अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
29-03-2024
मोहझरी: आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील जिओचा टावरमधे गेल्या अनेक दिवसापासून तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे मोहझरी आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना एकमेकांना संवाद साधण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे .याबाबत जिओ कंपनीच्या ऑपरेटरला फोन करून ही समस्या कळविण्यात आली परंतु अजून पर्यंत त्यांनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्यामुळे सतत नेटवर्क गायब होत असल्यामुळे हि समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवली जात आहे.
मोहझरी गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय मध्ये सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात तसेच या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळा ,महाविद्यालय असल्यामुळे अशा ठिकाणी मोबाईल नेटवर्कची अत्यंत आवश्यकता असते परंतु गेल्या काही दिवसापासून दिवसातून बरेचदा मोबाइल नेटवर्क गायब होत असल्यामुळे नागरिक त्रासलेले आहेत. प्रति महिना 300 रू 500 रू रुपयाचा jio रिचार्ज प्रत्येक नागरिक करीत असतो परंतु दररोज नेटवर्क गायब होत असल्यामुळे मोबाईल खेळाचे वस्तू बनल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
कुटुंबातील आपल्या मित्र मंडळीला मोबाईल वरून फोन लावल्यास कधीही नेटवर्क गायब होत असल्यामुळे फोन कट होत असतो किंवा अत्यंत महत्त्वाचे बोलणे होत नाही त्यामुळे मोहझरी आणि परिसरातील नागरीक जिओ कंपनीच्या अशा भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत आहेत.
आज सर्व कामे शासकीय कामे ऑनलाईन पद्धतीने होत असतात परंतु मोहझरी येथील जिओ टावरचा मोबाईल नेटवर्क गायब होत असल्यामुळे शासकीय कामे करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. जिओ कंपनी सर्वात वेगवान इंटरनेट डाटा कस्टमरला पूरवित असल्याचा कांगवा करीत असते देशाने त्याच उद्देशाने अनेक नागरिकांनी जिओची सिम घेतलेली आहे परंतु त्यांचा मारलेला रिचार्ज वाया जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मोहझरी येथील जिओ टावर तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी मोहझरी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे अन्यथा आंदोलन करू असा इशारा जिओ कंपनीला नागरिकांनी दिला आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments