नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
29-12-2023
पवनी : अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर पवनी पोलिसांनी मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास कारवाई केली. यात पोलिसांनी १५ ट्रॅक्टर, सहा टिप्पर व एक जेसीबी जप्त करत दोन कोटी ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील गुडेगाव रेतीघाटातून मंगळवारी (२६ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास नदीपात्रातील रेती उत्खनन करीत अवैधरीत्या रेतीसाठ्यावरून जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व टिप्पर भरून रेतीची अवैध वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांना माहिती मिळाली. गुप्त माहितीच्या आधारावर पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे आपल्या सहकारी पोलिसांसोबत गुडेगाव घाटावर पोहोचले, घाटावर पोहोचताच त्यांना रेतीतस्कर जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर व टिप्परमध्ये अवैध रेती भरताना आढळले. यावेळी पथकाने १५ ट्रॅक्टर, सहा टिप्परसह एक जेसीबी जप्त केला. याप्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाच्या चालक व मालकांविरोधात कलम ३७९, ५११, १०९अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे
दरम्यान, अवैध रेती वाहतूक प्रकरणातील बहुतांश ट्रॅक्टरवर नंबर प्लेट लागलेल्या आढळून न आल्यामुळे पोलिसांना कारवाई करताना इंजिन नंबर व चेसिस नंबरचा सहारा घ्यावा लागला. यात १५ ट्रॅक्टरपैकी ट्रैक्टर (क्र. एम. एच. ३६ झेड १६३४) या एकाच ट्रॅक्टरला नंबर प्लेट लागलेली होती, तर अन्य १४ ट्रॅक्टर विनानंबरचे आढळून आले. तसेच कारवाई केलेल्या टिप्परमध्ये (एम. एच. ४० ए के ६९२८), (एम. एच.४९ बो झेड ०९९३), (एम. एच. ४९ बी झेड ०२५६), (एम. एच. ४९ ए टी २३८७), (एम. एच. ४९ ए टी ०९९३), (एम. एच. ४० सी एम ८९९३) यांच्यासह एका जेसीबीचा समावेश आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे, पोलीस उपनिरीक्षक तिजारे, पोलीस हवालदार सत्यवान हेमणे, अजित वाहणे,नागदेव, बागडे, घरड, चालक कुर्लेकर, सुधीर शिवणकर यांनी केली, या घटनेचा पूढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील राऊत करीत आहेत.
पवनी पोलिसांची धडक कारवाई
अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेली वाहने एस.टी. डेपोत जमा ठेवण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र रेतीमाफियांकडून मागील दिवसांत डेपोमधील टिप्पर एस. टी. कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करून पळवून नेण्यात आले. याबाबत माहिती देऊन मदतीकरिता पोलिसांची मागणी करण्यात आली. मात्र तशी मदत पोलिसांकडून न मिळाल्यामुळे व डेपोतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी आम्हाला सुरक्षा पुरवून, डेपोत टिप्पर व ट्रॅक्टर जमा असताना पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.
- कुंदन मिश्र, वाहतूक निरीक्षक, पवनी
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments