समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
09-01-2024
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनासाठी अनुदान देण्यासाठी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना* सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोरिंग, पंप संच, वीज जोडणी, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण, सिंचन संच (तुषार सिंचन व ठिबक सिंचन) पी व्ही सी पाईप, परसबाग इत्यादी गोष्टींवर अनुदान मिळणार असून या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील सातारा, सांगली, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर व रत्नागिरी या जिल्हे वगळता राज्यातील बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये घेता येईल.
*अनुदान रक्कम*
▪️नवीन विहीर बांधण्यासाठी 2 लाख 50 हजार रुपये
▪️जुनी विहीर दुरुस्ती 50 हजार रुपये
▪️इनवेल बोरिंग साठी 20 हजार रुपये
▪️पंप संच साठी 20 हजार रुपये.
▪️वीज जोडणी साठी 10 हजार रुपये
▪️शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यासाठी 1 लाख रुपये
▪️ठिबक सिंचन 50 हजार किंवा तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये.
▪️पी व्ही सी पाईप साठी 30 हजार रुपये
▪️परसबाग करिता 500 रुपये
*योजनेच्या लाभासाठी पात्रता:*
✔️ शेतकरी अनुसूचित जातीचा असावा.
✔️ शेतकऱ्याच्या नावे जमिनीचा सातबारा 8अ उतारा असावा.
✔️ शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपये असावे.
✔️ शेतकऱ्याची जमीन धारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत असावी.
✔️ दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
✔️ अपंग किंवा महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात येईल.
*असा करा ऑनलाईन अर्ज*
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करायचा आहे. तसेच https://agriwell.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. या योजनेमुळे अनुसूचित जाती शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments