ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
29-12-2023
सध्या पुन्हा सुरू झालेल्या सर्दी, खोकला, तापाच्या साथीमध्ये पूर्वीपेक्षा काही वेगळी लक्षणे दिसत आहेत. रोज येणाऱया दहा रुग्णांपैकी किमान पाच तरी यापैकी काही त्रास घेऊन येत आहेत. यात दिसणारी वेगवेगळी लक्षणे आणि त्यावरील घरी करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊया.
काही महत्त्वाची किंवा दुर्लक्ष न करण्याची काही लक्षणे याप्रमाणे…
डोकेदुखी- कपाळ किंवा मुर्धा (टाळू, डोक्याचा वरचा भाग) दुखणे हे विशेष दिसत आहे. यासाठी नाकात साजूक तुपाचे पाच पाच थेंब सोडावेत. अर्ध्या तासात फरक दिसला नाही तर पुन्हा करावे. तरीही फरक दिसला नाही तर त्वरित वैद्याचा सल्ला घ्यावा.
जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणे- पित्ताचे त्रास असलेल्यांना सर्दी-खोकल्यावरील औषधे घेतल्याने जिभेला कात्रे पडणे किंवा तोंड येणेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी तूप फ्रिजमधे ठेवून थिजवावे आणि थंड झालेले तूप तोंडाला आतून, जिभेला, हिरडय़ांना सर्वत्र लावावे. जेवणात तूप साखर एकत्र करून खावे.
ताप येणे- यामधे मंद ज्वर ते तीव्र ज्वर यापर्यंत त्रास होऊ शकतो. त्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे उत्तम. सोबत बडीशेप, धणे जिरे यांचे पाण्यात उकळून केलेला काढा पित राहावे.
सर्दी होणे- यामधे कोरडय़ा खेकल्यासह सध्या एक तर नाकातून पाणी वाहणे ही तक्रार जास्त दिसत आहे किंवा कोरडय़ा खोकल्यानंतर नावाला थोडासा कफ पडला तर पडतो आहे अशी तक्रार रुग्ण करत आहेत. यासाठी वेगळे उपाय करण्याची गरज नाही. आधी सांगितलेले उपायच यावरही फायदा करतात. यावेळी थंडी आणि ढगाळ हवामान असे संमिश्र वातावरण सगळीकडे दिसत आहे. यामुळे होणारे त्रास टिकून राहतात. त्यामुळे सलग तीन ते सात दिवसपर्यंत उपाय करूनही फायदा होत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणे हाच उत्तम मार्ग असतो.
कोरडा खोकला- ज्येष्ठमध पाव चमचा आणि सब्जा बीज एक चमचा आणि पाणी एक कप एकत्र करून एक मिनिट उकळावे. गाळून गरम असतानाच घोट घोट प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.
खोकून खोकून घसा दुखणे- ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले पाणी घेऊन त्यात आल्याचा रस एक चमचा मिसळावा आणि प्यावे. घसा दुखणे लगेच कमी होते. तोंड येण्याची सवय असेल त्यानी आले वापरू नये. त्यांनी ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा मिसळून प्यावे. दिवसातून तीन वेळ करावे.
खोकून खोकून छातीत दुखणे- हेच ज्येष्ठमध आणि सब्जाचे उकळून गाळलेले गरम पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तूप मिसळून घोट घोट प्यावे. रोज तीन वेळ करावे.
घशात तोठरा बसून श्वास अडकणे- ज्येष्ठमध चूर्ण पाव चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून चघळून खावे. त्यावर अर्धा तास काहीही खाऊ पिऊ नये. रोज तीन वेळ करावे.
घसा कोरडा पडून खूप तहान लागणे- ज्येष्ठमध चूर्ण 1 चमचा, तूप 2 चमचे आणि गूळ एक चमचा एकत्र करून मटारच्या आकाराच्या गोळ्या बनवून दिवसभर चघळून खाणे.
खोकून कफासह किंवा नुसते रक्त पडणे- कोरडय़ा खोकल्याने खोकून खोकून कोर्डमुळे घशातील एखादी छोटीशी रक्तवाहिनी (पॅपिलरी) तात्पुरती फुटून एखादा थेंब रक्त कफासह किंवा नुसते पडू शकते. अशा वेळी ज्येष्ठमध चूर्ण एक चमचा आणि तूप एक चमचा एकत्र करून थेंब थेंब चघळून खावे आणि अर्धा तास लावून संपवावे. असे तीन वेळ केले तर थेंब भर रक्त पडणे वगैरे त्रास बंद होतो. यापेक्षा जास्त प्रमाणात रक्त वारंवार पडणे असेल तर मात्र घरी उपाय करत बसू नये. लगेच वैद्यकीय सल्ला आणि मदत घ्यावी हेच उत्तम.
उपाय करूनदेखील खोकला कमी होत नसेल तर- अशा वेळी जेवणापूर्वी अर्धा तास किंवा पित्ताचे त्रास असलेल्यांनी जेवणानंतर लगेच द्राक्षासव 60 मिलीपर्यंत एकावेळी घोट घोट प्यावे. इतर औषधे घेणे सुरू ठेवावे. एका दिवसात दोन ते वेळ करावे. तरीही फरक पडला नाही तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणेच उत्तम.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments