STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
26-01-2024
गडचिरोली : . 2018 ते 2023 या कालावधीतील आरमोरी पोलिस ठाण्याअंतर्गत एकूण 247 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले तब्बल 75 लाखांवर किंमतीची दारुवर पोलिसांनी बुलडोजर फिरवून नष्ट करण्यात आली.
आरमोरी पोलिस ठाणे येथे मागील 5 वर्षात दारु विक्री, तस्करी प्रकरणातील 247 गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला मुद्देमाल प्रलंबित होता.
आरमोरी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या दारुचा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश प्राप्त झाले. याअंतर्गत राज्य उत्पादक शुल्क विभाग गडचिरोली यांच्या मार्फतीने तब्बल 75 लाख 93 हजार 720 रुपये किंमतीच्या देशी, विदेशी दारुच्या बॉटलावर रोडरोलर फिरवून बाटला खड्ड्यामध्ये बुजवून देण्यात आल्या. ही कारवाई पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या नेतृत्वात रघुनाथ तलांडे यांच्यासह अंमलदारांनी पार पाडली.
संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी आहे तरी गावोगावी वाहतो दारूचा महापूर ? याला जबाबदार कोण आहेत ? कोणाच्या आशीर्वादाने खुलेआम चालतो दारूचा व्यवसाय जणु काही हप्ता घेऊन खुलेआमपणें दारू विक्रीला सुट दिली असते. दारु पिऊन एखादी व्यक्ती मरण पावला तर याला दोषी कोन आहेत? पोलीस विभाग की पिणारा व्यक्ती , विकणारा व्यक्ति? ? त्यामुळे पोलीस विभागाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून अश्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाही करावी अन्यथा एक दिवस हे दारू विक्रेते पोलीस विभागवार वरचढ ठरू शकतात यात काही शंका नाही.
आज हल्ली मिष्यावर रेष नाहि तरी तसे मुले दारूच्या आहारी गेली आहेत. मग दारू पिऊन गावात, सार्वजनिक ठिकाणी झगडे करतात. सार्वजनिक ठिकाणी झगडे करणे गून्हा आहे तरी त्याची तमा न बाळगता भांडण, तंटे करतात.
अश्या दारू पिणाऱ्याच्या अंगात जेव्हां दारू असते तेंव्हा मोठी हिंमत करून, छाती फुगवूण कोनाहीसोबत अरेरावी, भांडण करतात पण जेव्हा अंगातून दारू उतरते तेव्हा मात्र त्याच्यात एक शब्द ब्र काढण्याची हिंमत नसते. म्हणूनच अश्या दारू पिऊन असणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल ने व्हिडियो शुटींग करुण जेव्हां तो भानावर असतो तेव्हा दाखवावे जेणे करून दारूच्या तालात काय बोललो यांची त्याला लाज लागेल. असे अनेक प्रसंग समाजात दिसत असतात. याचा मनस्ताप सर्वात जास्त महिलांना सहन करावा लागतो.
त्यामुळे पोलीस विभागाने आपल्या कर्तव्याची (अधिकार )जाण ठेऊन अश्या दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाही करावी अशी मागणी जिल्हा वाशियानी जिल्हा अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments