RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
29-12-2023
कुरूड : वडसा वन विभागात २० वाघांचा वावर आहे. या वाघांचे नागरिकांना अधूनमधून दर्शन होते. मागील पंधरवड्यापासून एकलपूर परिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना झाले होते. यात मागील आठवड्यात कोंढाळा जंगलात सरपण गोळा करणाऱ्या महिलांना वाघ दिसून आला. त्यामुळे या जंगलात पुन्हा वाघांची एन्ट्री झाली आहे.
तालुक्याच्या फरी-झरी परिसरात टी-१४ वाघिणीने दहशत माजवली होती. या वाघिणीने फरी येथील महिलेचा बळी घेतला. तेव्हा जन आक्रोश निर्माण झाल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी त्या वाघिणीला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर नागरिकांनी निश्वास सोडला होता. परंतु मागील महिन्यापासून एकलपूरपरिसरात वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना अधूनमधून झाले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. तसेच गत आठवड्यात कोंढाळा येथील कक्ष क्रमांक ५९ मध्ये सरपण गोळा करणाऱ्या महिलांना वाघ दिसून आला. तेव्हा महिला भयभीत होऊन गावात परतल्या, वाघांचा वावर असल्याने जंगलात एकटे-दुकटे जाणे धोक्याचे ठरत आहे.
'ती' वाघीण गर्भवती
पावसाळ्यात शिवराजपूर परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या पाच वाघांची चित्रफित व्हायरल झाली होती. यामुळे या भागात हमखास वाघांचा वावर आहे, हे स्पष्ट झाले होते.
त्यापैकीच एक वाघीण गर्भवती असल्याचा प्रत्यक्षदर्शीचा कयास आहे. त्यामुळे या भागात भविष्यात वाघांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments