकता विकसित झालेली आहे.यात कोण किती लक्ष देतो,हे वैयक्तिक आवडीनिवडीवर अवलंबून असते.आपल्यावर असलेल्या संस्कार वर अवलंबून असते.संस्कार म्हणजे टिळा,माळा,शेंडी,जानवे,दाढी नाही.आपली मानसिकता.
जळगाव शहरातील, जिल्ह्यातील पेपर उघडला कि,रोज गुन्हेगारांचे भले मोठे फोटो छापून येतात.त्यातील आधिकतम भ्रष्टाचारी, बलात्कारी, गुन्हेगारी रेकॉर्डवरील आहेत.तरीही फोटो झळकतोच.काहीतरी लागे बांधे, हितसंबंध, प्रेमसंबंध, ऋणानुबंध असेलच.
जळगाव शहरातील रस्ते उखडलेले आहेत.तरीही त्याच रस्त्यावर प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री,सेकंड मंत्री,थर्ड मंत्री, आमदार,खुनी बलात्कारी नगरसेवकाचा फोटो चौकाचौकात लावलेले आहेत.अयोध्येत रावणाचे कट आऊट.महिलांना, मुलांना, मुर्खांना वाटते हाच राम आहे .आपला तारणहार हाच आहे.याचा विपरीत परिणाम बाल बुद्धीवर होतो.पुढे ते सुद्धा हाच मार्ग पत्करतात.याचा अभ्यास अजित पवार यांनी बारकाईने केला होता.म्हणून ते विधानसभेत म्हणाले कि, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत?मी म्हणतो,माझा मुलगा तहसीलदार बीडीओ सीईओ कलेक्टर फौजदार,एसपी बनून तरी काय दिवे लावणार आहे?त्याऐवजी मामा आणि भाऊ चा मार्ग काय वाईट?सबसे बडा रूपय्या!
मी गावाकडील अनुभव सांगतो.माझ्या गावात दरवर्षी एकदा रात्री तमाशा होत असे.आम्ही आवर्जून पाहात असू.त्यातील राजा त्याच्या सिपाई ला खूप रागवत असे.कधीकधी तर चाबकाने वाजवत असे.मला वाटले, आता सिपाई ला राजाचा खूप राग आला असेल.तो सकाळी राजाला बदडणारच.पण पाहातो तर ते दोघे एकच लोटा घेऊन बाहेर गेले.एकच बीडी आळीपाळीने ओढत होते.कारण ते जिवलग मित्र होते.एकच व्यवसाय करून पोट भरत होते.कसला राग आणि कसला संताप?माझ्यासाठी तमाशा होता.त्यांचेसाठी नाटक होते.
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments