अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
F
20-04-2024
नागपूर : मतदान केंद्रांबाहेर लागलेल्या भाजपच्या बूथवर मिनी प्रिंटरच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या फोटोसह कमळाचे चिन्ह छापलेली स्लिप मिनी प्रिंटरच्या माध्यमातून मतदारांना दिली जात होती. यावर ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. यामुळे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करीत मिनी प्रिंटर जप्त केले व तणाव शांत करण्याचा प्रयत्न केला.
सकाळी ११ च्या सुमारास बांगलादेश नाईक तलाव परिसरातील संत कबीर अप्पर प्रायमरी स्कूलच्या समोरील भाजपच्या बूथवर मतदाराच्या चिठ्ठीवर कमळाचे चिन्ह छापून येत असल्याच्या आरोपावरून काँग्रेस आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते समारोसमोर आले. यामुळे सुमारे ५० मिनिटे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. लगतच्या चौकीतील पोलिसांनी लहान चार प्रिंटर ताब्यात
घेताच भाजपचे कार्यकर्ते पोलिसांकडे प्रिंटर परत करण्याची मागणी करू लागले. अखेर आ. प्रवीण दटके यांनी मध्यस्थी करून प्रिंटर परत घेतले. त्यानंतर या बूथवर संबंधित प्रिंटर दिसले नाहीत.
झिंगाबाई टाकळी परिसरातील आशीर्वाद शाळेसमोरील भाजपच्या बूथवरही अशाच स्लीप दिल्या जातहोत्या. त्यावर काँग्रेस कार्यकर्ते बंडू ठाकरे यांनी आक्षेप घेतला. यावेळी काँग्रेस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. नंतर प्रिंटर हटविण्यात आले. फ्रेंड्स कॉलनी परिसरातील बूथवरही असाच तणाव झाला.
काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
भाजपच्या बूथवर आचारसंहितेचे उघडपणे उल्लंघन करण्यात आले. प्रचारबंदी असताना मतदारांचे नंबर घेऊन त्यांना व्हॉट्सअॅप आणि मॅसेज पाठविण्यात येत होते. अनेक मतदान केंद्राबाहेर भाजपने आपल्या पक्षाचे चिन्ह असलेले पेंडॉलही उभारले होते. हा सर्व प्रकार सुरू असताना मतदान केंद्राबाहेरील पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत हे सर्व बघत होते, अशी तक्रार काँग्रेसचे उमेदवार आ. विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments